शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा एकदा विदर्भवादी पक्ष

By admin | Updated: September 27, 2016 05:13 IST

विदर्भ वेगळा काढल्यास, उर्वरित महाराष्ट्रात अडगळीत पडण्याची भीती भाजपा व कॉंग्रेसला वाटते. त्याचा त्यांना फार फरक पडणारही नाही; पण देशाची आर्थिक राजधानी असलेल्या

- रवी टालेविदर्भ वेगळा काढल्यास, उर्वरित महाराष्ट्रात अडगळीत पडण्याची भीती भाजपा व कॉंग्रेसला वाटते. त्याचा त्यांना फार फरक पडणारही नाही; पण देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर पाणी सोडावे लागेल, ही त्यांची खरी चिंता आहे.आजोबा बापूसाहेब अणे यांनी बघितलेले वेगळ्या विदर्भ राज्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्याचा विडा उचललेले महाराष्ट्राचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी स्वतंत्र राजकीय पक्षाच्या स्थापनेची घोषणा केली आहे. विदर्भ राज्यासाठी स्वातंत्र्यापासूनच सुरू असलेल्या चळवळीचा झेंडा, गत काही काळापासून, अणे प्रणित विदर्भ राज्य आघाडी या संघटनेने खांद्यावर घेतला आहे. आता त्या संघटनेला राजकीय पक्षात परिवर्तित करण्यात आले आहे. वेगळ्या विदर्भ राज्याच्या मुद्यावर निवडणुका जिंकून दाखवून, वैदर्भीय जनतेला वेगळे निघायचे असल्याचे विदर्भवाद्यांना सिद्ध करून दाखवायचे आहे. भारतीय जनता पक्ष व कॉंग्रेस या दोन राष्ट्रीय पक्षांनी वेळोवेळी वेगळ्या विदर्भ राज्याला तात्विक पाठिंबा घोषित केला असला तरी, राज्य प्रत्यक्षात केव्हा आणणार, या मुद्यावर उभय पक्षांचे नेते चुप्पी साधतात. संसद व महाराष्ट्र विधिमंडळातील उभय पक्षांचे एकत्रित संख्याबळ लक्षात घेता, त्यांनी ठरविल्यास विदर्भ राज्य चुटकीसरशी अस्तित्वात येऊ शकते; परंतु ते आजवर झाले नाही आणि निकट भविष्यातही तशी अपेक्षा करता येत नाही. त्यामागचे कारण हे आहे, की विदर्भ वेगळा काढल्यास, उर्वरित महाराष्ट्रात अडगळीत पडण्याची त्यांना भीती वाटते. काही मोठ्या राज्यांमध्ये या पक्षांचे नाममात्रच अस्तित्व आहे. त्यामध्ये आणखी एकाची भर पडल्याने त्यांना फार फरक पडणारही नाही; पण देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर पाणी सोडावे लागेल, ही त्यांची खरी चिंता आहे. श्रीहरी अणे यांना ही वस्तुस्थिती पुरेपूर ठाऊक आहे आणि त्यांनी ती वेळोवेळी बोलूनही दाखविली आहे. त्यामुळेच त्यांनी प्र्रस्थापित पक्षांच्या नादी न लागायचे ठरवून, स्वतंत्र पक्षाची स्थापना करण्याचा मार्ग अवलंबला, असे दिसते. वैदर्भीय जनतेला हवे असल्यास राज्य देऊ, असे तुम्ही म्हणता ना, मग आम्ही ते निवडणुका जिंकून सिद्ध करून दाखवू, असा त्यांचा एकंदर अभिनिवेश आहे. त्यांच्या आत्मविश्वासास वैदर्भीय जनतेच्या पाठिंब्याची जोड मिळाल्यास, वेगळ्या विदर्भ राज्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरेलही; पण तसे न झाल्यास काय? वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावर यापूर्वी निवडणुका लढल्या गेल्या नाहीत, वा राजकीय पक्षांची स्थापना झालेली नाही, असे नाही. बापूसाहेब अणेंनी १९६२ मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून नागपूर लोकसभा मतदारसंघात निवडणूक जिंकली होती. त्याचप्रमाणे जांबुवंतराव धोटे यांनी १९७१ मध्ये नागपूर लोकसभा मतदारसंघात, तर राजे विश्वेश्वरराव यांनी १९७७ मध्ये चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात वेगळ्या विदर्भाच्याच मुद्यावर विजय मिळविला होता. वेगळे विदर्भ राज्य हाच एकमेव ‘अजेंडा’ असलेले काही राजकीय पक्षही भूतकाळात गठित झाले होते. जांबुवंतराव धोटेंनी २००२ मध्ये विदर्भ जनता कॉंग्रेसची, वसंत साठे व एन. के. पी. साळवे या कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी २००३ मध्ये विदर्भ राज्य निर्माण कॉंग्रेसची, तर बनवारीलाल पुरोहित यांनी २००४ मध्ये विदर्भ राज्य पार्टी या पक्षाची मुहूर्तमेढ रोवली होती. या सर्व पक्षांचे संस्थापक दिग्गज राजकीय पुढारी होते; पण आज भिंग घेऊन शोधले तरी ते पक्ष सापडायचे नाहीत. निवडणुकांच्या माध्यमातून वेगळ्या विदर्भ राज्याच्या चळवळीला हवा देण्याचा आणखी एक प्रयत्न २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या वेळीही झाला होता. तेव्हा मतदान यंत्रावरील ‘नोटा’चा पर्याय वापरून सर्व प्रस्थापित पक्षांना नाकारण्याचे आवाहन, विदर्भ राज्य आंदोलन समितीने केले होते. त्याचेही फलित सर्वज्ञात आहे. आता पुन्हा एकदा वेगळे विदर्भ राज्य हा एकमेव ‘अजेंडा’ असलेला पक्ष राजकीय क्षितिजावर उगवला आहे. या पक्षाचे भवितव्य वैदर्भीय जनताच निश्चित करेल. विदर्भवासीयांची इच्छा असल्यास नव्या पक्षाला तेलंगणा राष्ट्र समितीसारखे भव्य यशही लाभू शकेल; पण ते न झाल्यास, नावात विदर्भ असलेल्या सपशेल अपयशी पक्षांच्या यादीत आणखी एका नावाची भर पडून, वेगळ्या विदर्भाची चळवळही मागे रेटली जाऊ शकेल.