शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कुणी गैरप्रकार करू नये, कुणाला करूही देऊ नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 12:41 IST

निवडणूक अधिकारी सुधाकर देशमुख : मतदान वाढीसाठीचे प्रयत्न अभिनंदनीय

लोकमत न्यूज नेटवर्क धुळे- महापालिका निवडणूकीसाठी असलेली प्रचाराची मुदत आज सायंकाळी साडेपाच वाजता संपणार आहे़ त्यानंतर भरारी पथके, रात्र गस्ती पथके, पोलीस यंत्रणा सक्षमपणे कार्यरत राहणार असून मतदारांना प्रलोभने दाखविण्यासारखे कुठलेच गैरप्रकार होऊ नये, यासाठी काटेकोर लक्ष ठेवले जाणार आहे़ मतदारांनी निर्भयपणे मतदान करून निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडावी, असे आवाहन निवडणूक अधिकारी सुधाकर देशमुख यांनी केले़महापालिका निवडणूकीसाठी आज प्रचार थांबत असून रविवारी मतदान होणार आहे़ निवडणूकीत सर्व राजकीय पक्ष, उमेदवार व कार्यकर्ते तसेच मतदारांनी आचारसंहितेचा भंग होईल, अशी कुठलीच गैरकामे करू नये व कुणाला करूही देऊ नये, असे आवाहन निवडणूक अधिकारी तथा आयुक्त सुधाकर देशमुख यांनी केले़ निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी  साधलेला संवाद़़़़प्रश्न : महापालिका निवडणूकीसाठी प्रचाराचा कालावधी आज संपत आहे़ त्यानंतर काही गैरप्रकार समोर आल्यास प्रशासनाची काय तयारी आहे?सुधाकर देशमुख : महापालिकेने ६ भरारी पथके, निवडणूक निरीक्षक व पोलीसांची पथके थेट कारवाईसाठी नेमली आहेत़ तसेच पोलीस ठाणे निहाय रात्रपथके, संवेदनशिल मतदान केंद्रांवर अतिरीक्त पोलीस बंदोबस्त, ५ ठिकाणी निरीक्षण चौक्या नेमल्या आहेत़ शिवाय ‘कॉप’ अ‍ॅपच्या माध्यमातून नागरिकांना देखील सर्व गैरप्रकारांवर लक्ष ठेवता येणार आहे़ प्रश्न : मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी, यासाठी काय उपाययोजना केल्या जाणार आहेत?सुधाकर देशमुख : मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी, यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहे़ शिवाय मतदान केंद्रातील कर्मचाºयांना कुठल्याही कारणास्तव केंद्रातून बाहेर पडावे लागू नये यासाठी त्यांना जागेवर भोजन उपलब्ध करून दिले जाणार आहे़ एकूण ९९ इमारतींमध्ये ४५० मतदान केंद्र असून सर्व इमारतींमध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे ९९ समन्वयक नेमले आहेत़ त्यांच्या माध्यमातून मतदान केंद्रांवर लक्ष ठेवले जाईल़ प्रश्न : महापालिका निवडणूकीत गेल्यावेळी झालेल्या मतदानाच्या टक्केवारीत यंदा वाढ होईल, असे वाटते का?सुधाकर देशमुख : निश्चितच, गेल्या निवडणूकीत ६२ टक्के मतदान झाले होते़ परंतु यंदा मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी विविध कार्यक्रम, शाळा-महाविद्यालयांमध्ये जनजागृती,  व्होटर सर्च अ‍ॅपव्दारे मतदारांना दिलेली सुविधा, सोशल मीडियाव्दारे केलेली आवाहने यांमुळे मतदानाची टक्केवारी निश्चितच वाढेल़ त्याचप्रमाणे सर्व राजकीय पक्षांनी प्रचारादरम्यान मतदान वाढीसाठी केलेले प्रयत्न अभिनंदनीय आहेत़ त्यामुळे मतदानात गेल्यावेळच्या निवडणूकीपेक्षा वाढ होईलच असा विश्वास आहे़प्रश्न : मुख्य निवडणूक अधिकारी तथा आयुक्त या नात्याने आपण धुळयात मतदान करणार आहात का?सुधाकर देशमुख : माझे नाव पुण्यात पिंपरी येथील मतदारसंघात आहे़ त्यामुळे धुळयात मतदान करता येणार नाही, परंतु मी प्रत्येक निवडणूकीत मतदानाचा हक्क बजावित असतो़ त्याचप्रमाणे कुणीही मतदानापासून अलिप्त न राहता आपला हक्क बजावणे अपेक्षित आहे़ प्रश्न : महापालिका निवडणूकीच्या अनुषंगाने आपण धुळेकरांना काय आवाहन कराल?सुधाकर देशमुख : मनपा निवडणूक प्रक्रियेची पूर्ण तयारी प्रशासनाने केली असून सक्षम निवडणूक यंत्रणा कार्यान्वित केली आहे़ अडीच हजार कर्मचाºयांसह पोलीसांचाही मोठा बंदोबस्त असणार आहे़ त्यामुळे निवडणूक प्रक्रियेला गालबोट लागेल, अशी कुठलीही कृती विविध राजकीय पक्षांचे उमेदवार, कार्यकर्ते, मतदारांकडून होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी़ कुणी गैरप्रकार करू नये, कुणाला करू देऊ नये़ त्याचप्रमाणे मतदारांना निर्भयपणे हवे त्या उमेदवाराला मतदान करण्यात बाधा आणू नये, निवडणूक यंत्रणेला सहकार्य करून मतदान व मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पाडावी, असे आवाहन मी निवडणूक अधिकारी तथा आयुक्त या नात्याने सर्वांना करीत आहे़ 

टॅग्स :Dhuleधुळे