शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

संततधार पावसाने विहिरी तुडूंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 14:04 IST

कापडणे परिसर : नदी, नाले ओसंडून वाहिले, रब्बी हंगामाला सुरुवात

कापडणे : धुळे तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात सलग तीन ते चार वर्षांपासून कमी पाऊस होत असल्याने कोरडा दुष्काळ पडत होता. यामुळे शेती पीक उत्पादनात मोठी घट येऊन शेतकरी कर्जबाजारी झाला होता. मात्र, यावर्षी खरीप हंगामात आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात सलग दोन ते अडीच महिने नियमित पाऊस सुरू असल्याने कापडणे गावातील विहिरी, नदी-नाले, केटीवेअर बंधारे, शेततळे पाण्याने तुडुंब भरून ओसंडून वाहत आहेत. शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने रब्बी हंगामाला सुरुवात केली आहे.कापडणे गावासह पंचक्रोशीत सलग तीन ते चार वर्षांपासून पर्जन्यवृष्टी तुरळक होत असल्याने कोरडा दुष्काळ पडत आहे. सर्वत्र विहिरी कूपनलिका उन्हाळ्यात कोरड्या ठणठणाट राहत होत्या. मात्र आता यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे येथील सर्वत्र विहिरी कूपनलिकांची पाण्याची पातळी खूपच वर आल्याने याचा फायदा सर्वत्र शेतकऱ्यांना शेती बागायत करण्यासाठी होणार आहे, तसेच संपूर्ण कापडणे ग्रामस्थांचे पाणीटंचाईचे हाल कमी होणार आहेत.सोनवद प्रकल्पाची पाटचारी देखील तब्बल दोन महिन्यापासून वाहत असल्याने यामुळे गावातील सर्वत्र विहिरी व कूपनलिकांची पाण्याची पातळी वाढून जमिनीपासून केवळ दहा ते १२ फूट अंतरावरच विहिरींना पाणी आलेले आहे.गाव इतिहासात पहिल्यांदाच पाणीटंचाईच्या काळात यंदाच्या उन्हाळ्यात जिल्हा प्रशासनाच्या वतीने टँकरद्वारे गावाला दररोज पाणीपुरवठा करण्यात आला होता.नळांना देखील ४० ते ४५ दिवसानंतर पाणी येत होते. मात्र पाणीटंचाईच्या काळात पाण्याचे मोल काय असते, ही गोष्ट सर्वांच्या स्मरणात राहून गेली आहे. आता मात्र समाधानकारक पाऊस झाल्यामुळे सर्वत्र टंचाईचा प्रश्न दूर झाला आहे.दरम्यान, पुन्हा परिसरात दोन-तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरु असल्याने जलपातळीत वाढ झालेली आहे. गावातील पाणीपुरवठा करणारी विहीर जमिनीपासून पाच फुट वरपर्यंत पाण्याने तुडूंब भरली आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

टॅग्स :Dhuleधुळे