शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘जिओ टॅगिंग’ च्या कामात धुळे जिल्ह्याची नाशिक विभागात आघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 17:37 IST

राज्यात पाचवे स्थान : राज्याचे जलसंधारण मंत्र्यांनी केलेल्या सूचनेनंतर यंत्रणा गतिमान

ठळक मुद्देनाशिक विभागात धुळे अव्वलअहमदनगर दुस-या स्थानीजळगाव जिल्हा पिछाडीवर

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : धुळे जिल्हा ‘जिओ टॅगिंग’ च्या कामात पिछाडीवर असल्याचे समोर आल्यानंतर राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी हे काम तत्काळ पूर्ण करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले होते. त्यानंतर प्रशासकीय यंत्रणेने जिओ टॅगिंगचे काम गतीने पूर्ण करून दाखवत मंत्र्यांनी केलेल्या सूचनेनंतर नाशिक विभागात जिओ टॅगिंगच्या कामात आघाडी घेतली असून राज्यात पाच नंबरचे स्थान मिळविले आहे. राज्य शासनाच्या महत्त्वकांक्षी जलयुक्त शिवार योजनेची नाशिक विभागस्तरीय आढावा बैठक धुळ्यात ११ नोव्हेंबरला झाली होती. या बैठकीत धुळे जिल्ह्याचे ‘जिओ टॅगिंंग’ चे काम हे ४० टक्क्यांपेक्षा कमी झाले होते. त्यावेळी मंत्री प्रा. शिंदे यांनी हे काम ज्यांच्या अखत्यारित आहे, असे प्रांताधिकारी गणेश मिसाळ व नितीन गावंडे यांना बैठकीत धारेवर धरत हे काम त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. राज्यात पाचव्या क्रमांकावर धुळे जिल्हा प्राप्त माहितीनुसार जिओ टॅगिंगच्या कामाबाबत धुळे जिल्हा राज्यात पाचव्या स्थानी असून प्रथम स्थानावर अमरावती विभागातील वाशिम जिल्हा आहे. या जिल्ह्याचे काम ९५.५९ टक्के इतके झाले आहे. राज्यात जिओ टॅगिंगच्या कामात दुसºया, तिसºया व चौथ्या स्थानी नागपूर विभागातील वर्धा (९३.३७ टक्के), भंडारा (९२.१९ टक्के), नागपूर (७९.५२ टक्के) आहे. 

आढावा बैठकीनंतर प्रांताधिकाºयांनी संबंदित अधिकाºयांची बैठक घेऊन त्यांना जिओ टॅगिंगचे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार ४० टक्क्यांपेक्षा कमी असलेले काम आता ७८.४ टक्के इतके झाले आहे. त्याखालोखाल अर्थात दुसºयास्थानी आघाडीवर असलेला अहमदनगर जिल्ह्याचे काम ७७.८४ टक्के इतके झाले आहे. नंदुरबार ७२.२२ टक्के, नाशिक जिल्ह्याचे काम ६४.१७ टक्के तर जळगाव जिल्ह्याचे जिओ टॅगिंगचे काम हे केवळ ४८.३३ टक्के इतके हा जिल्हा नाशिक विभागात पिछाडीवर पडला आहे.