शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला कुजलेला मृतदेह

By admin | Updated: April 7, 2017 01:19 IST

तिखी शिवारातील घटना : मोहाडी पोलिसात नोेंद, तपास सुरु

धुळे : तालुक्यातील तिखी शिवारातील जंगलात एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत कुजलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला़ पोलिसांना  रस्त्यापासून जवळपास एक किलोमीटर  आत जंगलात पायी जाऊन हा मृतदेह ताब्यात घ्यावा लागला.   यामागे काही घातपात तर नाही ना, याचा शोध पोलीस घेत आहेत. या घटनेची मोहाडी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.तिखीच्या जंगलात डेडरगाव तलाव परिसरात गुरख्याला ६ एप्रिल रोजी सकाळी एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळून आला. त्यांनी ही माहिती तिखीचे पोलीस   पोलीस पाटील शेनु शंकर जोशी यांना दिली. त्यांनी दुरध्वनीवरुन मोहीडी पोलीस ठाण्यात माहिती दिली़ त्यानंतर मोहाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ यांच्यासह कर्मचारी सकाळी दहा वाजता घटनास्थळी पोहचले.   झाडाच्या फांदीला एक अनोळखी पुरूषाचा मृतदेह नायलॉनच्या दोरीने गळफास घेतल्याच्या अवस्थेत कुजलेल्या स्थितीत आढळून आला़  मृतकाच्या अंगात पांढरा शर्ट व पांढरी पॅन्ट घातलेली होती़ बाजुला चप्पलही आढळून आली़ याबाबत पोलीस पाटील शेनु जोशी यांनी मोहाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून प्रथमदर्शी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ तपास पोलीस उपनिरीक्षक गवई करीत आहेत़ नमुने राखीव, तपासणीला पाठविणारअनोळखी मृतकाचे वय ४५ वर्ष असून त्याचा दोन ते तीन दिवसांपुर्वीच मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे़  पोलिसांनी मृतदेह हा  शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालयात ठेवला आहे़ तो कोण आहे, याचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे. दरम्यान, मृतकाच्या मृतदेहाचे नमुने डीएनए चाचणीसाठी नाशिक येथे पाठविण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ यांनी दिली़