शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
2
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
3
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
4
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
5
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
6
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
7
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
8
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
9
कुजबुज: मोहित कंबोज यांचा खरंच संन्यास की प्रसिद्धीसाठी स्टंट? ‘उँचे लोग, उँची पसंद’, पण...
10
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
11
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
12
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
13
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
14
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
15
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
16
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
17
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
18
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
19
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
20
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात

budget 2021 : पैसा भरपूर; पण मार्ग धूसर! भारत ‘आत्मनिर्भर’ व ‘आयुष्यमान’ कसा होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2021 06:52 IST

budget 2021: आर्थिक समृद्धीचा डोलारा आरोग्याच्या पायावर आधारित असतो’ हा महत्त्वाचा धडा भारत सरकारला मिळाला आहे. पंतप्रधानांनी ज्याचे वर्णन ‘ए बजेट फॉर हेल्थ ॲण्ड वेल्थ’ असे केले व ज्यात आरोग्यासाठी भरीव वाढीव निधीची व्यवस्था आहे त्या परिवर्तनाचे मन:पूर्वक स्वागत करूया.

- डॉ. अभय बंग(आरोग्य सेवा संशोधक आणि धोरणकर्ते)आर्थिक समृद्धीचा डोलारा आरोग्याच्या पायावर आधारित असतो’ हा महत्त्वाचा धडा भारत सरकारला मिळाला आहे. पंतप्रधानांनी ज्याचे वर्णन ‘ए बजेट फॉर हेल्थ ॲण्ड वेल्थ’ असे केले व ज्यात आरोग्यासाठी भरीव वाढीव  निधीची व्यवस्था आहे त्या परिवर्तनाचे मन:पूर्वक स्वागत करूया. थॅंक यू कोरोना!आरोग्याच्या दृष्टीने या अर्थसंकल्पामध्ये स्वागतार्ह गोष्टी अशा-*  सार्वजनिक आरोग्यसेवेवर पुन्हा भर* २.२३ लक्ष कोटी रुपये निधी, १३७ टक्के वाढ. कोविड  लसींसाठी ३५,००० कोटी रुपये.* प्राथमिक आरोग्यसेवा व संस्थांच्या विकासासाठी वाढीव ६४,००० कोटी रुपये.* स्वच्छ भारत, पाणीपुरवठा व पोषण मिशनसाठी मोठा निधी.* आत्मनिर्भरतेवर भर. आकडे अभिनंदनीय आहेत. पण मार्ग अस्पष्ट आहे. आणि घोषणांचे यश हे कार्यक्रम व अंमलबजावणी यावर अवलंबून असते. त्याबाबत अनेक प्रश्न उभे राहातात. त्यातले काही असे- * तीस कोटी व्यक्तींना कोविशिल्ड लसीचे दोन डोस द्यायला १२,००० कोटी लागतील. उर्वरित पैसा कशासाठी?* ‘आयुष्यमान भारत’ नावाने सध्या सुरू कार्यक्रमालाच अधिक गती देण्यासाठी वाढीव ६४,००० कोटी हा चांगला निर्णय आहे. त्याला नवीन योजनेचे नाव कशाला? तो सहा वर्षांमध्ये खर्च होणार असल्याने या वर्षी दहा हजार कोटीच मिळणार. मग उगाच आकडा कशाला फुगवला? या मधून १७,००० स्वास्थ्य केंद्र सुसज्ज होणार हे उत्तम. पण देशात अशी एकूण दीड लक्ष केंद्र आहेत.* ‘पोषण मिशन’ गेली अनेक दशके विविध नावांनी सुरू आहे. तरी २०१९-२०च्या राष्ट्रीय सर्वेक्षणानुसार अनेक राज्यांमध्ये कुपोषण वाढले आहे. मग आता काय वेगळे करणार?* खासगी आरोग्यसेवा व आरोग्य विमा यावर भर हा धोरणात्मक विश्वास चूक असल्याची अप्रत्यक्ष कबुली देणे कोरोनापुढे उडालेल्या दाणादाणीमुळे व त्यावेळी सार्वजनिक आरोग्यसेवाच कामी आल्यामुळे सरकारला  भाग पडले आहे.  वस्तुत: २०११ साली सादर केलेल्या भारत सरकारच्या ‘सर्वांसाठी आरोग्यसेवा उच्चस्तरीय तज्ज्ञ गट’च्या अहवालाने खासगी आरोग्यसेवेवर निर्भर न राहता सार्वजनिक आरोग्यावर भर देण्याची शिफारस केली होती. ‘देर आये दुरस्त आये’.. त्यासाठी अभिनंदन.या अर्थसंकल्पात नेमके काय काय नाही?-  दारू-तंबाखू-प्रदूषण-रक्तदाब या रोग-मृत्यू निर्मितीच्या चार प्रमुख कारणांवर उपाय नाही. आदिवासी आरोग्य व आशा, मलेरिया व मानसिक आरोग्य यासाठी विशेष काही नाही. संशोधन केल्याशिवाय तसेच लोकांना निरोगी सवयींसाठी प्रोत्साहित केल्याशिवाय भारत ‘आत्मनिर्भर’ व ‘आयुष्यमान’ कसा होणार?

टॅग्स :budget 2021बजेट 2021IndiaभारतAbhay Bangअभय बंग