शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

जिल्हा परिषदेच्या डिजिटल शाळांची गुणवत्ता वाढविण्याची गरजेची 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 13:44 IST

प्राची साठे : वाजदरे येथील शाळेतील सौर पॅनल उदघाटन प्रसंगी प्रतिपादन

ठळक मुद्देअतिथींची सजविलेल्या बग्गीतून मिरवणूक, दात्यांचा गौरवजिल्ह्यातील लोकसहभागातून डिजिटल व सौर शाळांच्या उपक्रमाची वाहवा पटसंख्या वाढविणाºया शिक्षक, केंद्रप्रमुखांचा मुंबईत होणार गौरव 

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळनेर, जि.धुळे : जिल्हा परिषदेच्या शाळा डिजिटल होणे हे अत्यंत गरजेचे असून  धुळे जिल्ह्यातील सर्व जि.प. शाळा डिजिटल झाल्यात. आता तर या शाळा सौर शाळा होत असून, यासाठी प्रेरणा सभा हा अभिनव उपक्रम राबवून सर्वांच्या सहकार्याने शाळांचे रूप पालटत आहे. त्यासाठी प्रयत्नशील असणारे हर्षल विभांडिक हे या अभियानाचे ‘आयकॉन’ ठरत आहेत. सर्वत्र ग्रामस्थांनीही भरीव सहभाग देत सहकार्य केले. त्यामुळे मरगळलेल्या जि.प. शाळांचे रूपच बदलले आहे. आता शिक्षकांनी देखील याचा उपयोग करून गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या विशेष कार्यकारी अधिकारी प्राची साठे यांनी व्यक्त केली.साक्री तालुक्यातील वाजदरे येथील डिजिटल जि.प.शाळेत सौर पॅनल बसवण्यात येत असून त्याच्या उदघाटन प्रसंगी शिक्षणमंत्र्यांच्या विशेष कार्यकारी अधिकारी त्या  बोलत होत्या. या प्रसंगी पुणे येथील विद्या प्राधिकरणचे संचालक डॉ.सुनील मगर, शिक्षण विभागाचे कार्यक्रम अधिकारी सिद्धेश वाडकर, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी नूतन बगाडे, डिजिटल व सौर शाळा अभियानाचे प्रेरक हर्षल विभांडिक, पं.स. गटनेते उत्पल नांद्रे, शिक्षणाधिकारी मोहन देसले, नाशिक जिल्हा प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य डॉ.विद्या पाटील, नाशिक जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य रवींद्र जावळे, गटशिक्षणाधिकारी बी.बी. भिल, जि.प.सदस्या उषाबाई ठाकरे, पं.स. सदस्य विश्वास बागुल, वासुदेव बदामे, सुनिता बच्छाव, प्रा.डॉ.रवींद्र ठाकरे, अ‍ॅड.शरदचंद्र शहा, वाजदरेच्या सरपंच सुमन सोनकर आदीसह ग्रामस्थ तसेच निजामपूर, दुसाने व खुडाणे केंद्रातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक यावेळी उपस्थित होते. अतिथींची मिरवणूक, दात्यांचा गौरव प्रमुख अतिथींना सजवलेल्या बग्गीत बसवून कार्यक्रमस्थळी आणण्यात आले. या अनोख्या स्वागताने ते सर्व भारावले. आरंभी शाळेला डिजिटल व सौर शाळेसाठी वर्गणी देणाºया दात्यांचा तसेच  विविध साहित्य उपलब्ध करणाºया दात्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.पुणे येथील विद्या प्राधिकरणचे संचालक डॉ.सुनील मगर हे यावेळी बोलताना म्हणाले की जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा या लोकसहभागातून डिजिटल झाल्या तर राज्यात देखील जवळपास ३५० कोटी रुपये लोकसहभागातून जमले व यातून जवळपास ६२ हजार शाळा आतापर्यंत डिजिटल झाल्या आहेत. डिजिटल अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त असून, गुणवत्ता वाढीसाठी त्याचा मोठा फायदा होणार आहे. तसेच या डिजिटल शाळांना आता सौर शाळांची देखील जोड मिळत असून, लोकसहभागातून शाळा डिजिटल व सौर शाळा करण्याचा हा अभिनव उपक्रम देशातील इतर राज्यांसाठी मार्गदर्शक ठरणारा आहे, असेही गौरवोदगारही त्यांनी काढले. शिक्षक, केंद्रप्रमुखांचा मुंबईत होणार गौरव : हर्षल विभांडिकडिजिटल व सौर शाळा अभियानाचे प्रेरक हर्षल विभांडिक म्हणाले की, नवीन शैक्षणिक वर्षात ज्या शाळा सर्वाधिक पटसंख्या वाढवतील अशा जिल्ह्यातील १८ शाळांचे सर्व शिक्षक, ८ केंद्रप्रमुख व एक गटशिक्षणाधिकारी या सर्वांचा जुलै महिन्याच्या अखेरीस उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते मुंबई येथे गौरव करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली.कार्यक्रमाचे संयोजन शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र देसले, बंडू मोरे, आर.जी. पवार, मनीष वसावे, पावबा बच्छाव, बाई पवार, अफ्रीन पठाण, प्रगती फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश बच्छाव यांच्यासह शिक्षक, ग्रामस्थांनी केले.