शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

घोषणा पुरे, आॅपरेशन करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2015 22:24 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर अधिवेशनाच्या निमित्ताने प्रत्येक जिल्ह्याच्या आढावा बैठका घेतल्या. बैठकांच्या निमित्ताने अधिकाऱ्यांची नकारात्मक वृत्ती समोर आली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर अधिवेशनाच्या निमित्ताने प्रत्येक जिल्ह्याच्या आढावा बैठका घेतल्या. बैठकांच्या निमित्ताने अधिकाऱ्यांची नकारात्मक वृत्ती समोर आली. एक तर काम करायचे नाही, केलेच तर येणारी फाईल निर्णय न घेता पुढे ढकलायची किंवा काही ना काही त्रुटी काढून परत पाठवून द्यायची अशी कार्यपद्धती रूढ होऊ लागली आहे. राज्यातले प्रशासकीय वातावरण पुरते बिघडून गेले असून, त्यावर नियंत्रण आणणे दिवसेंदिवस कठीण होत जाणार आहे. जलसंपदा आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गैरव्यवहारात विशिष्ट अधिकाऱ्यांना अडकवण्यात आले; मात्र राजकीय नेत्यांनी आपल्या माना सोडवून घेतल्या, त्यातून अधिकारी शहाणे झाले. वेळ आली की आम्हीच अडकणार असू तर काम न केलेले बरे असे म्हणत त्यांचे काम न करणे सुरू झाले, तर काही अधिकारी मंत्र्यांचाही मुलाहिजा ठेवायला तयार नाहीत. मंत्रालयीन कार्यपद्धतीच माहिती नसलेले मंत्री आणि अनुभवशून्य खासगी सचिव यांच्या बळावर काही मंत्र्यांना त्यांच्याकडे येणाऱ्या फाईली ओव्हररुल कशा करायच्या याचाही अभ्यास नसल्याचा फायदा घेत वाट्टेल ती कामे, आपल्या मनाप्रमाणे काही अधिकारी करू लागले आहेत. तिसरीकडे चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासारखे मंत्री अधिकाऱ्यांना कस्पटासमान वागणूक देत ज्या पद्धतीने ऊर्जा विभाग चालवत आहेत ते पाहता राज्य सरकारच्या कारभाराचा एखादा मोठा स्फोट घडणे दूर नाही. नागपूर अधिवेशनाच्या निमित्ताने नागपुरात वेगवेगळ्या लोकांना भेटता, बोलता आले. वाळू, खडीची कामे ठरावीक मंत्र्यांच्या बगलबच्च्यांनाच कशी दिली जातात याच्या सुरस कथा ऐकायला मिळाल्या. दोन ब्रास वाळूचा साठा करता येईल असा आदेश काढायला लावला गेला आणि एका मंत्र्यांच्या आशीर्वादाने १८ हजार ब्रास वाळूचा साठा त्याच्याच बगलबच्च्यांनी करून ठेवला. आता नवीन टेंडर निघू नये म्हणून फिल्डिंग लावण्यात आली आहे आणि टेंडर लांबले, नवीन वाळू बाजारात येऊ शकली नाही की साठा केलेली वाळू वाट्टेल त्या दराने विकता येईल असे प्लॅनिंग एका नेत्याने समजावून सांगितले. नागपुरात मेट्रो येत आहे. तिच्या वाळू आणि खडीचे काम आमच्याच कार्यकर्त्यांना मिळाले पाहिजे अशी दादागिरी काहींनी जाऊन केल्याच्या कथाही ऐकायला मिळाल्या. हे खरे असेल व मुख्यमंत्र्यांच्या गावात घडत असेल तर परिस्थिती बिघडत चाललीय हे सांगायला ज्योतिषाची गरजच नाही.मुख्यमंत्री खूप चांगले आहेत, त्यांना काम करण्याची प्रामाणिक इच्छा आहे; पण त्यांच्याच जिल्ह्यात अशा गोष्टी घडत असतील तर हा विरोधाभास त्यांनाच एक दिवस अडचणीत आणेल. वारंवार त्यांना संताप व्यक्त करावा लागावा हे सरकारचा प्रशासनावरील अंंकुश बोथट होऊ लागल्याचे लक्षण आहे. वेळीच वेसण घातली गेली नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाईल.महसूल, नगरविकास, ऊर्जा अशा खात्यात ठरावीक अधिकारी वर्षानुवर्षे फिरत आहेत. त्यातून त्यांचे साटेलोटे तयार झाले आहे. ते निर्दयपणे फोडावे लागेल. पायाला गँगरीन झाले तर प्रसंगी पाय तोडावा लागतो. त्या पायावर प्रेम करत बसल्याने जीव जाण्याची वेळ येते, तीच रीत येथे लागू होते. चार घोषणा कमी झाल्या तरी चालतील, पण केलेल्या घोषणा आणि घेतलेले निर्णय राबवले जात आहेत की नाही याचा कठोरपणे आढावा घ्यावाच लागेल. अन्यथा घोषणा, निर्णय कागदावरच राहतील आणि पुढच्यावेळी मागचाच जाहीरनामा नव्याने छापून द्यायची वेळ येईल. जाता जाता : ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी अधिवेशनात छायाचित्रकार, पत्रकारांसाठी, जेवणाची व्यवस्था केली आणि अशी सोय करणारे एकमेव मंत्री असल्याची प्रेसनोटही पाठवली. धन्य ते बावनकुळे आणि धन्य त्यांचे पीआरओ... - अतुल कुलकर्णी