शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

नसबंदीचा भार महिलांवरच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 22:16 IST

महापालिका : एक वर्षात एकही पुरूषाकडून झाली नाही नसबंदी; उच्चशिक्षितांमध्येही गैरसमज

धुळे : कुटुंब नियोजनासाठी सरकारने ‘हम दो हमारे दो ’चा नारा देत नसबंदीची योजना राबवली आहे. मात्र वर्षभरात महिलांच्या तुलनेत एकही पुरुषांकडून नसबंदी शस्त्रक्रियाच न झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.लोकसंख्या नियंत्रणासाठी शासनाकडून वेगवेगळ्या योजना तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत असला तरी पुरुषी मानसिकतेत जोपर्यंत बदल होणार नाही तोपर्यंत शासनाच्या नसबंदी कार्यक्रमात पुरुषांचा सहभाग अत्यल्पच राहणार हे पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.११०० महिलांची शस्त्रक्रियाशासनाकडून महापालिका आरोग्य केंद्राला कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेसाठी २०१८-२०१९ या वर्षात १ हजार ७१८ उदिष्ठे देण्यात आले होते़ त्यापैकी १ हजार १२६ उदिष्ठे पुर्ण केले आहे़ त्यात दोन अपत्यानंतर शस्त्रक्रिया करण्यात प्रशासनाने ६० टक्के उदिष्ठे पुर्ण केले आहे़सकारात्मक परिणाम नाहीविवाहित जोडप्यापैकी पुरूष किंवा महिला या दोघांपैकी एकाची नसबंदी करण्यात येते़ महापालिकेच्या आरोग्य केद्रातर्फे नसबंदी बाबत बरीच जनजागृती झाल्यानंतर नसबंदीचे प्रमाण वाढले़ मात्र महिलांचाच समावेश जास्त आहे़ महिलांच्या तुलनेत पुरूषांची शस्त्रक्रिया साधी व सोप्या पध्दतीने असते़महिलांच्या तुलनेत पुरूषांच्या नसबंदीचे प्रमाण वाढावे, यासाठी आरोग्य विभागातर्फे जनजागृती केली जात आहे़ मात्र सकारात्मक परिणाम अद्याप दिसुन आलेला नाही़सहा पुरूषांनी घेतला पुढाकारमहापालिका आरोग्य केंद्रात २०१६-१७ व २०१७-१८ या वर्षात सहा पुरूषांनी स्वत:हून नसबंदी करून घेतली आहे़ तर २०१८-१९ या वर्षात १ हजार १२६ महिलांची कुंटूब शस्त्रक्रिया करण्यात आली़ तर एकही पुरूषाची नसबंदी झाली नसल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले़आरोग्य केंद्रातून मिळेल सुविधामहापालिका आरोग्य केद्रामार्फेत प्रसुतीसाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे़ काही वर्षात आरोग्य केंद्र, शासकीय व खाजगी रुग्णालयामधून ९५ टक्क्यांपेक्षा जास्त महिला प्रसुती झाल्या आहेत. जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमाअंतर्गत २४ तास सेवा रुग्णवाहिकेची सुविधा आहे़ त्यामुळे गरोदर मातांची नोंदणी, तपासणी, औषधोपचार, बाळंतपणे, प्रयोगशाळा तपासण्या, सिझेरियन सेक्शन, रक्त संक्रमण या मोफत सुविधांचा समावेश आहे.बॅक खात्यात मिळतो लाभकुंटूब नियोजनासाठी शासनाकडून पुरूषांना ११०० रु.चे अर्थसहाय्य दिले जाते़ तर बीपीएल रेशनकार्ड धारक महिला लाभार्थ्यांना ६०० तर इतर महिला लाभार्थ्यांना २५० रूपयांपर्यत अर्थसहाय्य शासनाकडून त्यांच्या बॅकेच्या खात्याद्वारे देण्यात येते़राज्यात पुरूष नसबंदी केवळ १६ टक्केपुरुष नसबंदी ही एक झटपट शस्त्रक्रिया आहे. स्त्री नसबंदी शस्त्रक्रियापेक्षा ती फारच सोपी आणि सुरक्षित आहे.ही शस्त्रक्रिया स्थानिक भूल देऊन प्राथमिक आरोग्य केंद्रात सुद्धा करता येते.या शस्त्रेक्रियेनंतर तासाभरात घरी जाता येते़ मात्र तरी देखील समाजात नसबंदी संदर्भात मोठ्या प्रमाणात समज-गैरसमाज आहेत़पुरूष नसबंदी शस्त्रक्रिया केवळ पाच ते दहा मिनीटाची असुन अतिशय सोप्यापध्दतीची आहे़ शस्त्रक्रियेनंतर पुरूषांना ११०० रूपयापर्यत मानधन दिले जाते़ तर महिलांना शस्त्रक्रियेसाठी आठ दिवस दवाखान्यात दाखल व्हावे लागते़ एप्रिल २०१८-२०१९ या कालावधीत राज्यातील ३ लाख २८ हजार ०६६ महिलांनी कुंटूब नियोजन केले आहे़ त्यात २.९६ टक्के पुरूषांनी शस्त्रक्रिया केली असुन फक्त १६ टक्के पुरूषांची उदिष्ठे आहे़

टॅग्स :Dhuleधुळे