शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

बाबामहाराज सातारकर: शब्द जैसे कल्लोळ अमृताचे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2023 08:05 IST

बाबा महाराज सातारकर यांनी वारकरी कीर्तन परंपरा समृद्ध केली. कीर्तन परंपरेत वेगवेगळे प्रयोग केले. महिलांचा कीर्तनाचा अधिकार अधोरेखित केला..

शामसुंदर सोन्नर, संत साहित्याचे अभ्यासक

साच आणि मवाळ, मिथुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे... अशी अनुभूती ज्येष्ठ कीर्तनकार वारकरीरत्न, महाराष्ट्रभूषण बाबामहाराज सातारकर यांचे कीर्तन ऐकताना येत असे. परंपरेच्या जोखडात अडकून न पडता नव्या काळाचं नवं संगीत त्यांनी आपल्या कीर्तनात आणलं. म्हणूनच ते लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले.

बाबामहाराज सातारकर म्हणजे ज्ञान आणि विज्ञानाचा अनोखा संगम होता. दादा महाराज सातारकर यांची फड परंपरा त्यांनी अधिक जोमाने पुढे नेली. वारकरी फडकरी एका साच्यात अडकून पडले होते. ही परंपरा नव्या काळातील नवे बदल स्वीकारायला तयार नव्हती. त्यामुळे कीर्तन परंपरेत एक साचलेपण आले होते, तेव्हा या प्रस्थापित व्यवस्थेला झिडकारून बाबामहाराज सातारकर यांनी नव्या काळासोबत स्वत:ला जोडून घेतले. खरं तर घरात वारकरी, फडकरी परंपरा असल्याने संस्कृतचा त्यांचा चांगला अभ्यास होता. इतर कीर्तनकार जास्तीत जास्त संस्कृतप्रचूर भाषा वापरत होते. अबोध वैदिक प्रक्रिया मांडत होते. पौराणिक कथांचा अन्वयार्थ लावण्यात मग्न होते, तेव्हा बाबामहाराज लोकांची भाषा बोलत होते. इतर कीर्तनकार स्वर्ग, वैकुंठ या पारलौकिक सुखाची स्वप्ने दाखवत होते तेव्हा बाबामहाराज आपल्या कर्तृत्वाने या पृथ्वीवरच स्वर्ग निर्माण करण्याचा आशावाद मांडत होते.

बदलत्या जगाची आव्हाने स्वीकारत असताना त्यांना वारकरी संप्रदायातील तथाकथित परंपरावाद्यांकडून खूप त्रास सहन करावा लागला; पण ते डगमगले नाहीत, तर आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. वारकरी फडकरी परंपरेत महिलांना कीर्तन करू दिले जात नाही. बाबामहाराज यांनी त्याला छेद देऊन आपल्या मुलीला भगवतीताई सातारकर- दांडेकर यांना कीर्तन शिकविले. त्यावेळी फडकऱ्यांकडून प्रचंड विरोध झाला; पण बाबामहाराज त्या दबावापुढे झुकले नाहीत. 

याबाबत एक प्रसंग खूप बोलका आहे. सातारा येथे ‘भक्ती शक्ती’ वारकरी संमेलन होते. या संमेलनात कीर्तन करण्याची संधी मिळणे खूप प्रतिष्ठेचे मानले जात होते. बाबामहाराज सातारकर हे त्यावेळी लोकप्रियतेच्या शिखरावर होते. त्यामुळे त्यांचे कीर्तन या संमेलनात व्हावे, असा स्थानिक संरोजकांचा आग्रह होता. मात्र, या नियोजनात काही परंपरावादी मंडळी होती. त्यांनी त्याला विरोध केला. कारण बाबामहाराज यांच्या कीर्तनात भगवतीताई यांच्यासह काही महिला टाळकरी उभ्या राहत असत. 

परंपरावादी मंडळींचा त्याला विरोध होता; पण स्थानिक लोकांचा आग्रह वाढला तेव्हा,  ठीक आहे, त्यांना कीर्तन करू द्या; पण महिला टाळकरी उभ्या करू नयेत, अशी अट घालावी, असे ठरले. तो प्रस्ताव घेऊन काही मंडळी महाराज यांच्याकडे गेली तेव्हा त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले, वारकरी संप्रदाय फक्त पुरुषांचा नाही. मुक्ताबाई, जनाबाई, सोयराबाई आदीकरून सर्व जातीतील महिला संतांनी ही वारकरी परंपरा वाढविली आहे. त्यामुळे महिलांना निर्बंध घालणे चूक आहे. भगवतीताई टाळकरी चालत असतील तरच मी कीर्तन करील, असे ठणकावून सांगितले. परंपरावाद्यांना आपला हट्ट सोडावा लागला. 

बाबामहाराज यांनी वारकरी कीर्तन परंपरेतील संगीताच्या चौकटीही मोडल्या. कीर्तनात मृदंग, टाळ आणि वीणा इतकीच वाद्ये असावीत, असा दंडक होता. महाराजांनी आपल्या कीर्तनात तबला, हार्मोनियम यांच्यासह इतर आधुनिक वाद्यांचा वापर केला.  

एरवी हळवे असणारे बाबामहाराज मनाने खूप खंबीर होते. महाराज यांचे कीर्तन गिरगाव येथील परंपरागत विठ्ठल मंदिरात होते. महाराज यांचे संगीत उच्च दर्जाचे असल्याने ध्वनी व्यवस्थाही तितकीच चांगली लागत असे. ती ध्वनी व्यवस्था कीर्तनाच्या वेळी त्यांचे चिरंजीव चैतन्य महाराज सांभाळत होते. कीर्तन सुरू झाले. मध्ये आवाजात जरा डिस्टर्बन्स आला म्हणून चैतन्य महाराज माईक सेट करायला गेले. जोरात शॉक बसला. चैतन्य महाराज यांच्यातील चैतन्य निघून गेले होते... त्या परिस्थितीतही  स्वत:ला सावरत महाराजांनी कीर्तन पूर्ण केले. आरती झाल्यानंतर पुढील सोपस्कार पार पडले.

मेणाहूनी मऊ आणि वज्राहूनी कठीण असणारे बाबामहाराज सातारकर यांनी वारकरी कीर्तन परंपरा समृद्ध केली. ती पहिल्यांदा दूरचित्रवाणीवरून जगभर पोहाेचवली. कीर्तन परंपरेत वेगवेगळे प्रयोग केले. महिलांचा कीर्तनाचा अधिकार अधोरेखित केला. आज अनेक महिला कीर्तनकार मुक्तपणे कीर्तन करीत आहेत, याचे श्रेय बाबामहाराज यांना द्यावे लागेल. त्यांच्या जाण्याने वारकरी संप्रदायात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

 

टॅग्स :Baba Maharaj Satarkarबाबा महाराज सातारकर