गोमासे पुढे म्हणाल्या की कायदा आणि महिलांची सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी पोलीस आणि न्यायव्यवस्था यांची भूमिका महत्वाची असते. मुलींनी सुरक्षित आणि भयमुक्त राहण्यासाठी स्वतःची वागणूक, खंबीरपणा सोबत स्वरक्षणाचे धडे घेणे गरजेचे आहे. मुलींनी अबला न राहता सबला होणे आवश्यक आहे. त्याच बरोबर स्पर्धा परीक्षेला सामोरे जाताना जिद्द , चिकाटी, मेहनत, प्रामाणिकपणा आणि सातत्य असणे फार गरजेचे आहे. प्रेमलता गोमासे यांनी स्वतःचे अनुभव सांगून विद्यार्थिनींच्या स्वसंरक्षणाबाबतच्या प्रश्नांना उत्तरे देऊन शंकांचे निरसन केले.
प्राचार्य डॉ.राजेंद्र अहिरे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. सूत्र संचालन युवती सभा प्रमुख डॉ. ज्योती वाकोडे यांनी तर आभार विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.लहू पवार यांनी मानले.