शहरं
Join us  
Trending Stories
1
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
2
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
3
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
4
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
5
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
6
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
7
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
8
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
9
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
10
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
11
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
12
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
13
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
14
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
15
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
16
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
17
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
18
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
19
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
20
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)

सृजनशील विचार करुन ध्येयपूर्तीसाठी कठोर परिश्रम करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 22:21 IST

विजयसिंग पवार : शिंदखेडा महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कशिंदखेडा : खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्या युगात स्पर्धा वाढत आहेत. यात विद्यार्थ्यांनी गोंधळून न जाता अंगी असलेल्या कौशल्याचा वापर राष्ट्रनिमार्णासाठी केला पाहिजे. यासाठी सृजनशीलतेचा विचार करुन स्पर्धा परीक्षेत नेत्रदिपक यशासाठी कठोर परिश्रम करणे ही आजची मौलीक गरज आहे, असे प्रतिपादन अमळनेर येथील पूज्य साने गुरुजी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे संचालक विजयसिंग पवार यांनी केले.श्री.शि.वि.प्र. संस्थेचे महाविद्यालय शिंदखेडा येथे राज्यशास्त्र अभ्यास परिषदेमार्फत आयोजीत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेत पवार बोलत होते. ते पुढे म्हणाले की, स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी पदवी परिक्षेला भरपूर गुण पाहिजेत असे नाही.कमी गुण असूनही जर सामान्य ज्ञानाचा नीट अभ्यास केला तर स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होणे सोपे आहे. ‘कठीण’ शब्द मनातून काढून टाका. विद्यार्थ्यांनी प्रशासकीय सेवेत जाऊन राष्ट्राची सेवा करावी. खरा भारत हा खेड्यातच असल्याचे त्यांनी सांगितले.कार्यशाळेचे उद्घाटन विजयसिंग पवार यांनी दिपप्रज्वलन करुन केले. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे शिक्षक भारतीचे अध्यक्ष प्रा.पी.के. पाटील (अमळनेर), प्राचार्य डॉ.बी.आर. चौधरी, आयोजक डॉ.संभाजी पाटील, विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा.एस.के. जाधव, प्रा.आर.एन. पाटील, विद्यार्थी प्रतिनिधी भुषण बागुल आदि उपस्थित होते. डॉ. संभाजी पाटील यांनी सांगितले की, स्पर्धा परिक्षेविषयी ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये जागर जाणीव व्हावी व स्पर्धा परीक्षा जास्तीतजास्त विद्यार्थ्यांनी द्यावी म्हणून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. प्रा.पी.के.पाटील यांनी 'कौशल्य विकास व स्पर्धात्मक युग' या विषयावर मार्गदर्शन केले. प्रशासनामध्ये लाखो जागा रिक्त असून त्यासाठी प्रत्येकाने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्याचे अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.बी.आर. चौधरी स्पष्ट केले.कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.पी.पी.पाटील, डॉ.पी.पी. माहुलीकर, कुलसचिव डॉ.बी.बी. पाटील, महाविद्यालयाचे अध्यक्ष प्रफुल्लकुमार सिसोदे, उपाध्यक्ष अशोक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम घेण्यात आला. भटू देसले, पंकज साळुंखे, दिसा ठाकरे, विशाल बैसाणे, कल्याणी महाले यांनी परिश्रम घेतले. कार्यशाळेत ३८७ विध्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

टॅग्स :Dhuleधुळे