शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कालचक्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 03:21 IST

एकाच कुटुंबात जन्मलेल्या आणि समान वातावरणात वाढलेल्या लोकांचे जीवन पूर्णत: वेगवेगळे असते.

प्रत्येक व्यक्ती ही इतरांपेक्षा वेगळी असते. म्हणूनच प्रत्येक मानवाच्या जीवनाचे फळ इतरांपेक्षा वेगळे असते. जीवनात एखाद्याला लवकर तर एखाद्याला उशिराने यश प्राप्त होते. प्रत्येकाचे आयुष्यमान वेगळे असते. एकाच कुटुंबात जन्मलेल्या आणि समान वातावरणात वाढलेल्या लोकांचे जीवन पूर्णत: वेगवेगळे असते. एखाद्याच्या जीवनात आनंद तर एखाद्याचे जीवन दु:खाने भरलेले असते. असे का होते, हे एक मोठे रहस्य आहे. या रहस्याला समजून घेण्यासाठी विश्वातील विचारवंतांनी खूप चिंतन केलेले आहे व आपआपले विचार मांडलेले आहेत. संस्कृत साहित्याचे प्रख्यात नाटककार भास यांनी सांगितलेले आहे-कालक्र मेण जगत: परिवर्तमानाचक्रारपङ्क्तिरिव गच्छति भाग्यपङ्क्ति:म्हणजेच कालक्र मानुसार बदलणाऱ्या या विश्वातील भाग्यरेषा चक्र रेषेनुसार बदलत असतात. ज्याप्रमाणे चक्र खाली-वर होत असते, त्याप्रमाणे मानवाचे भाग्य सुध्दा वर-खाली होत असते. असे दिसून येते की समान प्रयत्न करणाºया दोन व्यक्तींना समान यश मिळत नाही. विश्वातील या रहस्यमय बाजूस तत्ववेत्त्यांनी कालचक्र असे संबोधले आहे. श्रीमद्भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी सांगितले की मी काळ आहे, जो सर्वांना संचलित करतो. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतो. जेव्हा मानव कर्म करतो, तेव्हा त्याचे काही कर्म असे असतात, ज्याचे तात्काळ फळ मिळत नाही, तर ते कर्म निसर्गाच्या कुशीत साचलेले असतात व अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्यानंतर ते प्रकट होतात. या कर्मफळांचा प्रकट होण्याचा एक काळ असतो. पराकाष्ठेचे कर्म केल्यानंतरसुध्दा काही कर्मफळे तात्काळ प्रकट होत नाहीत. बºयाच वेळा असे दिसून येते की, खूप कमी कर्म केल्यानंतरही फळाची प्राप्ती लवकर होेते.विचारवंतांच्या मते- कर्मफळांचे हे प्रकटीकरण कालचक्रानुसार होते. हे कालचक्र कसे काम करते हे एक मोठे रहस्यच आहे. कालचा राजा आज रंक व कालचा रंक आज राजा कसा बनतो, हे समजणे कठीण आहे. कालचक्रामध्ये बदल करणे खूप कठीण आहे. परंतु आपण कर्म व धैर्याने त्याचा सामना करू शकतो. सतत योग्य कर्माचे अनुपालन व परिस्थितीला सामोरे जाण्याचे धैर्य आपल्याला या कालचक्र ाच्या विळख्यातून वाचवू शकतात. योग्य वेळ, योग्य कर्माचे अधिष्ठान व कर्मफळास उशीर झाला तरीही धैर्याचे धारण, आपल्याला दृढ, मानिसक व शारीरिक स्वास्थ्य प्रदान करतात.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक