शहरं
Join us  
Trending Stories
1
लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीत चोरांनी १०० मोबाईल अन् सोन्याच्या चेन केल्या लंपास; चार आरोपींना अटक
2
मेहुल चोक्सीला जेलमध्ये स्वच्छ पाणी अन् टॉयलेट देणार; भारताने बेल्जियमला दिली १४ सुविधांची यादी
3
समृद्धी महामार्गावर अडीच कोटींची वॅक्सीन चोरी, आंतरराज्य टोळीला वाशिम पोलिसांनी केली अटक
4
विमा स्वस्त होणार म्हणून आनंद झाला होता? आता प्रीमियम वाढण्याच्या शक्यतेने वाढली चिंता
5
"क्षमतेपेक्षा जास्त हुंडा दिला तरीही..."; लेकीने लग्नाच्या ९ महिन्यांतच संपवलं जीवन, आईचा टाहो
6
नेपाळमध्ये सोशल मीडिया Appsवर बंदी; Gen-Z आक्रमक, सरकारविरोधात तीव्र निदर्शने
7
एक लाख व्ह्यूज मिळाल्यावर इंस्टाग्राम किती पैसे देते? जाणून व्हाल हैराण!
8
"विरोधकांच्या ठिकऱ्या उडणार, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांनी..."; भाजपाचा टोला
9
धक्कादायक! जिथे CCTV तिथेच सामान तपासा; रेल्वे प्रवाशांचं साहित्य तपासणारे पोलीसच करतायेत लूट
10
लाल किल्ल्यावरून १ कोटी रुपयांचा कलश चोरणारा पकडला गेला अन् धक्कादायक खुलासा झाला!
11
Asia Cup 2025 : संजू सॅमसन संदर्भात रवी शास्त्रींचं मोठं वक्तव्य; गंभीरला त्यातील गांभीर्य कळणार का?
12
एका वनडे मालिकेत सर्वाधिक धावा करणारे ५ मधल्या फळीतील फलंदाज!
13
मंदीच्या उबरठ्यावर अमेरिका! कोरोनापेक्षाही भीषण स्थिती;२००८ मध्ये भविष्यवाणी करणाऱ्यानं पुन्हा दिला इशारा
14
Pitru Paksha 2025: पितृपक्षाची सुरुवात कोणी व कोणासाठी केली? प्रत्येकाला हे माहीत असलेच पाहिजे!
15
अफगाणिस्तानात भूकंप आला त्यात फक्त पुरुषांना वाचवलं, महिलांना नाही; कारण ऐकून धक्का बसेल
16
शाब्बास हरभजन सिंग!! पूरग्रस्तांसाठी दिल्या ११ बोटी, ३ रूग्णवाहिका; ५० लाखांचा निधीही जमवला
17
सोशल मीडिया स्टारला करायचंय लग्न, सुयोग्य 'वर' शोधून देणाऱ्यास मिळणार ८८ लाख! पण...
18
बायको असावी तर अशी! 'सावित्री' घेतेय सत्यवानाची मुलासारखी काळजी; डोळे पाणावणारा Video
19
सणासुदीपूर्वी स्वस्त झालं सोनं, एकाच दिवसात मोठी घसरण; चांदीचे दरही घसरले, जाणून घ्या
20
Pitru Paksha 2025: पितृपक्षात आमसुलाच्या चटणीशिवाय नैवेद्याला पूर्णत्त्व नाही; वाचा महत्त्व आणि रेसिपी

मनपा कर्मचा:यांचे काम बंद आंदोलन!

By admin | Updated: January 11, 2017 23:42 IST

धुळे : मनपा आयुक्त संगीता धायगुडे यांना मंगळवारी धमकी देण्यात आल्याचा प्रकार घडला होता़ सदर घटनेचा निषेध करण्यासाठी मनपा कर्मचारी समन्वय समितीतर्फे बुधवारी दिवसभर काम बंद आंदोलन करण्यात आल़े

धुळे :  मनपा आयुक्त संगीता धायगुडे यांना मंगळवारी धमकी देण्यात आल्याचा प्रकार घडला होता़  सदर घटनेचा निषेध करण्यासाठी मनपा कर्मचारी समन्वय समितीतर्फे बुधवारी दिवसभर काम बंद आंदोलन करण्यात आल़े यादरम्यान जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर करण्यात आल़ेमनपाशेजारी असलेल्या डॉ़ बाबासाहेब आंबेडकर अध्ययन केंद्राचे अनधिकृत बांधकाम काढून घेणेबाबत व पर्यायी जागा मिळावी या मागणी साठी अध्ययन केंद्राचे पदाधिकारी मंगळवारी दुपारी आयुक्त संगीता धायगुडे यांच्या भेटीला आले होत़े त्यावेळी झालेल्या शाब्दिक चकमकी दरम्यान अध्ययन केंद्राचे अध्यक्ष एम़जी़ धिवरे यांनी आयुक्तांना जिवे मारण्याची धमकी दिली, असे पत्र आयुक्तांनी पोलीस अधीक्षकांना दिले होत़े याप्रकरणी रात्री शहर पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता़  सदर घटनेविरोधात महापालिका कर्मचारी समन्वय समितीतर्फे बुधवारी काम बंद आंदोलन पुकारण्यात आल़े सकाळी 11 वाजता मनपा आवारात कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी व सर्व विभागाचे कर्मचारी जमल़े त्यावेळी आयुक्तांना धमकी देणा:यांचा निषेध करण्यात आला़ महापौर कल्पना महाले यांनीदेखील या आंदोलनाला पाठिंबा दिला़ त्यानंतर कर्मचारी समन्वय समितीने पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले व अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांना निवेदन सादर केल़े आयुक्तांना धमकी देणा:यांवर कारवाई करावी, दखलपात्र गुन्हा नोंदविण्यात यावा, अधिकारी व कर्मचा:यांना संरक्षण देण्यात यावे या मागण्या समितीतर्फे करण्यात आल्या़ त्यानंतर जिल्हाधिका:यांना निवेदन सादर करण्यात आले तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सायंकाळर्पयत धरणे आंदोलनही करण्यात आल़े यावेळी कर्मचारी समन्वय समितीचे उपाध्यक्ष प्रसाद जाधव, सचिव भानुदास बगदे व सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होत़े सदर काम बंद आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आल़े