शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

लाइफलाइनला हवा पर्याय

By admin | Updated: June 26, 2016 04:05 IST

लोकलने प्रवास करणारे मुंबई उपनगरीय लोकलचे ७0 लाख प्रवासी सकाळी घराबाहेर निघतात ते टेन्शन घेऊनच. घर, कार्यालय, कुटुंब असे सगळेच ओझे त्यांच्या डोक्यावर असते. पण त्यातही एक

- राजेंद्र आकलेकरलोकलने प्रवास करणारे मुंबई उपनगरीय लोकलचे ७0 लाख प्रवासी सकाळी घराबाहेर निघतात ते टेन्शन घेऊनच. घर, कार्यालय, कुटुंब असे सगळेच ओझे त्यांच्या डोक्यावर असते. पण त्यातही एक छोटासा भाग असतो तो दररोजच्या लोकल प्रवासाचा. गेल्या काही महिन्यांपासून अनेक तांत्रिक कारणांमुळे उपनगरीय लोकल सेवा विस्कळीत होत आहे. त्यामुळे रेल्वेकडून होणाऱ्या देखभाल-दुरुस्तीबरोबरच, रेल्वे मालमत्तेची सुरक्षा व्यवस्था आदी प्रश्न उपस्थित झाले. महत्त्वाची बाब म्हणजे रेल्वे व्यवस्थेवरही मोठा ताण पडत असून, ती व्यवस्था सांभाळताना रेल्वेच्याच नाकीनऊ येत आहेत.रेल्वे स्थानकांवर येताच लोकल उशिराने धावत असल्याची होणारी उद्घोषणा, त्यातच या उद्घोषणेतून मागण्यात येणारी माफी, तोपर्यंत स्थानकावर वाढत जाणारी गर्दी आणि पर्याय नसल्याने रिक्षा, टॅक्सी किंवा बसने कार्यालय गाठण्याची होत असलेली घाई. प्रवाशांना भुर्दंड पडतानाच ट्राफिकच्या वेगळ्या समस्येला तोंड द्यावे लागते. रेल्वेची रोजची ही समस्या मागील काही महिन्यांपासून उपनगरीय प्रवासी पाहत आहे. कधी ओव्हरहेड वायर तुटली, तर कधी रुळाला तडा, कधी बॅटरी चोरीला गेल्याने सिग्नल यंत्रणेत बिघाड तर कधी इंजीनच बिघडले. काही ना काही कारणामुळे मुंबई उपनरीय ‘लाइफलाइन’ थांबतच आहे. याची खंत ना रेल्वे अधिकाऱ्यांना की लोकप्रतिनिधींना. रेल्वेच्या तांत्रिक कामांसाठी आठवड्यातून एकदा मेगाब्लॉक घेतला जातो. तरीही अनेक समस्या उद्भवतात. हा ब्लॉक घेऊनही फायदा होत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उत्पन्न देणारी उपनगरीय सेवा वेळेवर का धावू शकत नाही, असा प्रश्न उपस्थित होतो. जमत नसेल तर लोकल चालवू नका, पण हा रोजचा त्रास नको, अशीच काहीशी प्रतिक्रिया प्रवाशांमध्ये उमटत आहे. म्हणे बुलेट ट्रेन चालवणार... त्याची स्पप्न रंगवताना सध्या मुंबईकर असाच भरडत जात आहे. दिवा स्थानकात प्रवाशांकडून दोन वेळा तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर यापुढे आणखी तीव्र प्रतिक्रिया उमटू नये यासाठी रेल्वेने वक्तशीरपणा सुधारणे गरजेचे आहे. रेल्वेचीही क्षमता संपलीमुंबईची जीवनरेखा समजल्या जाणाऱ्या मुंबईच्या लोकलची स्थिती अशी का झाली आहे? मुंबईत दोन रेल्वे. मध्य रेल्वेवर लोकलच्या दररोज १,६00 फेऱ्या तर पश्चिम