गर्दीवर नियंत्रण ठेवायचे कसे?
शहरासह जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने सरकारी दवाखान्यांमध्ये कोरोनाची तपासणी करण्यासाठी आणि त्यानंतर अहवाल घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या शेकडोच्या घरात आहे. त्यामुळे या गर्दीवर नियंत्रण ठेवायचे कसे, असा प्रश्न आरोग्य यंत्रणेला पडला आहे. कारण मनुष्यबळ कोरोनाच्या कामात व्यस्त आहे.
काही रुग्ण कोरोना नियमांचे पालन करीत आहेत, तर काही मात्र पालन करताना दिसत नाहीत. रुग्णालयाकडून वेळोवेळी सूचना दिल्या जातात; परंतु त्याकडे सर्रासपणे दुर्लक्ष केले जाते. ही अतिशय गंभीर बाब आहे.
- तपासणीसाठी आलेल्या व्यक्तीची प्रतिक्रिया
मी कोरोना तपासणी करण्यासाठी आलो आहे. स्वॅब घेण्यासाठी डाॅक्टर अंतरावर उभे करतात. एक रुग्ण गेल्याशिवाय दुसरा रुग्ण आत घेत नाही; परंतु केस पेपर काढताना मात्र कमालीची गर्दी होते. सोशल डिस्टन्सिंग नसते.
- तपासणीसाठी आलेल्या व्यक्तीची प्रतिक्रिया
कोरोना तपासणीसाठी आणि अहवाल घेण्यासाठी आलेले रुग्ण अशाच पद्धतीने गर्दी करीत राहिले तर कोरोनाचा संसर्ग अधिक वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. रुग्णांनी आरोग्य विभागाला सहकार्य करण्याची गरज आहे. अहवाल घेण्यासाठी सायंकाळी बोलावले जाते. तपासणीसाठी आलेले रुग्ण त्यावेळी नसतात. त्यामुळे फारशी गर्दी होत नाही; परंतु आता संख्या वाढत असल्याने काळजी घेण्याची गरज आहे.
- अहवाल घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीची प्रतिक्रिया
कोरोना तपासणीसाठी आणि अहवाल प्राप्त करण्यासाठी आलेल्या रुग्णांना वेळोवेळी सूचना देऊन सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क वापरण्याचा आग्रह धरला जातो. कोरोना नियमांचे काटेकोर पालन केले जाते.
- डाॅ. विशाल पाटील, धुळे जिल्हा कोरोना नोडल अधिकारी