शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

...तर लोकसभा निवडणुकांवर बहिष्कार टाकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 20:02 IST

धुळे येथे  राज्य परिवहन  सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या अधिवेशनात ठराव पारीत

ठळक मुद्देअधिवेशनासाठी राज्यातील प्रतिनिधी उपस्थितविविध विषयांवर झाली चर्चादोन ठराव केले मंजूर

आॅनलाइन लोकमतधुळे :एस.टी.च्या सेवानिवृत्त कर्मचाºयांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. त्याचबरोबर एस.टी.च्या सेवानिवृत्त कर्मचाºयांना वाढीव पेन्शन मिळाले नाही तर २०१९ मध्ये होणाºया लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकू असा ठराव आज करण्यात आला. राज्य परिवहन महामंडळ निवृत्त कर्मचारी संघटनेचे २३ वे राज्यस्तरीय अधिवेशन गुरूवारी कामगार कल्याण भवनात झाले. या अधिवेशनात हा ठराव मंजूर करण्यात आला. या राज्य अधिवेशानच्या अध्यक्षस्थानी औरंगाबाद विभागाचे उपाध्यक्ष दिनकरराव पिंगळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून संघटनेचे सरचिटणीस सदानंद विचारे  (ठाणे), सचिव श्रीराम गालेवाड, जगदीश अंबोरे, गणेश वाळपकर आदी होते. या वेळी मार्गदर्शन करतांना सदानंद विचारे म्हणाले. एस.टी.च्या सेवानिवृत्त कर्मचाºयांना मिळणारे पेन्शन हे अतिशय तोडके आहे. केंद्राने एस.टी.च्या सेवानिवृत्तांना वाढीव पेन्शनच्या लाभापासून परावृत्त केले आहे. महामंडळाच्या कर्मचाºयांना वाढीव पेन्शन मिळाले नाही तर २०१९ मध्ये होणाºया  लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकू. त्याचबरोबर संघटनेचे सर्व सभासद हे सरकार विरोधात मतदान करतील असेही त्यांनी सांगितले. दरम्यान एस.टी.च्या सेवानिवृत्त कर्मचाºयास व त्याच्या पत्नीस मोफत पास मिळावा अशी मागणी होती. शासनाने ती मंजूर केली. मात्र त्याची अद्याप अमलबजावणी केलेली आहे. त्यामुळे अनेक सेवानिवृत्त कर्मचारी हे मोफत पास योजनेपासून वंचीत आहेत. हा पास राज्य  शासनाने लवकर दिला नाही, तर विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचाही ठराव यावेळी करण्यात आल्याची माहिती एस.टी.कर्मचारी संघटनेचे धुळे अध्यक्ष योेगेंद्रसिंग राजपूत यांनी दिली. या राज्य अधिवेशनाला मुंबई, ठाणे, नाशिक, कोकण, नागपूर, खान्देश विभागातील जवळपास दोन हजार सभासद उपस्थित होते. सूत्रसंचालन योगेंद्रसिंग राजपूत यांनी तर आभार एस.डी. जाधव यांनी मानले. या वेळी पी.वाय. भट, एम.के. भामरे, एस.टी.पाटील, डी.डी.नाईक, पोपट चौधरी, आर.बी.पाटील, टी. जी. जयस्वाल, संजय ढगे, आर. व्ही.बडगुजर,आर.आर. वाकडे, वाय.एन.साळवे,एम.एस.भदाणे, झेड. एच. राजपूत, एल.जे. जाधव यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. 

टॅग्स :Dhuleधुळे