रेल्वेमार्गावर १,२00 फेऱ्या होतात. या साधारण ३२० किलोमीटरमध्ये फिरत असतात आणि एवढ्या लोकल चालविण्यासाठी दोन्ही रेल्वेकडे स्वतंत्र असे ट्रॅक नाहीत. त्यावरच बाहेरगावच्या साधारण २00 गाड्या आणि ५0 ते ७0 मालगाड्या दिवसातले २० तास धावतात. ही आकडेवारी पाहिल्यास मुंबईतील रेल्वेचा आवाका समजून येईल. एकामागोमाग एक एवढ्या ट्रेन मुंबईच्या रेल्वे यंत्रणेत धावतात. एखाद्या यंत्रणेत बिघाड झाला किंवा एक जरी ट्रेन थांबली तर त्याचा परिणाम मागील सर्व सेवांवर होतो. एखादी ट्रेन धीम्या मार्गावरून जलद मार्गावरून वळवली तर त्यानंतर ट्रेनच्या रांगाच रांगा लागतात. एक गोष्ट समजून घ्यावी लागेल की, मुंबई रेल्वेची क्षमता आता संपली आहे. अनेक वर्षे राजकीय दडपणामुळे ट्रेनची संख्या एवढी वाढवून ठेवली आहे की, रेल्वेच्या संपूर्ण यंत्रणेला श्वास घेण्यासाठी जागा उरली नाही. एक बिघाड किंवा एखाद्या क्षुल्लक कारणामुळे संपूर्ण रेल्वे यंत्रणा ठप्प होते. एखादी गोष्ट आपण अति वापरली की त्याचा मेगाब्लॉक किंवा देखभाल-दुरुस्ती करूनही जास्त फायदा होत नाही.उदाहरणार्थ, एक जलद लोकल कल्याणहून मुंबईला निघाली की ती फक्त डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा येथेच थांबते. मात्र जलद लोकलची धाव पाहिल्यास तिचा वेग हा कमीच असतो. यात रेल्वेकडून उत्तर दिले जाते ते ठाकुर्ली आणि दिवा येथे असलेले फाटक हे दिवसातून तीन ते पाच मिनिटे बराच वेळा उघडावे लागते. त्यामुळे या मार्गावरील लोकलचा वेग हा मंदावतो आणि जलद लोकल असून, त्या जलदपणे धावत का नाहीत, असा प्रश्न पडतो. दुसरीकडे तांत्रिक बिघाडांमुळे त्या लेट धावतात. कधी ओव्हरहेड वायर तुटते, तर कधी पॉइंट फेल होतात आणि एक ट्रेन थांबली की सर्व ट्रेन खोळंबतात. यातून वाहतूक सुरळीत होत असेल तर कोणीतरी रूळ ओलांडताना, तर लोकलच्या टपावरून प्रवास करताना किंवा ट्रेनमधून खाली पडल्याने लोकलच्या वाहतुकीला फटका बसतो. या समस्यांना तोंड द्यावे लागत असतानाच इंजीन किंवा ट्रेनमधील बिघाडांना सामोरे जावे लागते. असा कोणताही दिवस जात नाही की यातील कोणतीही समस्या आल्याशिवाय ट्रेन सुरळीत धावत आहे. पावसाळ्यात तर या समस्या आणखी वाढतात.आता ‘मुंबईची लाइफलाइन’ म्हणून ओळखली जाणारी रेल्वे मोठ्या प्रमाणात येणाऱ्या तणावामुळे कोलमडू लागली आहे. बेस्ट बस राजकारण्यांमध्ये अडकली आहे. आता सरकारने ११ किलोमीटरची मेट्रो लाइन सुरू केली आणि एक मोनोरेलचा प्रयोग. पण मेट्रोदेखील खासगी कंपनीला दिल्यामुळे ती दिल्लीसारखी अजूनही लोकप्रिय होऊ शकली नाही. त्यावरही बरीच चर्चा होताना दिसते. मोनोरेल तर फक्त पिकनिक स्पॉट होऊन बसले आहे. एकावर एक रिपोर्ट आणि बजेट