त्याच दिवशी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास दुपारी झालेल्या भांडणाचे पडसाद पुन्हा उमटले. शिवीगाळ करीत चाकूने हल्ला करण्यात आल्याने पोटावर व पाठीवर गंभीर दुखापत झाली. मारहाणीत लोखंडी पाइपाचाही आधार घेतल्याने वातावरण अधिकच तणावाचे झाले होते. यात मोहम्मद फरीद अब्दुल गफूर यांना दुखापत झाली. यावेळी मोहम्मद यांच्या भावासह आई-वडिलांनाही शिवीगाळ करण्यात आली. जखमी झालेल्या मोहम्मद यांना तातडीने रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर १४ जानेवारी रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास आझादनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आल्याने अझर शमशुद्दीन शेख आणि साद अमीर निहाल अहमद (दोन्ही रा. अन्सारनगर, दिलदारनगरजवळ, धुळे) यांच्या विरोधात भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
क्षुल्लक कारणावरून तरुणावर चाकूने हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:39 IST