शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
3
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
4
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
5
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
6
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
7
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
8
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
9
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
10
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
11
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
12
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
13
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
14
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
15
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
16
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
17
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
18
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
19
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
20
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय

सकाळी कामकाज, सायंकाळी धरणे

By admin | Updated: February 17, 2017 23:16 IST

महापालिका : संवादाअभावी कर्मचा:यांच्या आंदोलनाची धग कायम, काम बंदचा इशारा

धुळे : नगररचना विभागाचे प्रभारी सुभाष विसपुते आणि अतिक्रमण विभागाचे लिपिक तथा महापालिका कर्मचारी समितीचे उपाध्यक्ष प्रसाद जाधव यांचे निलंबन विनाअट मागे घ्यावे, या मागणीसाठी कर्मचारी शुक्रवारी सायंकाळर्पयत ठाम होत़े चर्चा होईल या आशेने सकाळी कामकाज झाल़े सायंकाळ होऊनही चर्चा झाली नसल्याने धरणे आंदोलन करण्याची वेळ त्यांच्यावर आली़ दरम्यान, शनिवारपासून आक्रमक पवित्रा घेत काम बंद आंदोलन पुकारण्याचा इशारा कर्मचारी संघटनेच्या पदाधिका:यांनी दिला़ गेल्या काही दिवसांपासून प्रशासन आणि कर्मचारी आमनेसामने आले आहेत़ त्याचा परिणाम दैनंदिन कामकाजावर होत आह़े सोमवार आणि मंगळवार या दोन दिवसात झालेल्या आंदोलनाचा परिणाम म्हणून आयुक्तांनी आंदोलनकत्र्या 277 कर्मचा:यांना दोन दिवसांच्या वेतन कपातीचा धक्का दिला़ त्यापाठोपाठ प्रसाद जाधव यांच्यावर निलंबनाची कारवाई आयुक्त संगीता धायगुडे यांनी केल्यामुळे महापालिकेतील वातावरण अधिकच तणावाचे झाले आह़े गुरुवारी यावर काही तोडगा निघेल असे वाटत असताना काहीही तोडगा निघाला नव्हता़ त्यामुळे शुक्रवारपासून पुन्हा काम बंदचा इशारा संघटनेमार्फत देण्यात आला होता़ महापालिकेत शुक्रवारी सकाळपासूनच आंदोलनाची धग कायम होती़ गुरुवारी जाहीर केल्याप्रमाणे काम बंद आंदोलन करत कर्मचारी संघटनेने आवारातच सकाळी 11 वाजता धरणे आंदोलन सुरू केले आणि प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला़ साडेअकरा वाजेच्या सुमारास आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून सहायक आयुक्त अभिजित कदम आणि अमित डुरे हे दोघे कर्मचा:यांच्या आंदोलनस्थळी दाखल झाल़े संघटनेच्या पदाधिका:यांशी संवाद करत निलंबन मागे घेण्यासंदर्भात आयुक्तांशी चर्चा होईल, आपण काम बंद आंदोलन मागे घ्यावे, असे सांगितल्यामुळे संघटनेने थोडा अवधी देत आंदोलन तूर्त मागे घेतले आणि आंदोलन करणा:या कर्मचा:यांनी आपापल्या दैनंदिन कामाला प्राधान्य दिल़े दुपारी साडेचार वाजेर्पयत प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची बोलणी अथवा निलंबन मागे घेण्यासंदर्भात ठोस निर्णय न झाल्याने पुन्हा संघटनेच्या नेतृत्वाखाली कर्मचारी एकवटले होत़े सायंकाळर्पयत कोणत्याही प्रकारची चर्चा झालेली नव्हती़ दोघांचे निलंबन मागे घेण्याच्या मागणीवर आम्ही ठाम आहोत़ सकाळी अधिका:यांच्या शिष्टमंडळाने आश्वासन दिल्यामुळे काम बंद मागे घेण्यात आले होत़े पण सायंकाळ होऊनही ठोस कृती न झाल्यामुळे आम्ही आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहोत़ आमचा विश्वासघात झाला आह़े आम्हाला फसविले असल्याने आता माघार नाही़ -भानुदास बगदे, संघटनेचे सचिव