शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

इच्छुकांच्या अपेक्षांवर पाणी फिरणार की दिलासा मिळणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 22:07 IST

धाकधूक वाढली: आज सादर होणाऱ्या माहितीवर अवलंबून राहणार पुढचा निर्णय

धुळे : जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुकांनी आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी जोरदार ‘फिल्डींग’ लावली आहे. उमेदवारी जाहीर होण्यास काही दिवस बाकी असतांनाच राज्यातील पाचही जिल्हा परिषदांमध्ये ५० टक्यांपेक्षा जादाचे आरक्षण नियमबाह्य असल्याचे सर्वाेच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. या संदर्भात १६ डिसेंबरपर्यंत माहिती देण्यास राज्य सरकारला सांगण्यात आले आहे. त्यामुळे शासन काय माहिती देते याची उत्सुकता आहे. या माहिती सादरमुळे इच्छुकांच्या अपेक्षांवर पाणी फिरणार की दिलासा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.धुळे जिल्हा परिषदेची मुदत डिसेंबर २०१८ मध्येच संपली. जिल्हा परिषदेची मुदत संपण्यापूर्वीच काहींनी आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून आपापल्या पक्षातील नेत्यांकडे ‘फिल्डींग’ लावण्यास सुरूवात केली होती. मात्र जिल्हा परिषद आरक्षणाचा वाद न्यायालयात पोहचल्याने, निवडणुकांना विलंब झाला. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपूर्वीच लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका झाल्या. या दोन मोठ्या निवडणुकांमुळे जिल्हा परिषदेची निवडणूक, उमेदवारी या गोष्टी मागे पडल्या होत्या.मात्र १९ नोव्हेंबर २०१९ रोजी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याने, पुन्हा चर्चांना उधाण आले आहे. या निवडणुकीत आपल्याला संधी मिळावी म्हणून इच्छूक पुन्हा सक्रीय झालेले आहे.जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून परिचित असलेल्या या स्थानिक स्वराज्य संस्थेत आपल्याला संधी मिळावी म्हणून गेल्या काही महिन्यांपासून इच्छुकांनी स्थानिक पातळीवरील नेत्यांकडे तर काहींनी वरिष्ठांकडे चकरा मारण्यास सुरूवात केलेली आहे. उमेदवारी मिळावी म्हणून काहीजण तर सकाळपासूनच नेत्याच्या दारी ठाण मांडून बसलेले आहेत.दरम्यान उमेदवारीची जोरात फिल्डींग लावलेली असतांनाच १३ नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने जिल्हा परिषदांमध्ये दिलेले ५० टक्यांपेक्षा जादाचे आरक्षण नियमबाह्य असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे ही निवडणूक रद्द होण्याची शक्यता असल्याने, इच्छुकांच्या गोटामध्ये प्रचंड खळबळ उडालेली आहे. लावलेल्या ‘फिल्डींगवर पाणी फिरतेय की काय या चिंतेनेही अनेकांनी ग्रासलेले आहे.दिलासा की पाणी फिरणारदरम्यान राज्य शासन १६ डिसेंबर रोजी आरक्षणासंदर्भात न्यायालयाला माहिती सादर करणार आहे. यानंतरच पुढील निर्णय अवलंबून असेल. त्यामुळे या माहितीमुळे इच्छुकांना दिलासा मिळणार की त्यांच्या अपेक्षावर पाणी फिरणार याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.दरम्यान राज्य सरकारने न्यायालयास समाधानकारक माहिती न दिल्यास, पुन्हा आरक्षण सोडत काढण्यात येऊ शकते. नव्याने आरक्षण काढल्यास गट-गणांच्या आरक्षणात थोडीफार फेरफार होवू शकते असा अंदाज आहे. तसे झाल्यास गेल्या महिन्यापासून सुरू असलेल्या तयारीवरही पाणी फिरण्याची शक्यता आहे.त्यामुळे इच्छुकांची धाकधूक वाढली आहे.राज्य सरकार काय माहिती देते याकडे लक्ष लागूनसर्वोच्च न्यायालयाने राज्यातील पाचही जिल्हा परिषदांमध्ये दिलेले ५० टक्यांपेक्षा जादाचे आरक्षण नियमबाह्य ठरवून, जादाचे आरक्षण कसे न्यायसंगत आहे. हे स्पष्ट करा. आणि ५० टक्यांपर्यंतच आरक्षण मर्यादीत राहील यासाठी पाऊले उचला असे आदेश दिले असून, त्यासंदर्भात १६ डिसेंबर रोजी माहिती देण्यास राज्य सरकारला सांगितले आहे. आता राज्य सरकार काय भूमिका मांडणार, आणि सर्वोच्च न्यायालय त्यावर काय निर्णय देते यावर पाचही जिल्हा परिषदेतील निवडणूक अवलंबून राहणार असल्याने, या महितीकडे सर्वांचेच लक्ष लागून रहिलेले आहे.

टॅग्स :DhuleधुळेElectionनिवडणूक