शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकच्या धडकेत महिलेचा मृत्यू; सावळदे गावाजवळील घटना

By देवेंद्र पाठक | Updated: August 24, 2023 16:37 IST

याप्रकरणी शिरपूर शहर पोलिसात बुधवारी सायंकाळी ट्रकचालकाविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून त्याला अटक करण्यात आली.

शिरपूर : भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकची महिलेला जोरदार धडक बसली. यात गंभीर जखमी झाल्याने महिलेचा उपचार घेताना मृत्यू झाला. ही घटना शिरपूर तालुक्यातील सावळदे गावाजवळ सोमवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी शिरपूर शहर पोलिसात बुधवारी सायंकाळी ट्रकचालकाविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून त्याला अटक करण्यात आली.

लवा उर्फ लहू उर्फ मणिराम उर्फ कालू भिल (वय २७) आणि त्यांची पत्नी भारती लवा भिल (वय २०) (दोन्ही रा. कळमसरे ता. शिरपूर) हे मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शिरपूर तालुक्यातील सावळदे गावाच्या चौफुलीवर सोमवारी दुपारी थांबलेले हाेते. दुपारी ४ वाजेच्या सुमारास केए २५ एए ६८५८ या क्रमांकाचा ट्रक भरधाव वेगाने आला. ट्रक वेगात असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रकची धडक सावळदे गावाच्या चौफुलीवर थांबलेल्या महिलेला बसली. यात ती रस्त्यावर फेकली गेली. तिच्या डोक्याला आणि शरीरावर गंभीर दुखापत झाली. तिला तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला.

याप्रकरणी मयत महिलेचा पती लवा भिल याने बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता शिरपूर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल झाल्याने ट्रकचालक बबलूसिंग रामसिंग राणावत (वय २९, रा. बाबडी ता. जहाजपूर जि. भिलवाडा, राजस्थान) याच्या विरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. ट्रकचालकाला अटक करण्यात आली. पाेलिस नाईक पवन ईशी घटनेचा तपास करत आहे. 

टॅग्स :Dhuleधुळे