शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

अभिनय विश्वातली ‘आई’ हरपली..

By admin | Updated: May 20, 2017 03:02 IST

हम आपके है कौन, वास्तव यासारख्या चित्रपटांतून रिमा लागू यांनी साध्या सोप्या भूमिकेचेही कसे सोने करता येते हे अभिनय सामर्थ्यातून जगाला दाखवून दिले.

- विजय बाविस्करहम आपके है कौन, वास्तव यासारख्या चित्रपटांतून रिमा लागू यांनी साध्या सोप्या भूमिकेचेही कसे सोने करता येते हे अभिनय सामर्थ्यातून जगाला दाखवून दिले. कुठल्याही कलावंताचे आपल्यातून जाणे म्हणजे आपल्या जीवनाचा एक समृद्ध भाग संपल्यासारखे असते. कारण कलावंत त्यांच्या कलाकृतीतून आपले जगणे आनंददायी आणि समृद्ध करत असतो. म्हणूनच कुठल्याही चांगल्या कलावंताचे आपल्यातून जाणे मोठी पोकळी निर्माण करून जाते. आपल्याच भावविश्वाचा भाग असलेला जवळचा माणूस गेल्याची भावना आपल्या मनात कायम राहते. रीमा लागू हे असेच आपल्या भावविश्वाचा भाग झालेले व्यक्तिमत्त्व. त्यांचे जाणे म्हणूनच तमाम रसिकजनांना चटका लावून गेले. आपल्याच घरातलं जवळचं कुणी गेलं असावं असं काहीसं.. मराठी रंगभूमीवर सहज वावर असणारी समर्थ अभिनेत्री, बॉलिवूडमध्ये अनेक तारकांची आई, कधी खट्याळ सासू तर कधी करारी सून... अशा विविधांगी भूमिकांतून आपल्या चतुरस्त्र अभिनयाने सर्वांची मने जिंकलेल्या रीमा लागू या अभिनेत्रीची अशी आकस्मिक ‘एक्झिट’ दु:ख देऊन गेली. रीमा लागू यांनी आईच्या अनेक भूमिका केल्या पण ‘वास्तव’ या चित्रपटातील त्यांची आईची भूमिका सर्वांनाच विशेष भावली. खरी आई पडद्यावर उतरावी इतकी जिवंत भूमिका त्यांनी त्यात साकारली. हाताबाहेर गेलेल्या आणि चुकीच्या मार्गाला लागलेल्या मुलाकडे पाहताना आईच्या मनाची काय उलाघाल होते हे रीमा लागू यांनी फक्त डोळ्यांतून दाखवले होते. काही भूमिका कलावंत अक्षरश: जगतो म्हणतात, त्यातलीच ही एक. अर्थातच ही अभिनयाची समृद्धी त्यांच्याकडे वारशाने आलेली होती. प्रसिद्ध अभिनेत्री मंदाकिनी भडभडे यांच्या त्या कन्या. पुण्याच्या हुजुरपागेच्या शाळेत शिकणारी नयन भडभडे हीच पुढे जाऊन रीमा लागू बनली. उपजत अभिनयक्षमतेला परिश्रमाची आणि कष्टाची जोड देऊन त्यांनी स्वत:चे अवकाश कायम विस्तारत ठेवले. आईकडून अभिनयाचे धडे गिरवलेले असल्याने पायाभरणी पक्की होती. माध्यमिक शिक्षणानंतर त्यांनी मराठी रंगभूमीच्या दालनात प्रवेश केला आणि अभिनयाची नांदी झाली. तिथून पुढचा प्रवास म्हणजे अभिनयाला पूर्ण वाव देणारा ठरला. घर तिघांचं हवं, चल आटप लवकर, झाले मोकळे आकाश, तो एक क्षण, पुरुष, बुलंद, सविता दामोदर परांजपे, विठो रखुमाय, सासू माझी ढांसू यासारखी दर्जेदार नाटकं त्यांना मिळत गेली आणि त्यांनी प्रत्येक भूमिकेचं सोनं केलं. "पुरुष" हा तर त्यांच्या अभिनयाच्या वाटेवरचा ‘माईलस्टोन’ ठरला! त्यांनी नाटकासोबत टेलिव्हिजन मालिकांमध्येही उत्साहाने काम केले. ‘तू तू मै मै’ या विनोदी मालिकेमधली त्यांची सासूची विनोदी भूमिका आजही साऱ्यांच्या लक्षात राहिली. बॉलिवूडच्या जगात प्रवेश केला तेव्हा तथाकथित नायिकांच्या भूमिका त्यांच्या वाट्याला फारशा आल्या नाहीत. एका ठरावीक साच्यामध्ये बसवता यावे असे ते व्यक्तिमत्त्वच नव्हते. पण तरीही जी भूमिका स्वीकारतील त्यामध्ये स्वत:चा ठसा चांगला उमटवतील असा प्रयत्न कायम त्यांनी ठेवला. सहजता आणि प्रसन्नता ही त्यांची सर्वांत मोठी अ‍ॅसेट होती. सौंदयाचे वरदान होते. पण तरीही बॉलिवूडच्या जगात त्यांच्या वाट्याला आईच्या भूमिका अधिक आल्या. पण तिथेही स्वत:चा ठसा उमटवलाच. ‘आई’च्या भूमिकेच्या टिपिकल प्रतिमेला त्यांनी छेद दिला. अल्पावधीतच त्या बॉलीवूडच्या री‘माँ’ झाल्या. त्यापूर्वीच्या चित्रपटांतून दिसणारी आई पाहिली, आठवली तर यातील फरक सहज लक्षात येण्याजोगा आहे. ‘आयेंगे मेरे करण अर्जुन आयेंगे’ असं म्हणत प्रतिशोध घेणारी आई अगर अत्यंत हलाखीत पीचलेली आणि भूतकाळाचा पश्चात्ताप करणारी आई हे आईचे रूप चित्रपटांतून कायम दिसायचे. पण या प्रतिमेच्या चौकटीतून आई मुक्त करण्याचे श्रेय रीमा लागू यांनी पडद्यावर साकारलेल्या आईला जाते. आधुनिकतेच्या उंबरठ्यावर असलेल्या तरुणाईला ही आई अधिक भावली. ही पडद्यावर दिसणारी आई प्रसन्न आणि दिलखुलास दिसत होती. नव्या पिढीशी छान जुळवून घेत होती. जगण्याविषयी उसासे काढण्यापेक्षा आजचे जगणे समजून घेताना ती दिसत होती. हक्काची मैत्रीण वाटावी, प्रसंगी आपल्यासोबत गाणारी, नाचणारी अशी एक वेगळी आई पडद्यावर दिसली. तिच्यावर पसंतीची मोहोर उमटली. अशी ही चतुरस्त्र अभिनेत्री आता आपल्यात नाही याची सल कायमच राहणार आहे. मात्र त्यांच्या अजरामर भूमिकांमधून रीमा लागू कायम आपल्यासोबत राहतील यात शंका नाही.