शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
3
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
4
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
5
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
6
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
7
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
8
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
9
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
10
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
11
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
12
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
13
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
14
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
15
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
17
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
18
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
19
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
20
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवार आणि भयसूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2016 03:01 IST

रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवडून येण्याची शक्यता आता जवळपास मावळलेली आहे. काही अतर्क्य चमत्कार झाला, तरच ते निवडून येतील, पण

- दिलीप चावरेरिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवडून येण्याची शक्यता आता जवळपास मावळलेली आहे. काही अतर्क्य चमत्कार झाला, तरच ते निवडून येतील, पण असे चमत्कार सहसा घडत नसतात. ट्रम्प यांचा लंपटपणा, वाचाळपणा आणि लबाडी उघड झाल्यामुळे, सामान्य अमेरिकन उमेदवार त्यांचा विचारही करणार नाही, अशी रास्त अपेक्षा आहे. अध्यक्षपदी विराजमान होण्याला ट्रम्प मुळीच लायक नाहीत, याबद्दल कोणीही शंका उपस्थित करत नाही. याउलट ते अध्यक्ष झालेच, तर अमेरिकेचा सत्यानाश कसा होईल, याबद्दलच्या चर्चा अधिकाधिक रंगतदार होऊ लागल्या आहेत. याचा लाभ स्वाभाविकच डेमॉक्रॅटिक पक्षाच्या अमेरिकेच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून त्यांने नाव जाहीर झालेले असल्याची खात्री निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, हिलरी क्लिंटन यांची गैरकृत्ये आणि त्यांच्या विरुद्धचे विविध आरोप यांचा आजकाल उल्लेखही अगदी क्वचित होतो. केवळ दीड-दोन महिन्यांत हा बदल झाला आहे. परराष्ट्रमंत्री असताना हिलरी यांनी राष्ट्रहितास प्रतिकूल अशा प्रकारे खासगी ई-मेल सेवेचा वापर केला आणि आपल्या प्रतिष्ठानासाठी देणग्या गोळा करताना, कोणताही विधिनिषेध बाळगला नाही, अशा आरोपांनी वर्तमानपत्रांचे रकाने ओसंडून जात होते, वाहिन्यांवर वादळी चर्चा झडत होत्या. मात्र, ट्रम्प यांचे एकेक चाळे चव्हाट्यावर येऊ लागले आणि जनमत फिरले, पण हिलरी अमेरिकेचा कसा घात करतील, हा विषय मांडणारे अद्याप गप्प झालेले नाहीत. आजची अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक हतबलतेच्या वातावरणात होणार आहे. दोन अवांछित उमेदवारांपैकी कमी अवांछित कोण? एवढाच पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य मतदारांना आहे, परंतु असे वातावरण अमेरिकेत प्रथमच निर्माण झालेले नाही. पहिले अध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांची निवड बिनविरोध झाली. मात्र, हा एकच अपवाद. त्यानंतरची प्रत्येक निवडणूक बेफाम आरोप, चारित्र्यहनन आणि चिखलफेक यांनी गाजली. वॉशिंग्टन यांचे बिकटचे सहकारी आणि अमेरिकेच्या आद्य घटनाकारांपैकी एक असणारे थॉमस जेफर्सन अशा अश्लाघ्य प्रचाराचे पहिले लक्ष्य ठरले. अमेरिका स्वतंत्र झाली, त्या वेळी फ्रेंच राज्यक्रांती नुकतीच समाप्त झाली होती. जेफर्सन या क्रांतीचे कट्टर समर्थक होते. त्यांच्या उमेदवारीवर हल्ला चढवताना त्यांचे टीकाकार म्हणत, ‘जेफर्सन यदाकदाचित निवडून आलेच, तर अमेरिकेतील नैतिकता रसातळास जाईल. खूनखराबा, लूटमार, बलात्कार, व्यभिचार आणि निषिद्ध संबंध यांची उघडपणे तरफदारी होईल आणि समाज तसेच वागू लागेल.’ एके काळी वृत्तपत्र स्वातंत्र्याचे खंदे समर्थक असणारे जेफर्सन काही वर्षांनी वृत्तपत्र स्वातंत्र्याचे विरोधक बनले. याला अनेक कारणे आहेत. त्यापैकी एक म्हणजे, काही वर्तमानपत्रांनी त्यांच्याविरुद्ध उघडलेली आघाडी. एका वर्तमानपत्राने आपल्या संपादकीयात म्हटले होते, ‘जेफर्सन यांना विजय मिळाल्यास, त्यांच्या कारकिर्दीत जनतेचा विलाप सार्वत्रिक असेल, देशातील जमीन रक्ताने भिजलेले असेल आणि गुन्हेगारीला महापूर आलेला असेल.’ अर्थात, असे काहीही घडले नाही. जेफर्सन यांच्या आठ वर्षांच्या कारकिर्दीत अमेरिकेचे क्षेत्र दुपटीने वाढले. याला कारण म्हणजे लुईझियाना हा प्रदेश खरेदी करण्याचा त्यांचा द्रष्टेपणाचा निर्णय. अमेरिकेच्या विकासातला हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. जनरल अड्र्यू जॅक्सन यांनी आपली उमेदवारी जाहीर केली, तेव्हा असाच कोलाहल झाला. ब्रिटिशांचा १८१५च्या न्यू आॅर्लिअन्स इथल्या युद्धात पराभव करणारे जॅक्सन विलक्षण लोकप्रिय झाले होते. त्यामुळे त्यांचे विरोधक भयभीत झाले होते. जॅक्सन यांच्याविरुद्ध कोणतेच आरोप करता येण्यासारखे नसल्याने, ते अध्यक्ष झाल्यास लष्करी हुकूमशहा बनतील, असा प्रचार करण्यात आला. त्यास मतदारांनी भीक घातली नाही. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे असा प्रचार करण्यात नुकतेच निवृत्त झालेले जेफर्सन आघाडीवर होते. जेफर्सन म्हणत, ‘या पदासाठी बिलकूल लायक नसलेल्यांमध्ये जॅक्सन यांचे नाव सर्वप्रथम घ्यावे लागेल. जॅक्सन यांच्या मनात देशाच्या घटनेप्रती कोणताही आदरभाव नाही. हा माणूस धोकादायक आहे.’ जेफर्सन यांच्या सल्ल्याकडे जनतेने दुर्लक्ष केले. जॅक्सन यांची कारकीर्द कल्पनातील यशस्वी ठरली. घटनेच्या पावित्र्याबद्दल ते कमालीचे आग्रही होते. शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार प्राप्त झालेले अध्यक्ष थिओडोर रुझवेल्ट यांना रिपब्लिकन पक्षाने उभे केले पक्षांतर्गत गटबाजित नसलेले आणि तडजोड म्हणून स्वीकारलेले नेतृत्व या भावनेतून रूझवेल्ट यांनी अमेरिकेतील खासगी कंपन्यांच्या एकाधिकार शाहीला चाप लावला आणि कामगारांना न्याय्य वेतन मिळावे, म्हणून कायदे केले. तेदेखील त्यांच्याकडून फारशा अपेक्षा नसताना. तात्पर्य म्हणजे, अगदी नकोसे अथवा टाकाऊ वाटणारे उमेदवारही अध्यक्ष झाल्यावर भरीव कामगिरी करू शकतात.