शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

एकवीरादेवी मंदिरात कुमारीकांचे पूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 16:13 IST

ललिता पंचमी : मारवाडी युवा मंच, अग्रवाल समाज महिला मंडळातर्फे आयोजन; १०१ कुमारिका उपस्थित

ठळक मुद्देनवरात्रोत्सवानिमित्त २८ रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ यावेळेत होम, हवन नवचंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर २९ रोजी सुविसीनी पूजनाचा कार्यक्रम होणार असून भाविकांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.नवरात्रोत्सवानिमित्त मालेगावरोडवरील समर्थ वाग्देवता मंदिरात शनिवारी सायंकाळी धार्मिक कार्यक्रम झाला. यावेळी सहभागी महिलांनी स्त्री सुक्त पठण केले. यानंतर देवीची आरती व भजनांचाही कार्यक्रम झाला. याप्रसंगी उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे, जयश्री चितळे, शैलजा बदर्शनासाठी येणाºया महिला व भाविकांचे मौल्यवान दागिने चोरी होऊ नये, म्हणून २४ तास मंदिर परिसरात पोलिसांकडून वॉच ठेवण्यात येत आहे. मंदिराच्या चारही बाजुना सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे. मुख्य मंदिराच्या परिसरात पोलिसांची एक तुकडी तर मंदिराच्या बाहेर ठि

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : खान्देशची कुलस्वामिनी माता एकवीरादेवी मंदिरात रविवारी चौथ्या माळेला सकाळी ११ वाजता १०१ कुमारिकांचे पूजन करण्यात आले. मारवाडी युवा मंच व अग्रवाल समाज महिला मंडळातर्फे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अशी आहे अख्यायिकारविवारी चौथी  माळ व ललित पंचमी होती. या  दिवशी  औचित्य आदिशक्तीला बाल्य रूपात पाहिले जाते.  त्यामुळे २ ते ९ वर्षाआतील कुमारिकांचे पूजन करण्याची परंपरा आहे. हा उपक्रम शहरातील मारवाडी युवा मंच व अग्रवाल समाज महिला मंडळातर्फे गेल्या काही वर्षांपासून राबविण्यात येत आहे.  कुमारिका पूजन सुरू असताना त्यांच्या अंगावर काटे आल्यासारखे वाटले तर आई एकवीरादेवीचा आशीर्वाद आहे, असे मानले जाते.कुमारिकांना दिला महाप्रसाद कुमारिका पूजन झाल्यानंतर मंदिरात उपस्थित १०१ कुमारिकांना महाप्रसाद देण्यात आला. यावेळी आरती झाली. मंदिराचे विश्वस्त सोमनाथ गुरव यांच्या हस्ते आरती झाली. यावेळी मधुकर गुरव, मनोहर गुरव, सदाशिव पुजारी, चंद्रशेखर गुरव आदी उपस्थित होते. गर्दीने फुलला मंदिर परिसर रविवारी सुट्टीचे औचित्य साधून पहाटेपासूनच मंदिरात गर्दी दिसून आली. शहरातील अनेक भाविक पदयात्रा करत मंदिरात दर्शनासाठी आले. सकाळी नऊ वाजता आदिशक्तीच्या गाभाºयात दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाल्यामुळे मंदिर परिसर फुलल्याचे चित्र दिसून आले. आज दिवसभरातही गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड राज्यातील भाविकांनीही दर्शन घेतल्याची माहिती मंदिर ट्रस्टतर्फे देण्यात आली. आकर्षक विद्युत रोषणाईने मंदिर परिसरात लखलखाट खान्देश कुलस्वामिनी एकवीरादेवी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आल्यामुळे मंदिर परिसर उजळून निघालेला दिसत आहे. याच परिसरात असलेल्या महालक्ष्मी मंदिरालाही केलेल्या रोषणाईमुळे मंदिर परिसरात लखलखाट दिसत आहे. यानिमित्ताने येथे दाखल झालेले  पाळणे, रेल्वे, मिकी माऊस, वॉटर टॅँक लहान मुलांचे लक्ष वेधत असून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असल्याचे बोलले जात आहे.