शहरं
Join us  
Trending Stories
1
भल्या भल्यांना नाही जमले ते आज एलन मस्कनी करून दाखविले; ६०० अब्ज डॉलर संपत्ती असलेले जगातील पहिले व्यक्ती बनले
2
व्होडाफोनने सर्वांवर कडी केली! फोन हरवला, चोरी झाला... रिचार्जसोबतच २५००० चा विमा, ते ही ६१ रुपयांत...
3
२५ जणांच्या राखरांगोळीस जबाबदार असणारे लुथरा बंधू भारताच्या ताब्यात; थायलंडहून आज दुपारी आणले जाणार
4
“पृथ्वीराज चव्हाण हे जगातील सर्वांत मोठे भविष्यवेत्ते आहेत”; भाजपा नेत्यांचा पलटवार
5
शेअर बाजारात कंपनी आधीच बॅन, आता चर्चेतील 'या' फिनफ्ल्युएन्सरवर SEBI ची मोठी कारवाई; प्रकरण काय?
6
"मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई, मुंबई वाचवायला..."; संजय राऊतांचा भाजपा-शिंदेसेनेवर निशाणा
7
भाजपासोबत युती तुटताच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींना वेग; बैठका सुरू
8
Crime: लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं गाडीत बसवलं, दारू पाजली, निर्जनस्थळी नेऊन जिवंत जाळलं! 
9
"मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या...", BMC ची निवडणूक जाहीर होताच ठाकरे बंधुविरोधात झळकले बॅनर्स
10
विश्वचषक विजेत्या श्रीलंकन कर्णधाराला अटक होणार; अर्जुन रणतुंगा पेट्रोलियम घोटाळ्याप्रकरणी अडचणीत
11
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८३,६५२ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीमचे डिटेल्स
12
Yamuna Expressway Accident: ७ बस, ३ कारचा थरकाप उडवणारा अपघात! चार प्रवाशांचा जळून मृत्यू
13
१६ डिसेंबरपासून धनु संक्रांत सुरु; एकीकडे थंडी, तर काही देशात युद्धजन्य स्थितीमुळे तणाव वाढणार!
14
Stock Market Today: शेअर बाजाराच्या कामकाजाची मोठ्या घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ३०० तर निफ्टी १०० अंकांनी घसरला
15
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
16
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
17
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
18
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
19
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
20
धनुर्मासारंभ: ९ राशींना शुभ काळ, सूर्यकृपेने दुप्पट लाभ; पद-पैसा वाढ, धनुसंक्रांती ठरेल खास!
Daily Top 2Weekly Top 5

तरुण संशोधकांना ऊर्जा देणारा खगोलशास्त्रातला ज्ञानवृक्ष!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 00:03 IST

खोडद येथील ‘जीएमआरटी’ या प्रचंड दुर्बिणीची उभारणी ही सर्वार्थाने त्यांची मोलाची कामगिरी म्हणता येईल.

