शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात तरुणाचा चाकूने भोसकून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 13:36 IST

मुल्ला कॉलनी : पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल

धुळे : फिजिकल डिस्टन्सिंग न ठेवल्याच्या कारणावरुन तरुणाचा चाकूने भोसकून खून झाल्याची घटना चाळीसगाव रोडवरील मुल्ला कॉलनीत रविवारी रात्री उशिरा घडली़ घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली़ यावेळी तणावाची स्थिती निर्माण झाली होती़ याप्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात सोमवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला़शहरातील चाळीसगाव रोडवरील साबीर शेठ कॉम्प्लेक्सजवळ मुल्ला कॉलनी येथे रविवारी रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास बैठक होती़ ही बैठक का घेतली आणि फिजिकल डिस्टन्सिंग का ठेवले नाही या कारणावरुन शाब्दिक चकमक उडाली़ वाद विकोपाला गेल्याने वाशित अब्दुला अतिकुर्हेमान खान याला हाताबुक्याने मारहाण करण्यात आली़ एकाने त्याच्या पोटाच्या मागील बाजूस चाकूने वार केल्याने त्यात त्याला गंभीर दुखापत झाली़ तातडीने त्याला वैद्यकीय उपचारासाठी हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले परंतु तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता़ या घटनेमुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती़याप्रकरणी मयत मुलाचे वडील अब्दुला अतिकुर्हेमान खान यांनी चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन गाठत आपबिती कथन केली आणि सोमवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास फिर्याद दिली़ त्यानुसार, अब्दुल रज्जाक लियाकत खान, इमरान खान अब्दुल रज्जाक खान, पल्लू अब्दुल रज्जाक खान, इकराम रज्जाक खान, इजार उर्फ राजा रज्जाक खान (रा़ मुल्ला कॉलनी, चाळीसगाव रोड, धुळे) यांच्या विरोधात संशयावरुन खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विलास ठाकरे घटनेचा तपास करीत आहेत़

टॅग्स :Dhuleधुळे