शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
2
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
3
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
4
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
5
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
6
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
7
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
8
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
9
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
10
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
11
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
12
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
13
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
14
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
15
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
16
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
17
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
18
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
19
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
20
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...

नास्तिक म्हणजे अहंकारी... नव्हे! विज्ञानवादी?

By admin | Updated: April 23, 2017 01:45 IST

नास्तिक म्हणजे अहंकारी, नास्तिक म्हणजे उर्मट.. असाच काहीसा समज. याच समजाला छेद देण्यासाठी ९ एप्रिल रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या

- अक्षय चोरगे नास्तिक म्हणजे अहंकारी, नास्तिक म्हणजे उर्मट.. असाच काहीसा समज. याच समजाला छेद देण्यासाठी ९ एप्रिल रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या प्रांगणात नास्तिकांचा, मुक्तचिंतकांचा मेळावा भरला. ‘वुई दी ब्राइट्स’ आयोजित या मेळाव्यातील नास्तिक थोडासा वेगळा वाटला. दुर्मुखलेला नव्हे, तर खुल्या चर्चेसाठी तयार असणारा, प्रबोधन करू इच्छिणारा, विज्ञानवादी दृष्टिकोन बाळगणारा नास्तिक या मेळाव्यातून समोर येऊ पाहात होता, त्याचा हा आढावा. या परिषदेतील पहिला उद्घोष म्हणजे बुद्धिप्रामाण्यवादाचा. नास्तिक म्हणजे बुद्धिप्रामाण्यवादी आणि बुद्धिप्रामाण्यवाद म्हणजे नास्तिक असे हे समीकरण दृढ करण्याचा प्रयत्न मेळाव्यात झाला. अंधश्रद्धा निर्मूलन समिती देव, धर्माविरोधात ठोस आणि आक्रमक भूमिका घेत नाही. त्यामुळे या नव्या व्यासपीठाची निर्मिती केल्याचे संयोजकांनी या वेळी स्पष्ट केले. स्वत:ला ब्राइटस् असे संबोधणाऱ्या या नास्तिकांनी स्वत:ला हुतात्मा भगत सिंगांचे अनुयायी घोषित केले. आम्ही भगतसिंगाच्या विचाराने चालतो, अशी घोषणा करणाऱ्या या मुक्तचिंतकांनी खरेच भगत सिंग पचविला का, हा प्रश्नच आहे. ‘मी नास्तिक का आहे?’ या लेखात निरअहंकारी, खोल आणि गंभीर विचारांचा नास्तिक भगतसिंग आपल्याला भेटतो. आपल्या विचारांवर दृढ आणि स्पष्ट. नेमका त्याचाच अभाव मेळाव्यात प्रकर्षाने जाणवला. एकीकडे अहंकारी नाही म्हणायचे आणि दुसरीकडे दुसरीकडे स्वत:च्या बुद्धिप्रामाण्यवादाचा प्रत्येक वाक्यासरशी ‘उदो... उदो’ करायचा. शिवाय, नास्तिकांचा मेळावा मध्येच बेमालूमपणे राजकीय वळणेही घ्यायचा. त्यामुळे मेळावा नास्तिकांचा होता की, विशिष्ट राजकीय विचारसरणी जोपासणाऱ्यांचे गेट टुगेदर याचे उत्तर ‘ब्राइटस्’च्या भावी वाटचालीतून मिळेलच. परिषदेच्या शेवटी आपल्या धर्मनिरपेक्ष देशात भारतीय दंडविधानातील कलमे १५३ अ, २९५ अ, आणि २९८ या ब्रिटिशकालीन कायद्यांच्या अन्यायकारक तरतुदींचे अस्तित्व नष्ट करून, या कलमांना कायद्यातून रद्द करावे आणि त्यामध्ये घटनात्मक दुरुस्ती करावी, यासाठी लोकशाही मार्गाने लढा देण्यचा संकल्प ब्राइट्सने केला.एकंदर राजकीय सूर लावणारे हे मुक्तचिंतक म्हणजे अज्ञेयवादी, विवेकवादी, बुद्धिप्रामाण्यवादी वगैरेच आहेत, असा समज बाळगायला हरकत नाही. अहंकार नाही हे वदवून घेतले‘माझ्यात अहंकार नाही’ हे नास्तिक मेळावा आयोजकांनी सर्व नास्तिकांकडून वदवून घेतले. नास्तिक म्हणजे उर्मट असा सर्वसाधारण समज चुकीचा ठरविण्यासाठी आयोजकांनी आम्ही अहंकारी नसल्याची जणू या माध्यमातून घोषणाच केली.नास्तिक परिषदेमागची कारणेजनसामान्यांमध्ये नास्तिकांबद्धल जी वाईट आणि चुकीची मते आहेत, ती बदलण्यासाठी, ज्ञानाचे आदान-प्रदान करण्यासाठी, सर्व नास्तिकांच्या विचारांना व्यासपीठ मिळावे, म्हणून विविध उपक्रम राबविण्यासाठी ही परिषद घेण्यात आली. नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्येमागचा प्रवास येथे मांडला, नास्तिकांसदर्भात राज्यासह जगभरातील परिस्थितीबद्दल अनुभव मांडले. अंनिसमधून जन्माला आलेली वेगळी संघटनाया परिषदेमध्ये एक गोष्ट स्पष्ट झाली की, हे स्वत:ला ब्राइट्स म्हणवणारे तरुण अंनिसमधून बाहेर पडले आहेत. अंनिस धर्मविरोधी देवविरोधी भूमिका घेत नाही, ती घेता यावी, म्हणून ‘ब्राइट्स’चा जन्म झाला आहे. ‘ब्राइट्स’ म्हणजे असे नास्तिक जे सर्व अलौकिक, सुपरनॅचरल शक्तीचे अस्तित्व नाकारतात व ते निसर्गाच्या नियमाने चालतात. प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक दृष्टिकोनाने शोधतात. धर्माचा अभौतिक भाग नाकारतात. सत्यनारायण, पाप-पुण्य, स्वर्ग-नरक या सर्व गोष्टी ‘ब्राइट्स’ नाकारतात.