शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

संचित : निर्णयाची किंमत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 05:46 IST

ज्यावेळी अ‍ॅमेझॉन सुरू करण्याचा निर्णय मी घेतला, त्यावेळी तरुण होतो. तीस वर्षांचा होतो. वर्षभरापूर्वीच माझं लग्न झालं होतं.

- जेफ बेझॉस

आपल्याला मिळालेल्या निसर्गदत्त देणगीचा उपयोग आपण कसा करतो? त्या देणगीचा तुम्हाला अधिक अभिमान असतो की आपण जाणीवपूर्वक एखादा निर्णय घेतो, निवड करतो त्याचा? तुमच्या लक्षात येईल, आपण जाणीवपूर्वक जे निर्णय घेतो, ते बऱ्याचदा आपल्या नैसर्गिक हुशारीपेक्षा जास्त महत्त्वाचे ठरतात. कारण त्यावरच तुमचं वर्तमान आणि भविष्य ठरत असतं.ज्यावेळी अ‍ॅमेझॉन सुरू करण्याचा निर्णय मी घेतला, त्यावेळी तरुण होतो. तीस वर्षांचा होतो. वर्षभरापूर्वीच माझं लग्न झालं होतं. माझ्या लक्षात आलं, इंटरनेट, वेबचा वापर दरवर्षी तब्बल २३०० टक्क्यांनी वाढतो आहे. कुठल्याही गोष्टीचा इतक्या वेगानं प्रसार होणं यापूर्वी मी कधीच पाहिलं नव्हतं की ऐकलं नव्हतं. माझ्या डोक्यात होतं, ते आॅनलाइन पुस्तकविक्री करण्याचा व्यवसाय करण्याबाबत. लक्षावधी पुस्तकं मला त्यामाध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवायची होती. वास्तव जगात हे आजपर्यंत कधीच झालं नव्हतं आणि ते शक्यही नव्हतं. माझ्या या योजनेबाबत मी अतिशय उत्सुक होतो.माझ्या पत्नीचाही मी याबाबत सल्ला घेतला आणि तिला विचारलं, या व्यवसायासाठी मी नोकरी सोडू इच्छितोय आणि नवं काही करू पाहतोय. कदाचित मला त्यात यश मिळणारही नाही. पण पत्नीनं मला त्यासाठी नुसती संमतीच दिली नाही, तर माझ्या नव्या प्रवासाला प्रोत्साहनही दिलं. न्यू यॉर्क शहरात एका वित्तविषयक संस्थेत मी नोकरी करीत होतो. माझ्या बॉसपुढे मी नोकरी सोडण्याचा प्रस्ताव ठेवला. त्याचं म्हणणं होतं, ही अतिशय उत्तम कल्पना आहे; पण ज्यांना चांगली नोकरी नाही, त्यांच्यासाठी ही जास्त चांगली कल्पना आहे. अंतिम निर्णय घेण्यापूर्वी पुन्हा एकदा विचार कर. मलाही त्याचा सल्ला योग्य वाटला. निर्णय कठीण होता; पण शेवटी मी माझ्याच निर्णयानं जायचं ठरवलं. कारण मी प्रयत्न करूनही अयशस्वी झालो असतो, तर त्याचं मला दु:ख वाटलं नसतं; पण प्रयत्न न करताच हा विचार सोडून दिला असता, तर मात्र आयुष्यभर वाईट वाटलं असतं. (उत्तरार्ध)

टॅग्स :amazonअ‍ॅमेझॉन