शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
2
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
3
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
4
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
5
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
6
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
7
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
8
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
9
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
10
जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघे जखमी
11
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
12
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
13
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
14
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
15
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
16
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
17
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
18
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
19
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
20
आदिवासी भागातून UPSC परीक्षेत यश मिळवणारे पहिलेच युवक; इंटरनेटवरील व्हिडीओद्वारे केला अभ्यास

विश्वाशी एकरूप झालेले गुरुदेव टागोर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2022 06:20 IST

आज संपूर्ण जगातच राजकारणासाठी माणुसकीला तिलांजली देण्यात येत आहे. माणसा-माणसांत द्वेष पसरविण्यात येत आहे. धर्मा-धर्मांत तेढ निर्माण केली जात आहे. अशा परिस्थितीत माणसाला योग्य मार्ग दाखविण्याचे सामर्थ्य गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या लिखाणातून मिळू शकते. 

एम. जी. बेग, लोकमत संदर्भ विभाग, नागपूरआज संपूर्ण जगातच राजकारणासाठी माणुसकीला तिलांजली देण्यात येत आहे. माणसा-माणसांत द्वेष पसरविण्यात येत आहे. धर्मा-धर्मांत तेढ निर्माण केली जात आहे. अशा परिस्थितीत माणसाला योग्य मार्ग दाखविण्याचे सामर्थ्य गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या लिखाणातून मिळू शकते. गुरुदेव टागोर म्हणतात, मानव हा अखिल विश्वाचा रहिवासी आहे. देशाच्या भौगोलिक सीमा अथवा भाषांची बंधने त्याला जखडून ठेवू शकत नाहीत. देशाच्या सीमा, देशभक्ती, प्रखर राष्ट्रवाद या कल्पना म्हणजे माणसाने केलेल्या चुकाच आहेत.. असे मानवतावादी विचार गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी आपल्या साहित्यातून पदोपदी व्यक्त केले आहेत. ‘गीतांजली’च्या एका कवितेत ईश्वराकडे याचना करताना ते म्हणतात, ‘जिथे मनाला भीती शिवत नाही आणि मस्तक उन्नत आहे; जिथे ज्ञान मुक्त आहे; जिथे समाज दुभंगलेला नाही, जिथे पूर्णत्व प्राप्तीसाठी अखंड उद्यमशीलता आपले बाहू पसरत आहे; जिथे रूढीचं वाळवंट विचारांचा निर्मळ प्रवाह ग्रासून टाकत नाही; अशा स्वातंत्र्याच्या स्वर्गात हे ईश्वरा, माझा देश जागृत होऊ दे.’  या महाकवीचे स्वातंत्र्याचे स्वप्न असे मंगल आणि उदात्त होते. त्यांनी संपूर्ण विश्वाला आपला संसार आणि सर्व मानवजातीला आपली जात मानले. रवींद्रनाथ  हे केवळ कल्पनेत रमणारे कवी नव्हते, आपल्या देशातील अभावग्रस्त जनतेच्या भावनांशी ते पूर्णपणे जुळलेले होते. रवींद्रनाथ टागोर यांना १९१३ साली उत्कृष्ट साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळाले. हा मान मिळविणारे आशिया खंडातील ते पहिले साहित्यिक होत. पारितोषिकाच्या रूपाने मिळालेले सव्वा लाख रुपये त्यांनी शांतिनिकेतनला देणगी म्हणून दिले. रवींद्रनाथ मनुष्याच्या सर्वांगीण स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते. रवींद्रनाथांनी विश्वभारती विद्यापीठाची स्थापना केली. ‘हे विश्वची माझे घर’ अशी जाणीव प्रत्येक माणसाच्या मनात निर्माण करणे हे विश्वभारतीचे ध्येय होते. सखोल तत्त्वचिंतन, वैज्ञानिक दृष्टी, संपन्न अभिरुची, मानवतावाद या साऱ्या गोष्टी रवींद्रनाथांच्या व्यक्तिमत्त्वात एकवटलेल्या होत्या. या एकत्वाचा आविष्कार म्हणजेच जन-गण-मन हे त्यांचं गीत. स्वतंत्र भारताने त्याचा राष्ट्रगीत म्हणून स्वीकार केला. देश स्वतंत्र झालेला पाहण्याचे भाग्य मात्र त्यांना लाभले नाही. ७ ऑगस्ट १९४१ रोजी हा महाकवी अनंतात विलीन झाला. आपल्या देशाला धर्मांध राजकारणाच्या दलदलीतून बाहेर काढून जगण्याचा एक आदर्श निर्माण करणे हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल.

टॅग्स :Ravindranath Tagoreरवींद्रनाथ टागोर