मालपूर : शिंदखेडा तालुक्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे शासनाने आदेशीत केले होते. त्यानुसार युद्धपातळीवर तलाठी ग्रामसेवक कृषी साहाय्यक यांनी थेट शेत बांधावर पंचनामे केले आहेत. ही पंचनाम्याची सर्व माहिती संकलीत करून आद्ययावत याद्या तयार करुन माहिती भरुन शासन दरबारी सादर करावयाची असल्याने तहसील कार्यालयात बसुन वरिष्ठ अधिकारी मंडल अधिकारी कर्मचा?्याच्या साहाय्याने सध्या पंचनाम्याची माहिती संकलित करुन अर्ज भरले जात असल्याचे मंडळ अधिकारी एम.एम. शास्त्री यांनी सांगितले.वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीत हे काम सुरू असून यातून एकही गाव किंवा शेतकरी सुटणार याची देखील काळजी घेण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे.परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे पंचनाम्यातून स्पष्ट होत आहे. यात शासन आता शेतकºयांना कशा स्वरुपात मदत देते, यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. शेतकºयांना तर मदत त्वरित उपलब्ध होणे गरजेचे आहे. कारण त्यांच्या हातात काहीच शिल्लक नसल्याने रब्बीहंगाम पूर्व कामे देखील ठप्प आहेत. त्यामुळे शासनाने आर्थिक मदत कशी लवकर दिली जाईल, यावर भर द्यावा. शेतकºयांना दिली जाणारी मदतीची रक्कम त्वरित त्यांच्या बॅँकखात्यांवर टाकणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त होते.
नुकसानीच्या पंचनाम्याच्या संकलित माहितीवरून अद्यावत याद्यांचे काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 13:30 IST