आॅनलाइन लोकमतशिंदखेडा (जि.धुळे) : तालुक्यातील तावखेडा प्र.बे. येथे २७ वर्षीय युवकाचा खून प्रेमप्रकरणातून झाल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. विवाहित प्रेयसीने दुसºया प्रियकराची मदत घेत पहिल्या प्रियकराला संपवून त्याचा मृतदेह शेतात फेकल्याचा घटनाक्रम पोलिसांनी उघड केला. याप्रकरणात शिंदखेडा पोलिसांनी विवाहित महिलेसह प्रियकराला अटक केली.तावखेडा प्र.बे. येथील २७ वर्षीय प्रविण लोटन पाटील याच्या खून प्रकरणाचा तपास अवघ्या ३६ तासात पोलिसांनी उघडकीस आणला. मयत प्रविणचे गावातीलच विवाहित महिला शीतल पाटील हिच्याशी ८ ते ९ महिन्याआधीच प्रेमसंबंध जुळले होते. महिलेने लिहिलेले प्रेमपत्र मयताने व्हाटसअपवर व्हायरल करुन तिची गावात बदनामी केली होती.१५ फेब्रुवारीला सुद्धा त्याने तिला मोबाईलवरुन कॉल करुन रात्री शेतात भेटण्यास बोलविले होते. या सर्व प्रकाराने त्रासलेल्या त्या महिलेने ही गोष्ट दुसरा प्रियकर संभाजी पाटीलला सांगितली. त्यानंतर ठरल्याप्रमाणे महिला ही शेतात प्रवीणला भेटण्यासाठी गेली. याठिकाणी आधीच लपून बसलेल्यासंभाजीने प्रवीणचा दोरीने आवळून खून केला. नंतर दोघांनी मिळून प्रेत दुसºया शेतात टाकले. नंतर मयतचा मोबाईल, पॅन्टची विल्हेवाट लावून दिली.पोलिसानी मंगळवारी दोघांना अटक केली. त्यानंतर शितल व संभाजीने खुनाची कबुली दिली. याप्रकरणी दोघांविरोधात शिंदखेडा पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
पहिल्याला संपवितांना प्रेयसीने घेतली दुसऱ्या प्रियकराची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 12:30 IST