शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यातील यात्रोत्सवात तरुणांना टॅट्यू तर तरुणींना मेहंदी काढण्याची क्रेझ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 15:42 IST

उत्साह : संसारपयोगी वस्तूंच्या विक्रीत वाढ झाल्याने यात्रेत लाखो रुपयांची उलाढाल

ठळक मुद्देहातावर गोंदून घेण्याची सर्वात जास्त क्रेझ ही ग्रामीण भागातील तरुणांमध्ये मोठ्या संख्येने असते. विशेषत: ग्रामीण भागातील मुले ही त्यांच्या हातावर त्यांचे किंवा त्यांच्या प्रेयसीचे नावे गोंदधाना दिसतात. तर शहरी भागातील तरुणांमध्ये हातावर किंवा मानेवर चित्तवेधक डिझाईन काढण्याची विशेष आवड असल्याचे यात्रेत दिसून येत आहे

लोकमत न्यूज नेटवर्क धुळे :  इतरांपेक्षा काही तरी हटके करण्याच्या नादात हल्लीचे तरुण, तरुणी असतात. याची प्रचिती एकवीरादेवी यात्रोत्सवात गेल्यानंतर हमखास येते. यात्रेत येणारे अनेक तरुण मंडळी हे त्यांच्या हातावर,  तर कोणी मानेवर तर काही संपूर्ण हातभर नानाविध प्रकाराचे टॅट्यू गोंदून घेत आहेत. तर लहान मुली किंवा तरुणी या त्यांच्या हातावर आकर्षक अशा मेहंदी काढून घेतानाचे चित्र यात्रोत्सवात दिसून येत आहे. दरम्यान, यात्रोत्सवात संसारपयोगी वस्तूंच्या विक्रीत वाढ झाली असून यात्रेत लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. खान्देश कुलस्वामिनी एकवीरादेवी यात्रोत्सवात दरवर्षी गोंदून देणारे किंवा हातावर मेहंदी काढणारे व्यावसायिक येत असतात. यंदा त्यांची संख्या कमी दिसत असली तरी जे व्यावसायिक यात्रेत दाखल झाले आहेत. त्यांच्या दुकानावर भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे. अगदी गोंदून देण्याचे किंवा महेंदी काढून देण्याचे हे व्यावसायिक १० ते ५० रुपये आकारणी भाविकांकडे करत आहे. 

५०० हून अधिक गोंदून देण्याचे प्रकार यात्रोत्सवात मुंबई येथील कोमलभाऊ ठाकरे हे गोंदून देणारे व्यावसायिक दाखल झाले आहेत. त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले, की येथील यात्रोत्सवात गेल्या २५ ते ३० वर्षापासून ते येत आहेत. त्यांच्याकडे ५०० हून अधिक गोंदून देण्याचे प्रकार उपलब्ध आहेत. त्यासाठी त्यांनी त्यांच्या स्टॉलवर एक फलकच करून ठेवला आहे. तरुण मंडळी तो फलक पाहून त्यांना हवी असलेली डिजाईन कोमलभाऊ यांना सांगितल्यानंतर ते तशीच्या तशी रेखाटून देतात. पूर्वी गोंदून देण्याची पद्धत एकच होती. परंतु, आता कोणाला आकर्षक डिझाईन व कलरमध्ये गोंदून देण्याची मागणी केली तर ते गोंदून देत असल्याचे सांगतात. दरवर्षी कोमलभाऊ हे धुळ्यातील यात्रोत्सव आटोपल्यानंतर अमळनेर येथील यात्रोत्सवासाठी जात असतात. लहानपणापासूनच त्यांनी ही कला अवगत केल्याचे त्यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले आहे. 

टॅग्स :Dhuleधुळे