बनविण्यात येतात. मेट्रो ३, ४, ७ असे नंबर टाकून नकाशावर ओळी ओढून आराखडे तयार करण्यात येतात; पण वास्तवात काहीच नाही. लखनौ आणि कानपूरसारख्या शहरात मेट्रो आता सुरू होतील. पण मुंबईकरांना २0२0ची वाट पाहावी लागेल. आता उशीर झाला आहे आणि रेल्वेला पर्याय हवा आहे. लाइफलाइन कोलमडत आहे. गर्दीमुळे रोज १० लोकांचा बळी जात असून, सरकारने मुंबईसाठी त्वरित काहीतरी करायला हवे ही अपेक्षा प्रवाशांनी बाळगली आहे. जबाबदार कोण? : मुळात या रेल्वेने एवढ्या ट्रेन चालवणे आणि एवढी प्रवासी संख्या असणे चुकीचेच आहे. मुंबई शहराच्या ट्रान्सपोर्टची महाराष्ट्र सरकारने कधीच जबाबदारी घेतली नाही. जे इंग्रजांनी आणले तेच चालू ठेवले. मग ती रेल्वे असूदे की बेस्ट बस आणि टॅक्सी असूदे की व्हिक्टरची घोडा गाडी. उलट महाराष्ट्र सरकारने चालू असलेली ट्राम गाडीसारखी साधने बंद (१९६४ मध्ये) केली. मग मुंबईची रेल्वे केंद्र सरकारची, बेस्ट पालिकेचे, टॅक्सी आणि रिक्षांवर नियंत्रण तर अन्य लोकांचे. कोणाचेही कोणाबरोबर ताळमेळ नाही. प्रत्येकाचे व्हिजन वेगळेच आहे. वाहतुकीत एखादा प्रश्न उपस्थित झाला की एकमेकांकडे बोटे दाखवली जातात. मुंबई ट्रान्सपोर्टचा प्रश्न म्हटला की मुंबईचे खासदार रेल्वेमंत्र्यांवर दबाव आणणार आणि आपले कार्य साधून घेणार. कोणीही या शहराच्या परिवहनासाठी व्यापक कृती कधी केलीच नाही. विचार मांडले, सर्वांनी फक्त अहवाल बनवले. मात्र नवी वाहतूक यंत्रणा उभी करण्यासाठी ठोस पावले उचलली नाहीत. एकत्रित ट्रान्सपोर्ट यंत्रणेची गरज : रेल्वेची यंत्रणा कोलमडली तर मोठ्या संख्येने असलेल्या प्रवाशांना त्याची माहिती लवकरात लवकर देणे ही त्यांची जबाबदारी आहे. उद्घोषणा आणि इंडिकेटर्स यापलीकडे जाऊन रेल्वेने प्रवाशांना खरी परिस्थिती समजून द्यायला हवी. जेणेकरून प्रवासी इतर पर्यायी मार्ग शोधतील आणि स्टेशनवर गर्दी करणार नाहीत. लंडनसारख्या शहरात ‘ट्रान्सपोर्ट फॉर लंडन’ ही संस्था सर्व ट्रान्सपोर्ट अंग एकत्रित चालवते. समजा रेल्वे बंद असेल तर त्याची त्वरित घोषणा करून त्यांचे १, २, ३ हे पर्याय आहेत असे लगेच कळवते. आपल्याकडे गोंधळ जास्त असतो आणि खरी परिस्थिती त्वरित कळत नाही. एसएमएस, मोबाइल अ‍ॅप आणि वेबसाईट्स आता डेव्हलप होत आहेत. पण त्यांचा प्रसार मर्यादित आहे. मुंबईला एका एकत्रित ट्रान्सपोर्ट यंत्रणेची गरज आहे.एकावर एक रिपोर्ट आणि बजेट बनविण्यात येतात. मेट्रो ३, ४, ७ असे नंबर टाकून नकाशावर ओळी ओढून आराखडे तयार करण्यात येतात; पण वास्तवात काहीच नाही. लखनौ आणि कानपूरसारख्या शहरात मेट्रो आता सुरू होतील. पण मुंबईकरांना २0२0ची वाट पाहावी लागेल.

(लेखक रेल्वे विषयातील तज्ज्ञ आहेत.)