शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
2
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
5
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
6
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
7
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
8
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
9
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
12
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
13
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
14
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
15
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
16
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
17
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
18
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
19
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
20
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?

झळाळती कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 02:44 IST

दिनांक २१ डिसेंबर हा वर्षातील सर्वात छोटा दिवस म्हणून ओळखला जातो; मात्र यावर्षी विदर्भ रणजी संघासाठी तो सर्वात मोठा दिवस ठरला.

दिनांक २१ डिसेंबर हा वर्षातील सर्वात छोटा दिवस म्हणून ओळखला जातो; मात्र यावर्षी विदर्भ रणजी संघासाठी तो सर्वात मोठा दिवस ठरला. काल-परवापर्यंत अगदीच लिंबूटिंबू समजल्या जाणा-या विदर्भ रणजी क्रिकेट संघाने त्या दिवशी रणजी चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारून विदर्भातील प्रत्येक क्रिकेटप्रेमीची मान ताठ केली. भारताचे पहिले आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू महाराजा रणजितसिंह यांच्या नावाने १९३४ मध्ये सुरू झालेल्या रणजी क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासात विदर्भाचा संघ फार कमी वेळा आपल्या नावाचा ठसा उमटवू शकला. विदर्भाने रणजी स्पर्धेत पदार्पण केले ते १९५७-५८ च्या हंगामात! तेव्हापासून २००१-०२ मध्ये स्पर्धेचे स्वरूप बदलेपर्यंत, विदर्भाचा संघ मध्य विभागात खेळत असे आणि बहुतांश वेळा विभागीयस्तरावरच त्याचे आव्हान संपुष्टात येत असे. अपवाद फक्त १९७०-७१ आणि १९९५-९६ च्या हंगामाचा! त्या दोन हंगामामध्ये विदर्भ उपउपांत्य फेरीत पोहोचला होता. पुढे २००२-०३ च्या हंगामापासून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने स्पर्धेचे विभागीय स्वरूप संपुष्टात आणले आणि त्याऐवजी १५ आघाडीच्या संघांचा समावेश असलेला ‘एलिट’ गट आणि तळातील संघांचा समावेश असलेला ‘प्लेट’ गट, असे नवे स्वरूप स्पर्धेला दिले. त्यानंतर विदर्भाचा संघ २००२-०३ आणि २०११-१२ मध्ये ‘प्लेट’ गटाच्या उपांत्य फेरीत पोहोचला होता. एवढीच काय ती विदर्भ रणजी संघाची आजवरची चमकदार कामगिरी! एकूण २५९ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये केवळ ४१ विजय, ८९ पराजय आणि १२९ अनिर्णीत सामने ही आकडेवारी, संघाच्या एकंदर कामगिरीवरील बोलके भाष्य आहे. या पृष्ठभूमीवर, कर्नाटकसारख्या आठवेळा विजेता राहिलेल्या संघाला उपांत्य सामन्यात पराभूत करून थेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश, ही कामगिरी एकदम झळाळून उठते! कर्नाटकचा संघ यावर्षी सातत्याने दमदार कामगिरी करीत होता. मोठे सामने खेळण्याचा आणि जिंकण्याचा भरीव अनुभव त्या संघाच्या गाठीशी होता. अशा संघाला नमविणे ही सोपी गोष्ट नव्हती; मात्र विदर्भाच्या युवा क्रिकेटपटूंनी ते करून दाखविले. विदर्भ संघाच्या कामगिरीत झालेल्या या लक्षणीय बदलाचे श्रेय नि:संशयपणे प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांचे आहे. विदर्भाच्या क्रिकेटपटूंमध्ये गुणवत्ता होतीच; मात्र त्या गुणवत्तेला पैलू पाडण्याचे व संघाला विजयाची सवय लावण्याचे काम पंडित यांनी केले. संघात विजिगीषू भावना निर्माण करण्याचे श्रेय कर्णधार फैज फजललाही द्यावेच लागेल. संघाची कामगिरी अंतिम सामन्यातही अशीच बहरो आणि रणजी चषकावर नाव कोरता येवो, हीच शुभेच्छा!

टॅग्स :Ranji Trophyरणजी करंडकRanji Trophy 2017रणजी चषक 2017