पर्यावरणाचे प्रदूषण टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी शाडू मातीपासून गणपती मूर्ती स्वतः तयार करून स्थापना करावी हा उदात्त दृष्टिकोन लक्षात घेऊन या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत गणपती कसा तयार करावा याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. शाळेतर्फे विद्यार्थ्यांना गणपती बनवण्यासाठी लागणारे साहित्य पुरवण्यात आले. बालवयातच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये पर्यावरणाबद्दल जागृती निर्माण व्हावी याबद्दल मार्गदर्शन सुद्धा करण्यात आले. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदवला व कलाकृती निर्मितीचा आनंद मिळवला. तसेच पालकांचा सुद्धा या उपक्रमात सहभाग होता.
या कार्यशाळेला उपमुख्याध्याक एस. पी. वाघ, पर्यवेक्षक जे. जे. जोशी, जे. पी. कुटे, कला शिक्षक जी. एम. ठाकरे, डी. एम. बागुल, जे. व्ही. जोशी
सुळे मॅडम, पी. ए. ठाकूर, एस. डी. कुलकर्णी, एम. आर. काकडे, सी. आर. देसले, आर. पी. पाठक, पी. एम. हरणे, एन. डी. हालोर यांनी सहभाग नोंदवून मार्गदर्शन केले.