लोकमत न्यूज नेटवर्कमालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपुर परिसरात हवेचा जोर वाढल्यामुळे शेतकºयांचा रब्बी हंगामातील तयार होत असलेला गहु आडवा पडत आहे. यामुळे मोठे नुकसान होत असल्यामुळे शेतकरीवर्गामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.सध्या मालपुरसह परिसरात रब्बी हंगामातील पिके चांगलीच बहरली असल्याने शेतकºयांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. गहु पिकाला शेतकºयांनी शेवटचे पाणी देणे चालू केले आहे. मात्र, त्याचबरोबर सध्या हवेचा वायव्य नैऋत्य दिशेने जोर वाढला असून यामुळे उंबीवर पोसला जात असलेल्या वजनदार गव्हाच्या लोंबी भुईसपाट होत असल्यामुळे शेतकरी वर्गात निराशा पसरली आहे. हातातोंडाशी आलेला घास जोरदार वाºयामुळे हिरावला जातो कि काय, अशी भीती शेतकºयांमध्ये व्यक्त होत आहे. वाºयामुळे गव्हाच्या जमिनीतील मुळ फिरुन ऐन दाणा पोसला जाण्याच्या वेळेतच गहु पिक वाया जात आहे तर पाणी न भरल्यास गहु बारीक पडणार आहे, अशा दुहेरी संकटात येथील शेतकरी सापडला आहे. दिवसा हवेचा जोर जास्त असतो तर रात्रीच्या अंधारात व्यवस्थित पाणी देता येत नाही. तरीही येथील शेतकरी रात्रीच्या वेळेस कमरेइतक्या गहु पिकात उभे राहून जीवाची पर्वा न करता पाणी देण्यासाठी धडपड करताना दिसून येत आहेत. मात्र, त्यात लोडशेडिंगमुळे शेतकºयांचे सर्वच नियोजन कोलमडत आहे. यासाठी शेतकरी हिताचे लोडशेडिंग वीज वितरण कंपनीने करावे, अशी मागणी येथील शेतकरी वर्गाकडून होत आहे. अन्यथा भरपूर पाणी असूनही येथील शेतकºयांचा रब्बी हंगाम वाया जाणार आहे.
वादळी वाऱ्यामुळे गहू भुईसपाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 13:16 IST