शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

द्रुतगती मार्ग: मृत्युचा सापळा

By admin | Updated: June 3, 2016 02:17 IST

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर (एक्स्प्रेस वे) प्रसिद्ध उद्योगपती डी. एस. कुलकर्णी ऊर्फ डीएसके यांच्या कारला भीषण अपघात झाला. त्यात सुदैवाने ते बचावले असले, तरी त्यांचा चालक जागीच ठार झाला.

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर (एक्स्प्रेस वे) प्रसिद्ध उद्योगपती डी. एस. कुलकर्णी ऊर्फ डीएसके यांच्या कारला भीषण अपघात झाला. त्यात सुदैवाने ते बचावले असले, तरी त्यांचा चालक जागीच ठार झाला. या महामार्गामुळे प्रवाशांची सोय नक्कीच झाली; पण त्यावरून जाताना वेगाशी जीवघेणी स्पर्धा करणाऱ्या वाहनांमुळे अपघात तर होत आहेतच; पण रस्ते विकास महामंडळ व आयआरबी यांनी अपघात प्रतिबंधक उपाययोजना प्रभावीपणे न राबविल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. उतारावर सतत अवजड वाहने उलटणे, समोरच्या वाहनांना धडकणे, दुभाजक तोडून विरुद्ध लेनवर जाणे, असे अपघात होतात. तीन वर्षांपूर्वी ओझर्डे गावाजवळ रस्ता दुभाजक ओलांडून आलेल्या एका गाडीच्या धडकेमुळे प्रसिद्ध अभिनेते आनंद अभ्यंकर व अक्षय पेंडसे या उगवत्या अभिनेत्याचा मृत्यू झाला होता. भक्ती बर्वेंसारख्या दिग्गज अभिनेत्रीचाही याच महामार्गावर काही वर्षांपर्वी दुर्दैवी अंत झाला. सेलिब्रिटींसह शेकडो सामान्य नागरिकांना या महामार्गावर प्राणास मुकावे लागले. आनंद अभ्यकर यांच्या अपघातानंतर या मार्गावर दोन्ही कॉरिडॉरच्या मध्ये सुरक्षेसाठी ‘बायफ्रेन रोप’ लावण्याचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र, हे रोप सर्वत्र लावलेले नाहीत. दगडी चिरे असलेल्या भागात विशेषत: खंडाळा घाट व परिसरात हे रोप लावलेले नाहीत. सातत्याने पाठपुरावा करूनही या भागात दुभाजकांची उंची अद्याप वाढविलेली नाही. येथे उतार असलेल्या वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्यास बायफ्रेन रोपअभावी अवजड वाहने थेट समोरच्या वाहनांना धडकतात किंवा दुभाजकावरून विरुद्ध लेनवर जाऊन अपघात होतात. ‘खंडाळा एक्झिट’च्या ठिकाणी महिन्यात सरासरी किमान दोन अपघात घडतात. प्रशासकीय पातळीवर काहीच उपाययोजना होत नसल्याच्या तक्रारी सातत्याने होत आहेत. या महामार्गावर अवजड वाहने सर्व लेनमधून धोकादायक पद्धतीने जातात. त्यामुळे अन्य वाहनांना जागा राहात नाही. यामुळे या वाहनांसाठी कडक निर्बंध घालून त्यांना शिस्त लावण्याची गरज निर्माण झाली आहे. लेनशिस्तीचे पालन न करण्याची वृत्ती दिसून येते़ महामार्गावर कोठेही थांबू नये, अशा सूचना जागोजागी लिहिलेल्या आहेत; पण अनेकदा काही वाहने थांबतात़ ट्रक, बस यासारखी जड वाहने उजव्या लेनमधून जातात़ प्रत्यक्षात उजवी लेन केवळ ओव्हरटेकिंगसाठी मोकळी ठेवायची असते़ त्यामुळे असंख्य मोटारी अशा वाहनांना डाव्या बाजूने सर्रास ओव्हरटेक करतात़ या महामार्गावर डाव्या बाजूने ओव्हरटेकिंग करणे हा नियम झाल्यासारखे दिसते़ त्यांना अटकाव करेल, अशी यंत्रणा नसल्याने आज या महामार्गावर सर्वत्र गोंधळाचे चित्र आहे़रस्ते विकास महामंडळाने या महामार्गावरील अपघातामागील कारणांचा शोध घेतला़ या महामार्गावर आजवर ११ हजारांहून अधिक छोटेमोठे अपघात झाले असून, त्यांतील ८० टक्क्यांहून अधिक अपघातांमागे मानवी चुका, हे प्रमुख कारण असल्याचे दिसून आले़ महामार्गाच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी टोल वसूल करणाऱ्या कंपनीवर आहे़; पण त्याकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी आहेत. केंद्र शासनाच्या नियमानुसार महत्त्वाच्या महामार्गाचे दर तीन वर्षांनी रोड सेफ्टी आॅडिट स्वतंत्र संस्थेकडून करून घेणे बंधनकारक आहे़ वाढते अपघात पाहता, या महामार्गाचे रोड सेफ्टी आॅडिट करून घेणे व अहवालानुसार त्याची पूर्तता करणे गरजेचे आहे़ नोएडा ते आग्रा यादरम्यानच्या यमुना एक्स्प्रेस या द्रु्रतगती महामार्गापासून आपण अनेक गोष्टी घेण्यासारख्या आहेत़ पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग हा पहिलाच प्रयत्न होता़ त्यामुळे त्यानंतर अनेक बाबी पुढे आल्याने यमुना एक्स्प्रेस वेचे नियोजन पहिल्यापासून चांगले झाले. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरही या उपाययोजनांचा अवलंब करणे, ही आता काळाची गरज बनली आहे. - विजय बाविस्कर