शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीकरांचा कमळाला पाठिंबा

By सचिन जवळकोटे | Updated: May 31, 2018 05:33 IST

मोबाईलमध्ये म्हणे आॅडिओ-व्हिडीओ क्लिप्स् जोडण्याचे अन् तोडण्याचे कैक अ‍ॅप पडून होते.

देवेंद्रपंतांचं वाक्य ‘तोड-मोड के जोड’ करून जगाला ज्या पद्धतीनं ऐकविलं गेलं, ते ऐकून गल्लीतला बंड्या पुरता झपाटून गेला. कारण त्याच्याही मोबाईलमध्ये म्हणे आॅडिओ-व्हिडीओ क्लिप्स् जोडण्याचे अन् तोडण्याचे कैक अ‍ॅप पडून होते. त्यानं याचा वापर करून बऱ्याच नेत्यांच्या भाषणांच्या अजब-गजब क्लिप्स् बनविल्या. जेणेकरून ‘यू-ट्यूब’वर हजारो हिटस् मिळावेत.प्रत्येक नेत्याचं त्यानं एकच मधलं वाक्य लोकांना ऐकविलं. खळबळ माजवून देणाºया या वाक्याच्या मागचं अन् पुढचं वाक्य पद्धतशीरपणे गायब केलं. मात्र, म्या पामरानं ते बरोबर हुडकून काढलं. या मधल्या वाक्यामुळं जी काही गंमत झाली, ती कथन करण्यापलीकडची होती.थोरले काका बारामतीकरांचं हे वाक्य भलतंच गहजब माजवून गेलं. काका म्हणाले की, ‘आमचा पाठिंबा कमळवाल्यांनाच.’परंतु मूळ वाक्य असं होतं, ‘धनुष्यवाल्यांनी जर सरकार पाडलं तर... आमचा पाठिंबा कमळवाल्यांनाच, असं मी बिलकूल म्हणणार नाही, मात्र शेवटच्या क्षणापर्यंत काहीही घडू शकतं.’यानंतर बंड्यानं कदमांच्या रामदासांची लय भारी क्लिप फिरविली.रामदासभाऊ म्हणाले म्हणे, ‘प्रदूषण तर माझ्या जीभेलाच झालंय. आता नियंत्रण आणायलाच हवं.’त्यांचं ओरिजनल वाक्य असं असावं, ‘सकाळी उठल्या उठल्या मी आरशात बघितलं, तेव्हा दिसलं की... प्रदूषण तर माझ्या जीभेलाच झालंय. नियंत्रण आणायलाच हवं. अखेर मी उद्धोंच्या ओंजळीनं पाणी पिऊन त्यांच्या खाल्ल्या मिठाच्या गुळण्या केल्या.’यानंर बाजारात क्लिप आली ‘कृष्णकुंज’वरच्या राज यांची. ते म्हणत होते, ‘किमान माझ्या कार्टूनला तरी मत द्या.’आता खरं वाक्य काय असेल, कल्पना करा बघू... ‘तुम्ही सारे जसं माझ्या भाषणाला टाळ्या वाजविता, तसंच किमान माझ्या कार्टूनला तरी मत द्या.. पण मत म्हणजे प्रतिक्रिया होऽऽ कारण ‘त्या’ मतांची अपेक्षा तर मी केव्हाच सोडून दिलीय.’यानंतर आवाज ऐकू आला विनोदभाऊंचा, ‘बहुधा यंदा आमचा ‘निकाल’ लागणार.’...मात्र मूळ वाक्य पुढीलप्रमाणं, ‘गेल्या वर्षी विद्यापीठाची परीक्षा प्रक्रिया खोळंबली होती. बहुधा यंदा आमचा ‘निकाल’ लागणार... कारण आता स्वत:चं मार्केटिंग कमी करून आम्ही खºया अर्थानं कामाला लागलोय.’यानंतर ‘उद्धों’चीही आॅडिओ क्लिप बंड्यानं तयार केली, ‘मला महाराष्ट्राचा कुमारस्वामी व्हायला आवडेल.’... परंतु ते प्रत्यक्षात असं म्हणाले होते, ‘पृथ्वीबाबा कºहाडकर अन् अशोकभाऊ नांदेडकर यांना कदाचित वाटत असेल की... मला महाराष्ट्राचा कुमारस्वामी व्हायला आवडेल. मात्र माझा सिद्धरामय्या होणार की येडियुरप्पा, याची पैज माझेच सहकारी लावू लागलेत.’बंड्यांच्या या साºया क्लिप्स् भलत्याच गाजल्या. अनेकांनी केवळ गंमत म्हणून या कानानं ऐकून दुसºया कानानं सोडून दिल्या. आपणही इथं वाचून सोडून द्याव्यात. मात्र, यदाकदाचित भविष्यात नेत्यांची ही मधली वाक्यं प्रत्यक्षात उतरली तर मात्र, तो योगायोग समजू नये.- सचिन जवळकोटे