निवेदनात म्हटले आहे की, सध्या महाराष्ट्रात कोरोना आजाराचा संसर्ग वाढत आहेत. दररोज रुग्णांची संख्या वाढत आहे. अशातच मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना मतदाराचे फोटो गोळा करणे, दुबार मतदारांना नोटीस बजावणे, स्थलांतर यादी तयार करणे, नवीन मतदार नोंदणी करणे आदी कामे करावी लागत आहेत. मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचा थेट संपर्क जनतेशी येतो. त्यातच सहावीच्या पुढील वर्ग सुरळीत सुरू आहेत. बीएलओचे काम शाळाव्यतिरिक्त वेळेत करून पुन्हा शाळेत उपस्थित राहावे लागते; परंतु सध्याचा वाढत्या कोरोनाच्या संसर्गामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना त्याचा धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून कोरोनाचा शाळेतील संभाव्य धोका टाळण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी बीएलओचे कामकाजाची सक्ती करू नये किंवा सदरचे काम तात्पुरते स्थगित करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. निवेदन देताना संघटनेचे राज्य प्रमुख संघटक भूपेश वाघ, जिल्हाध्यक्ष उमराव बोरसे, कार्याध्यक्ष प्रशांत महाले, विभागीय अध्यक्ष प्रभाकर चौधरी, सचिव रवींद्र देवरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
बीएलओंचे काम तूर्त स्थगित करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:37 IST