चंद्रकांत सोनारलोकमत न्यूज नेटवर्कधुळे : मोहाडी उपनगरातील आतिश श्रीधर आव्हाळे या मल्लांनी कुस्ती स्पर्धेत भरारी घेत राष्ट्रीय सुवर्ण पदकापर्यत प्रवास गाठला आहे. मुलांचे उज्वल भविष्य घडावे, यासाठी वडील श्रीधर आव्हाळे यांनी एका धाब्यावर वेटरचे काम करून मुलांना कुस्तीचे धडे दिले. यात्रेत मोठा भाऊ जतिन यांने एकाच दंगलमध्ये पाच कुस्त्या जिंकल्या हाेत्या. त्याचे यश पाहून आतिष हा सुद्धा कुस्ती क्षेत्राकडे वळला आणि सुवर्ण पदकापर्यंत मजल मारली.शिक्षण करीत असतांना केवळ शिक्षण करू नका, त्यासाेबत कला व छंद जोपासण्याची गरज आहे. शिक्षण झाल्यानंतर तुमच्याकडे कला अवगत असले तर तुम्ही यशस्वी होऊन नवीन यशाचा मार्ग काढू शकता. त्यासाठी तुम्हाला आपला यशाचा मार्ग आतापासून शोधावा लागेल. धुळे जिल्हाला कुस्तीचा आधीपासून वारसा आहेत. मात्र योग्य मार्गदर्शन व गरीब व होतकरू खेळाडूना समाजाकडून आर्थिक पाठबळ मिळत नसल्याने अनेकांना संधीचे सोने करता येवू शकत नाही. त्यासाठी समाजाने व दानशुर व्यक्तींनी पुढे येण्याची गरज आहे.कुस्ती स्पर्धेत आतिषला मिळालेले नेत्रदिपक यश २०१२ औरंगाबाद, राज्यस्तरीय वजन गटात गोल्ड मेडल,२०१२, ठाणे राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत द्वितीय २०१३ कोल्हापूर, राज्यस्तरीय स्पर्धेत तृतीय २०१४ हिंगोली राज्यस्तरीय कुस्ती गोल्ड, २०१५ उज्जैन, नॅशनल कुस्ती स्पर्धेमध्ये सेकंड, २०१६ तेलंगणा, नॅशनल कुस्ती स्पर्धेत गोल्ड मेडल २०१६ पुणे नॅशनल कुस्ती स्पर्धा सेकंड, २०१६ धुळे राज्यस्तरीय स्पर्धेत गोल्ड, २०१८ कोल्हापूर कुस्ती स्पर्धेत गटात गोल्ड, २०१८ दिल्ली नॅशनल कुस्ती स्पर्धा सहभाग, २०१८ १९ इंटरनॅशनल ट्रायल सहभाग,२०१८ मुंबई महापौर केसरी प्रथम
मल्ल आतिश आव्हाळेची राष्ट्रीय सुवर्णपदकापर्यत भरारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 23:12 IST