शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

भाष्य - नासाडी थांबवा

By admin | Updated: June 3, 2017 00:16 IST

गेल्या दोन दिवसांपासून शेतकरी संपावर गेल्याने शहरवासीयांची नाकाबंदी झाली असून, संपामुळे सरकारला घाम फुटावा इतका तीव्र

गेल्या दोन दिवसांपासून शेतकरी संपावर गेल्याने शहरवासीयांची नाकाबंदी झाली असून, संपामुळे सरकारला घाम फुटावा इतका तीव्र संप करण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे. आपल्या दाराला आलेल्या पाहुण्याला पोटभर खाऊ घालणे किंवा पिकलेला माल मनापासून दान करण्यासारखं मोठं मन बळीराजाशिवाय कुणाकडेच नाही. पण आज निसर्ग आणि बाजारभावाच्या चकव्यूहात बळीराजा देशोधडीला लागण्याची वेळ आली आहे. मोबाइल, पेट्रोलसारख्या बाबींवर मनसोक्त खर्च करणारा ग्राहक नेमके भाजीपाला व शेतमाल खरेदी करतानाच नाक मुरडतो. त्यामुळे शेतमालाला भाव मिळत नाही. उत्पादन खर्चात आणि महागाईतही वाढ झाल्याने आता हे ओझे शेतकऱ्याला पेलवणारे नाही. स्वत:च उपाशी असलेला राजा दुसऱ्यांना काय दान देणार? गेल्या दोन दिवसांत शेतकरी संपामुळे शहरांकडे येणारे दूध व भाजीपाल्यासह शेतमालाची आवक मंदावली आहे. जी आवक होते ती रस्त्यावर फेकून दिली जात आहे. दूध रस्त्यावर ओतून दिले जात आहे. विषय सरकारला घाम फोडण्याचा असला, तरी भाजीपाला रस्त्यावर फेकताना आणि दूध ओतून देताना श्ोतकऱ्यांच्या आतड्याला किती पीळ पडतोय याची सरकारला कल्पना यायला हवी. एखादा पाऊस पडला की काळ्या आईची ओटी भरून तो आईसमोर नतमस्तक होतो. पिकाला पोटच्या लेकराप्रमाणे जपून वेळ अमावास्येला पिकाची पूजा करणाऱ्या शेतकऱ्याला आज शेतमाल फेकून देताना किती वेदना होत असतील याची कल्पना करवत नाही. गोमातेला आईप्रमाणे सांभाळून तिचे दूध तिच्या वासराला न पाजता तुमच्या लेकराला पोच करणाऱ्या शेतकऱ्याला दूध रस्त्यावर ओतताना वासराचा अन् गायीचा हंबरडा कानात घुमल्याशिवाय राहत नाही. शेती आमची आई अन् बाप आहे, अशी भावना असलेला बळीराजा आईबापापासून कधीही तुटणे शक्य नाही. शेत परवडेना म्हणून विकून टाकावे असा विचारही मनात येत नाही. इतकं अतूट नाते असलेला बळीराजा संपावर गेला अन् आपल्या पिकांची नासाडी करू लागला. यामुळे सरकारला घाम फुटेल की नाही हे माहीत नसले, तरी शेतमालाची नासाडी करणे कदापिही व्यवहार्य ठरणारे नाही. आजही कित्येक बाळांना पुरेसे दूध मिळत नाही. मग ते आपले असो वा गायीचे. नासाडी करण्याऐवजी तिच्या अन् आपल्या बाळाला ते पाजलेलं कधीही चांगलं. भाजीपाला फेकून देण्याऐवजी जनावरांना चारा म्हणून खाऊ घालावा. पण नासाडी ही शेतकऱ्याला पचणारी अन् शोभणारी बाब नव्हे.