शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

कॅन्सरग्रस्तांना आयुव्रेदाचा दिलासा

By admin | Updated: November 1, 2014 00:15 IST

कॅन्सरशी लढा देताना त्रसून जाणा:या कुटुंबाना दिलासा देण्याचे काम करणा:या डॉ. सदानंद सरदेशमुख आणि त्यांच्या आयुव्रेदिक उपचार संशोधनाला समर्पित केलेल्या 2क् वर्षाची ही कहाणी आहे.

कॅन्सरशी लढा देताना त्रसून जाणा:या कुटुंबाना दिलासा देण्याचे काम करणा:या डॉ. सदानंद सरदेशमुख आणि त्यांच्या आयुव्रेदिक उपचार संशोधनाला समर्पित केलेल्या 2क् वर्षाची ही कहाणी आहे. रविवारी या इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रिटमेंट अॅन्ड रिसर्च सेंटरतर्फे मुंबईत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने घेतलेला हा आढावा.
सदानंद सरदेशपांडे. त्यांचे वडील प्रभाकर सरदेशमुख. लोक त्यांना आदराने महाराज म्हणायचे. आयुव्रेदात अभ्यास एवढा की नाडी पाहून तुम्ही काय खाल्लं हे ते अचूक सांगायचे.. त्यांना त्यांच्या वडिलांकडून हा वारसा मिळाला होता, तर सदानंद सरदेशमुखांना त्यांच्या वडिलांकडून.. नाडी परीक्षेचाच हा वारसा पुढे चालावा एवढीच माफक अपेक्षा प्रभाकर देशमुख यांची नव्हती, तर देशातलं कॅन्सरवरील सर्वात उत्तम संशोधन केंद्र आपल्या मुलाने उभं करावं अशी त्यांची इच्छा होती. त्यासाठी 
त्यांचे मनही विशाल होते. स्वत: किरायाच्या घरात राहात त्यांनी स्वत:च्या मालकीची पुण्याजवळील तब्बल 63 एकर जमीन सदानंद सरदेशमुख यांना ट्रस्ट करून देऊ केली आणि 1994 मध्ये पुण्यात इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रिटमेंट अॅन्ड रिसर्च सेंटरच्या अंतर्गत कॅन्सर संशोधन प्रकल्प सुरू झाला.
या प्रकल्पाची कथा तेवढीच रोमहर्षक. डॉक्टरांनी 1967 मध्ये पुण्यात, तर 1968 ला मुंबईत प्रॅक्टीस सुरू केली. तेव्हापासून डॉ. सरदेशमुख यांनी कॅन्सर संशोधन प्रकल्पाचे स्वप्न पाहिले होते. त्या एका स्वप्नासाठी त्यांनी स्वत:ला झोकून दिले. एकदा बाळासाहेब भारदे एका रुग्णाला घेऊन त्यांच्या हॉस्पिटलमध्ये आले. म्हणाले, काही करा, पण याला बरं करा.. आम्ही आमचे आयुव्रेदाचे उपचार सुरू केले आणि पुढेच सात वर्षे तो रुग्ण व्यवस्थित जीवन जगू शकला. भारदे म्हणाले, आता तुमचंच हॉस्पिटल सुरू करा.. आणि सरदेशमुख यांच्या वडिलांनी पाहिलेले स्वप्न साकार झाले. त्यासाठी त्यांच्या मदतीला धावून आले, परदेशातून भारतात परत आलेले बॉम्बे हॉस्पिटलच्या रेडियोलॉजी विभागाचे प्रमुख 
डॉ. अरविंद कुलकर्णी. अत्यंत देखणं असं काम कोणताही गाजावाजा न करता पुण्यात चालू आहे. परदेशातून कॅन्सरने त्रस्त झालेले रुग्ण येथे येत आहेत आणि डॉ. सरदेशमुख त्यांच्यावर उपाय करत आहेत..
