कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत होता. सर्व व्यवहार ठप्प होत असताना कित्येकांना आपल्या रोजगारावर पाणी फिरवावे लागले. काहींनी नोकऱ्या सोडल्या, तर काहींना राजीनामे देण्यास भाग पाडले. रोजगार बुडाल्याने संसार चालवायचा कसा, असा मोठा प्रश्न कित्येकांपुढे निर्माण झाला होता. त्यानंतर मिळेल ते काम करून आपले पोट भरण्याचा प्रयत्न करण्यात आला. आजच्या स्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्याने बंद असलेले सर्व व्यवहार पूर्ववत होण्यास सुरुवात झाली आहे. नोकऱ्या मिळू लागल्याने आता सुशिक्षित तरुण आणि तरुणींकडून रोजगार मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. अर्ज सादर करण्यात येत असल्याने हजाराच्या वरती नोंदणी होऊ लागली आहे.
५० जणांना मिळाला
या वर्षात रोजगार
- कोरोनामुळे अनेकांचे रोजगार बुडाले, तर काहींना आपल्या नोकरीला राजीनामा देण्याची वेळ ओढवली. असे असताना अनेकांनी आता रोजगाराची नव्याने शोधमोहीम सुरू केली आहे. परिणामी लहान मोठ्या कंपनीमध्ये रोजगार मिळत आहे. ५० पेक्षा जास्त तरुणांना रोजगार मिळाल्याचे समाधान आहे.
अनेकांनी पकडली
मुंबई-पुण्याची वाट
- मुंबई आणि पुण्यात रोजगाराच्या संधी अनेक उपलब्ध आहेत. या ठिकाणी लहान-मोठे उद्योगासह कंपन्या कार्यरत आहेत. परिणामी अनेकांचा ओढा तिकडे असल्याचे दिसून येते.
- कोरोना सुरू झाल्यानंतर तिथून परत आलेल्या अनेकांनी पुन्हा आपली वाट त्याच दिशेने नेण्यास सुरुवात केली आहे. तरुण-तरुणींसह रोजगाराच्या शोधात असलेली जनता मोठ्या शहराकडे जात आहे.
कोणत्या महिन्यात किती नोंदणी
महिना तरुण तरुणी
जानेवारी २४ २६
फेब्रुवारी ३० १५
मार्च ४० ३०
एप्रिल २० २५
मे ३५ २०
जून ५० ४५
जुलै ४५ ३०
ऑगस्ट ५० ४५