शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

विरदेल येथील जिल्हा परिषद शाळा पाडल्याप्रकरणाची चौकशी करणार

By अतुल जोशी | Updated: July 11, 2023 18:10 IST

शिंदखेडा तालुक्यातील विरदेल येथील जिल्हा परिषदेची एक वर्गखोली कुठलीही परवानगी न घेता निर्लेखित करण्यात आलेली आहे.

धुळे  :  निर्लेखनाचे आदेश नसतानाही शिंदखेडा तालुक्यातील विरदेल येथील जिल्हा परिषद शाळेची एक खोली परस्पर पाडण्यात आली. याची दखल जिल्हा परिषदेने घेतलेली आहे. उपाध्यक्ष देवेंद्र पाटील यांनी स्थायी समितीत हा मुद्दा उपस्थित केला असता,प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे सभागृहात सांगितले.‘निर्लेखनाचे आदेश नसताना विरदेल जि.प. शाळेची वर्ग खाेली पाडली!’ अशा आशयाचे वृत्त ‘लोकमत’ने सोमवारी प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेण्यात आली. जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा अध्यक्षा अश्विनी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झाली.

शिंदखेडा तालुक्यातील विरदेल येथील जिल्हा परिषदेची एक वर्गखोली कुठलीही परवानगी न घेता निर्लेखित करण्यात आलेली आहे. यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समितीची कुठलीही परवानगी घेण्यात आलेली नाही. या शाळा खोलीचे वृत्त प्रसिद्ध हाेताच जि.प. उपाध्यक्ष देवेंद्र पाटील यांनी स्थायी समितीत हा मुद्दा उपस्थित केला. विरदेल येथील शाळा खोली निर्लेखित करण्याचे आदेश दिले होते का? अशी विचारणा त्यांनी शिक्षणाधिकारी राकेश साळुंखे यांच्याकडे केली असता, निर्लेखाच्या यादीत या शाळा खोलीचे नाव होते. मात्र प्रस्ताव आलेला नव्हता. त्या शाळा खोलीचे निर्लेखन मंजूर झालेले नसताना ती परस्पर पाडण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन त्यांनी सभागृहाला दिले. दरम्यान असे प्रकार होणार नाहीत याकडे शिक्षणाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे अशी सूचनाही देवेंद्र पाटील यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना केली. 

टॅग्स :Dhuleधुळे