कॅन्सरपुरते सांगायचे, तर प्रचलित उपचार पद्धती केमोथेरपी किंवा रेडिओथेरपीचा सर्रास वापर होतो. त्याचे शरीरावर जे विपरीत दृश्य परिणाम (साईडईफेक्ट्स) दिसतात, त्याला रोगी अगतिकपणो सामोरे जातात. हे जणू अटळ असल्याच्या भावनेने सहन करीत राहतात. प जवळपास 75क्क् हजार कॅन्सर पेशन्ट्सना आयुर्वेद या बाबतीत देऊ करत असलेल्या साहय़भूत भूमिकेचा चांगला अनुभव आलेला आहे. प्रचलित उपचारातून उद्भवणारे साइड इफेक्ट्स कमी करणो आणि त्याच्या वेदना सुसहय़ वाटण्याजोगी प्रतिकारक्षमता वाढविणो हे दोन्ही हेतू आयुर्वेद पूर्ण करू शकतो. डोक्यावरचे केस जाणो, वजनात अमाप घट होणो, अशा परिणामांवर उपाय म्हणून आयुर्वेद साहय़भूत भूमिका बजावतो. म्हणजेच एकाचवेळी दोन उपचार पद्धतींचा सुयोग्य मिलाफ रुग्णांसाठी वरदान ठरतो हे स्वत:च्या प्रयोगातून आणि गेल्या काही वर्षाच्या सातत्यपूर्ण मेहनतीतून डॉ. सदानंद सरदेशमुख यांनी सिद्ध करून दाखवले आहे. 
अॅलोपॅथीने आयुव्रेदाकडे कसे पाहावे, हा आजचा विषय नाही; मात्र आयुव्रेदाने अॅलोपॅथीची साथ घेत कॅन्सरच्या हजारो रुग्णांना मोठा दिलासा देण्याचे काम केले आहे. अत्यंत साधेपणाने, कोणत्याही प्रसिद्धीच्या मागे न लागता, पुण्याजवळ वाघोलीत इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रिटमेंट अॅन्ड रिसर्च सेंटर सुरू आहे. त्याशिवाय मुंबई, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक व दिल्ली येथेदेखील ओपीडी सुरू करून डॉ. सरदेशमुख आणि डॉ. वासंती गोडसे, डॉ. श्रीनिवास दातार आणि संपूर्ण टीमने आयुव्रेदाला सर्वदूर नेण्याचे काम केले आहे. 
त्यांचे हे काम पाहून केमोथेरेपी, रेडिओथेरिपी, शस्त्रकर्म या आधुनिक चिकित्सापद्धती वाजवी दरात मिळाव्यात म्हणून अद्ययावत कोबाल्ट रेडिएशन सेंटर सुरू करण्यासाठी भारत सरकारच्या अॅटोमिक एनर्जी विभागाने मोठे अर्थसाह्य उपलब्ध करून दिले आहे. डॉ. अनिल काकोडकर यांनी यासाठी पुढाकार घेतला होता, हे 
विशेष. शिवाय, उद्योगपती रतन टाटा यांनी कॅन्सर रुग्णांसाठी पंचकर्म हॉस्पिटलच्या इमारतीकरिता अर्थसाह्यच दिले नाही, तर स्वत: वाघोलीला भेटही 
दिली. अजूनही रतन टाटा या प्रकल्पाला अधूनमधून भेट देतात व कामाची पाहणी करतात. वीस वर्षापूर्वी वाघोलीत सुरू झालेल्या कॅन्सर संशोधन प्रकल्पात 
आज 16क् बेडचे सुसज्ज हॉस्पिटल उभे राहिले आहे. विशेष म्हणजे, येथे रुग्णांना मिळणारी बहुतांशी औषधे संस्थेच्या अथर्व नेचर हेल्थकेअरमध्ये तयार केली जाऊ लागली. त्यासाठी संजीवनी वनौषधी उद्यान विकसित केले गेले. संस्थेतर्फे कॅन्सर आयुव्रेदविषयक चार जागतिक परिषदांचे आयोजन व कॅन्सर संशोधन प्रकल्पातील संशोधनावर आधारित शास्त्रीय शोधनिबंध आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झाले. 
कॅन्सरमुळे जगण्याची उमेद हरवलेल्या मनाला उभारी देण्याचे काम करताना नुकताच आलेला अनुभव डॉक्टर सरदेशमुख यांनी उत्साहाने सांगितला. ते म्हणाले, जर्मनीच्या एका हॉस्पिटलने एका रुग्णाच्या रिपोर्टमध्ये ‘भारतात जाऊन सतत आयुव्रेदिक उपचार घेतल्याने 
अमूक अमूक रुग्णाचा त्वचेचा कॅन्सर बरा झाला’ असा उल्लेख केला आहे. आजवर आम्ही केलेल्या कामाची यापेक्षा मोठी पावती आणखी कोणती असेल, असेही डॉक्टर शांतपणो सांगतात तेव्हा त्यांच्या साधेपणाची प्रचिती येते..
 
अतुल कुलकर्णी
वरिष्ठ सहायक संपादक
लोकमत, मुंबई