शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
3
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
4
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
5
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
6
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
7
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
8
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
9
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
10
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
11
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
12
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
13
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
14
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
15
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
16
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
17
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
18
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
19
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
20
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 

आवास योजनेतून वसतंय एक शहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 03:46 IST

एकेक घर मिळून छोटं गाव बनतं. छोट्या गावाचं मोठ्या गावात अन् मोठ्या गावाचं नगरात रूपांतर होतं.

- बाळासाहेब बोचरेएकेक घर मिळून छोटं गाव बनतं. छोट्या गावाचं मोठ्या गावात अन् मोठ्या गावाचं नगरात रूपांतर होतं. पण इथं मात्र थेट एक नगरच वसविण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सोलापुरात राबवला जातो. त्याचं नाव आहे ‘रे नगर’ असंघटित क्षेत्रातील अल्प उत्पन्न गटातील ३० हजार कुटुंबांना घरे देण्याचा प्रकल्प म्हणजे सोलापूरजवळ एक स्वतंत्र नगरच वसविलं जातंय...एकेक घर मिळून छोटं गाव बनतं. छोट्या गावाचं मोठ्या गावात अन् मोठ्या गावाचं नगरात रूपांतर होतं. पण इथं मात्र थेट एक नगरच वसविण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सोलापुरात राबवला जातोय. त्याचं नाव आहे, रे नगर. कामगारांच्या हितासाठी काम करणारा मार्क्सवादी पक्ष अजूनही कामगारांच्या विषयापासून दूर गेलेला नाही. सोलापूरचे माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी सोलापुरातील विडी कामगारांसाठी शासकीय योजनेतून १५ हजार घरांचा प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण केला. त्यानंतर त्यांनी असंघटित क्षेत्रातील अल्प उत्पन्न गटातील ३० हजार कुटुंबांना घरे देण्याचा प्रकल्प सुरू केला आहे. पंतप्रधान आवास योजनेतून त्यांनी हा प्रकल्प मंजूर करून आणला असून त्याचे काम प्रगतीपथावर आहे. लवकरच सुमारे एक लाखाच्यावर लोकसंख्या असलेलं हे स्वतंत्र शहर सोलापूरजवळ अक्कलकोट रोडवर तयार होणार आहे. सोलापूरचं ‘रे नगर’ हे आवास योजनेचं मॉडेल असून या प्रकल्पाचे प्रवर्तक नरसय्या आडम यांनापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खास लखनौला बोलावून घेतले. प्रधानमंत्री आवास योजना, स्मार्ट सिटी आणि अमृत योजनाअंतर्गत देशभरातील गृहनिर्माण प्रकल्पावर लखनौ येथे कार्यशाळा झाली. त्यामध्ये सोलापूरच्या प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. शिवाय या प्रकल्पाचे कौतुक आंतरराष्टÑीय पातळीवरही झाले आहे. नेदरलॅँडमध्ये या गृहनिर्माण प्रकल्पाबद्दल आडम यांना प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अल्प उत्पन्न गटातील कमी शिकलेल्या कामगार वर्गाला कायदेशीर बाबींची पूर्तता करून सवलतीत घर मिळवणे जिकिरीचे असते. अशा एकेका कामगाराला घर मिळवून देता देता आडम मास्तर म्हणजे गोरगरिबांना घरे मिळवून देणारे कामगार नेते म्हणूनच नावारूपाला आले. वास्तविक देशात आणि राज्यात भाजपची सत्ता असताना डाव्या आघाडीच्या या प्रवर्तकाला प्रकल्प मंजुरी मिळवणे म्हणजे सोपे काम नाही. पण नियमावर बोट ठेवून काम करणाऱ्या या नेत्याने सरकारच्या मानगुटीवर बसून प्रकल्प मंजूर करून आणला. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या नेत्याच्या चिकाटीचे अन् योजनेचे कौतुक केले. गोदूताई विडी घरकूल प्रकल्प पूर्ण केल्यानंतर मास्तरांकडे घरे मागणाºयांची संख्या वाढली. घर उभं करताना लागणारी कागदपत्रे आणि ती दिली तरी बँक कर्ज देईलच याची शाश्वती नसल्याने हत्बल झालेले शेकडो सापडले. अशा गरजू कामगारांना त्यांनी एकत्र केले. त्यांनी कुंभारीजवळ स्वस्तात जागा विकत घेतली. त्याचे प्लॉट पाडले. गरजू लाभार्थींचे दाखले अन् उतारे गोळा केले. सगळा प्रकल्प बँकेला सादर केला. बँकेने अगदी हसत कर्ज मंजूर केले आणि प्रकल्प सुरू झाला. शे-दोनशे घरे एकत्र करून एखादं खेडेगाव नीटसे वसवणे अवघड असते. तिथे या किमयागाराने ३० हजार घरांची रचना करून ठेवली आहे. एक नगरच वसविलं आहे. ज्यांच्या नशिबी झोपडपट्टीशिवाय दुसरे काही आले नसते. ज्यांना आपले घर होईल की नाही याची आशा नव्हती अशांच्या स्वप्नात आशेचा किरण निर्माण केला आहे. म्हणूनच या वसाहतीला रे नगर असं म्हटलं जातं. कामगारांचं शहर म्हणून ओळखलं जाणाºया सोलापूर शहरात रे नगर नावाचं एक मॉडेल शहर आकारला आलंय.