शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

युवक महोत्सवात झाला लोककलेचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 22:46 IST

आर सी पटेल फार्मसी संघ प्रथम : पोवाडा, लावणी, वारी आदी लोककलांचे सादरीकरण

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : येथील शाहू महाराज नाट्यगृहात अखिल भारतीय मराठी शाहीर परिषद धुळे शाखेने युवक महोत्सवाचे आयोजन केले होते. यावेळी पोवाडा, लावणी, पंढरीची वारी आदी लोककलांचा जागर युवकांनी केला.माजी संरक्षण राज्यमंत्री खा. सुभाष भामरे यांनी कार्यक्रमाचे उदघाटन केले. अध्यक्षस्थानी अ‍ॅड़ एम. एस. पाटील होते. यावेळी शाहीर देवानंद माळी, शाहीर परिषदेचे विभागीय अध्यक्ष विनोद ढगे, शिवसेनेचे हिलाल माळी, परिषदेचे कार्याध्यक्ष आप्पा खताळ, उपमहापौर कल्याणी अंपळकर, डी. एन. पिसोळकर, पापालाल पवार, श्रावण वाणी, सुधाकर बेंद्रे, माणिकराव शिंदे, मंडा माळी, गंभीर बोरसे, वंदना थोरात, मीना भोसले, डॉ. रमेश जैन, आरीफखान पठाण, दत्तात्रय कल्याणकर आदी उपस्थित होते.युवक महोत्सवात २१ संघानी विविध लोककलांचे सादरीकरण केले. आर सी पटेल महाविद्यालयाच्या संघाने सादर केलेल्या ‘लेक वाचवा लेक शिकवा’ प्रबोधन नाटिकेने प्रथम क्रमांक पटकावला. कोळी गीत अहिराणी गीतांचा सुरेख संगम सादर करणारा आर्ट सर्कल ग्रुप द्वितीय तर उत्कृष्ट पद्धतीने जोगवा सादर करणाऱ्या कापडण्याच्या कृष्णाजी माउली भजनी मंडळाने तृतीय क्रमांक पटकावला.प्रत्येक संघाला लोककला सादर करण्यासाठी १५ मिनिटे देण्यात आली होती. परीक्षक म्हणून प्रा. विलास चव्हाण, प्रा. डॉ. कृष्णा पोतदार, राजू मिस्तरी यांनी काम पहिले.सध्याची तरुणाई सोशल मीडिया आणि मोबाईल मध्ये गुरफटलेली आहे. पारंपारिक लोककलांपासून युवा दूर जातो आहे. त्यांना लोककलेकडे वळवणे मोठे आव्हान असल्याचे प्रतिपादन खासदार सुभाष भामरे यांनी यावेळी केले.दरम्यान, अखिल भारतीय मराठी शाहीर परिषद कलावंतांच्या न्याय हक्कांसाठी लढणारी संघटना असल्याचे विभागीय अध्यक्ष विनोद ढगे यांनी सांगितले. लोककलावंतांचे प्रश्न शासन दरबारी मांडण्यासाठी संघटना प्रयत्नशील असल्याची माहिती त्यांनी दिली. आप्पा खताळ यांनी प्रास्ताविक केले. युवकांना प्रोत्साहन देणे व जेष्ठांचा सन्मान करणे हा युवक महोत्सवाच्या आयोजनाचा उद्देश असल्याचे ते म्हणाले. शाहीर परिषद धुळे शाखेच्या वतीने सुरु असलेल्या वृद्धाश्रमाच्या कायार्ची माहिती त्यांनी दिलीशहरात लोककला प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करीत आप्पा खताळ यांनी खा. भामरे, उपमहापौर अंपळकर याना साकडे घातले. खा़ भामरे यांच्यासह महापौर अंपळकर यांनी लोककला प्रशिक्षण केंद्रासाठी जागा देण्याचे आश्वासन दिले़प्रदीप वाणी याना लोककला भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच दिलीप हिरामण पाटील याना काव्यरत्न, अधिकार बोराडे याना स्वरसम्राट पुरस्कार, श्रावण वाणी याना शब्दबंधू , मंडा माळी याना मुक्ताबाई तर इंदुबाई माळी यांना मीराबाई पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच परिषदेच्या विभागीय उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्धल श्रावण वाणी यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन प्रा. राम जाधव व राकेश गाळनकर यांनी केले.

टॅग्स :Dhuleधुळे