शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

प्रलंबित मागण्यांसाठी काम बंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 11:31 IST

गेटजवळ निदर्शने : शिरपूर, दोंडाईचा नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून नोंदविला निषेध

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर/दोंडाईचा : विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिरपूर व दोंडाईचा नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी १७ रोजी काळ्या फिती लावून काम बंद आंदोलन केले़ यावेळी कर्मचाºयांनी निदर्शनेही केली.शिरपूर वरवाडे नगरपरिषदशिरपूर-वरवाडे नगरपरिषदेच्या कर्मचाºयांनी सोमवारी एकदिवसीय काम बंद आंदोलनात सहभाग नोंदवून शासनाचे विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. नगरपरिषद कर्मचाºयांच्या मागण्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत. मात्र, याबाबत कोणतीही दखल घेतली जात नाही. तसेच मागण्यांबाबत गांभीर्य दाखविले जात नाही, असे कर्मचाºयांचे म्हणणे आहे.नगरपरिषद कर्मचारी अत्यावश्यक सेवेतून जनतेचे समाधान करतो. तसेच आपत्ती, पूर, साथरोग, आगीच्या घटना, कोविड-१९ असे प्रत्येक कार्यात नगरपरिषद कर्मचारी स्वत:ची पर्वा न करता उभा राहतो. परंतू तरी शासनाकडुन सातत्याने दुर्लक्ष केले जाते. शासनाकडून जसे सरकारी कर्मचाºयांना सर्व हक्क व फायदे मिळतात तसेच नगरपरिषद कर्मचाºयांना देखील मिळावे़ सर्वांसाठी समान कायद्याने अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी संघटनेच्या पदाधिकाºयांनी केली आहे़ आंदोलनात महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचारी, संवर्ग कर्मचारी संघटनेचे धुळे जिल्हाध्यक्ष संजय हासवाणी, उपाध्यक्ष भाईदास भोई, जगदिश पाटील, माधव पाटील, सचिव दीपाली साळुंखे, जयवंत माळी, मोहन जडिये, सागर कुलकर्णी, राजेंद्र मराठे, प्रदीप गिरासे, गोपी लिडे, राजू ठाकूर आदी उपस्थित होते़दोंडाईचा नगरपालिकामहाराष्ट्र नगरपरिषद कर्मचारी व संवर्ग अधिकारी यांनी पुकारलेल्या एक दिवशीय राज्यस्तरीय संपात दोंडाईचा नगरपालिकेचे कर्मचारी व अधिकारी सहभागी झाले. सोमवारच्या संपात दोंडाईचा नगरपालिकेचे सुमारे दीडशे कर्मचारी सहभागी झाले. उपनगराध्यक्ष रवींद्र उपाद्धे व मुख्याधिकारी डॉ.प्रवीण निकम यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. नगरपरिषद नगरपंचायतीच्या कर्मचाºयांना शंभर टक्के पगार कोषागारातून द्यावा, सातव्या वेतन आयोगाचा पहिला हप्ता मिळावा, कोरोनात मृत्यू पावलेल्या नगरपरिषद कर्मचाºयांना ५० लाखाचा विमा मिळावा आदी प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र नगरपरिषद कर्मचारी व संवर्ग अधिकारी संघटना यांच्या मार्गदर्शनाखाली दोंडाईचा नगरपालिका कर्मचारी व संवर्ग अधिकारी संघटनेने संपात सहभाग घेतला.दोंडाईचा नगरपालिकेच्या कर्मचारी व पदाधिकाºयांनी कोरोना संदर्भातील सर्व कामे करून व अत्यावश्यक कामे करणार असल्याचे सांगून इतर काम बंद आंदोलन पुकारले होते. संपात दोंडाईचा नगरपालिकेचे कर्मचारी व धुळे जिल्हाध्यक्ष संतोष माणिक, उपाध्यक्ष- उपमुख्याधिकारी हर्षल भामरे, सागर ओतारी, भुपेंद्र बोरसे, बांधकाम अभियंता शिवनंदन राजपूत, जगदीश पाटील, रवींद्र जाधव, कांतीलाल मोहिते, भरत चौधरी, सुवर्णा शिंपी, अनिल बागुल, मिनाबाई सपकाळे, रुपेश पाटील, कुणाल भुईगळ, कमलेश काळे, शरद महाजन, महेंद्र शिंदे, आनंदा चौधरी, विवेक ब्राम्हणकर, राजरत्न म्हसदे, रामकुमार चौहान, वासुदेव रडे, धर्मेंद्र मोहिते, शिवा सोलंकी, मिलिंद पिंपळे, शंकर बोयत, उमेश निकम, सागर निकम, कपिल पाटील यांच्यासह कर्मचाºयांनी एकदिवशीय लाक्षणिक संपात सहभाग घेतला.