अंतराळ संशोधनाचा ध्यास घेतलेले डॉ. गोविंद स्वरूप यांचं कार्य नव्वदीतही उत्साहात सुरू आहे. त्यांचे शंभराहून अधिक शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. अनेकांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. संपादन केली आहे. त्यांचं एकूणच जीवन आणि कार्य तरुणांना ऊर्जा देत राहील...भारतात प्राचीन काळापासून आकाशातील ग्रह-ताऱ्यांचा अभ्यास केला जातो आहे. पण अलीकडे खगोलशास्त्र आणि त्याची निरीक्षणं ही सामान्य माणसाच्या चर्चेचा आणि उत्सुकतेचा विषय बनली आहेत. ज्या अनेक शास्त्रज्ञाचं या क्षेत्राला अपूर्व योगदान लाभलं, त्यातलं एक ठळक नाव म्हणजे डॉ. गोविंंद स्वरूप! Men love to wonder, and that is the seed of our science असं इमर्सननं म्हटल्याप्रमाणं ऐन तारुण्यात त्यांच्या मनात रेडिओ-खगोलशास्त्रातील विज्ञान कुतूहल जागं झालं. त्यातूनच पुढे भारतातील रेडिओ-खगोलशास्त्रातील विकासाचा देदीप्यमान इतिहास घडला!उत्तर प्रदेशातील ठाकूरद्वार येथे २३ मार्च १९२९ रोजी जन्मलेले गोविंंद स्वरूप हे भौतिकशास्त्राचे विद्यार्थी! या शास्त्रातील पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी चार वर्षे दिल्लीतील राष्ट्रीय भौतिकशास्त्र प्रयोगशाळेत, दोन वर्षे आॅस्ट्रेलियातील राष्ट्रकुल वैज्ञानिक आणि संशोधन संघटनेत आणि एक वर्ष अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठात संशोधनात्मक कार्य केले. त्यानंतर अमेरिकेतील स्टॅन्फर्ड विद्यापीठातून ‘रेडिओ अ‍ॅस्ट्रॉलॉजी’ या विषयात पीएच.डी. प्राप्त केली. नोकरीसाठी अमेरिकेत न रमता त्यांनी मायदेशाची वाट धरली आणि १९६३ मध्ये ते दिल्लीतील ‘टाटा मूलभूत संशोधन संस्थे’त रुजू झाले. पुढे १९८९ मध्ये या संस्थेने पुणे येथे ‘नॅशनल सेंटर फॉर रेडिओ अ‍ॅस्ट्रोफिजिक्स’ (एनसीआरए) हे केंद्र स्थापन केले. त्याच्या संचालकपदाची जबाबदारी त्यांच्याकडेच आली. ते या केंद्रात १९९९ पर्यंत कार्यरत होते. रेडिओशास्त्रातील मूलभूत संशोधनासाठी आपल्या देशात रेडिओ दुर्बिणी असण्याची गरज ओळखून त्यांनी तामिळनाडूमधील उटी आणि महाराष्ट्रात नारायणगावजवळच्या खोडद येथे वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रचंड रेडिओ दुर्बिणींची उभारणी केली. खोडद येथील ‘जीएमआरटी’ या प्रचंड दुर्बिणीची उभारणी ही सर्वार्थाने त्यांची मोलाची कामगिरी म्हणता येईल. सहा मीटरपर्यंत लांबीच्या रेडिओलहरींचे निरीक्षण करू शकणारी ही दुर्बिण अंतराळातल्या अतिदूरवरच्या हायड्रोजनच्या विद्युतभारित अणूंचा वेध घेऊ शकते. मोठ्या तरंगलांबीच्या रेडिओलहरींची निरीक्षणे करणारी ३५ डिश अ‍ॅन्टिना असलेली ही जगातली सर्वांत मोठी दुर्बिण ठरली आहे. अंतराळविषयक संशोधन हाच ध्यास आयुष्यभर बाळगलेल्या त्यांच्या संशोधनकार्याने त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सन्मानांनी विभूषित करण्यात आलं आहे. ‘हिस्ट्री आॅफ ओरिएंटल अ‍ॅस्ट्रॉनॉमी’ आणि ‘क्वासार’ ही त्यांची पुस्तके अनेकांना मार्गदर्शक ठरली आहेत.  Unless we combine undergraduate education with research and experiments in all disiplines, we can not expect our universities to become world-class असं निग्रहानं प्रतिपादन करणाºया आणि त्यासाठी तळमळीने झटणाºया डॉ. स्वरूप यांनी आजवर हजारो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आहे. त्यांचे शंभराहून अधिक शोधनिबंध प्रसिद्ध झाले असून, अनेकांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. मिळवली आहे. त्यांचं एकूणच जीवन आणि कार्य तरुणांना सतत उमेद आणि ऊर्जा देत राहील. आकाशाकडे दृष्टी ठेवून जगत आलेला हा असामान्य बुद्धिमत्तेचा वैज्ञानिक नव्वदीत पर्दापण करताना मानवी जीवनाकडेही तितक्याच कुतूहलाने पाहत आहे. जिज्ञासा जागवत आहे...- विजय बाविस्करvijay.baviskar@lokmat.com 

टॅग्स :scienceविज्ञान