शाळा सुरू करण्यापूर्वी वर्गखोल्यांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले, तसेच शाळेच्या प्रवेशद्वाराजवळच विद्यार्थ्यांचे ऑक्सिमीटरने ऑक्सिजनची पातळी मोजण्यात आली. थर्मामीटरने तापमान मोजण्यात आले. एका बाकावर एकाच विद्यार्थ्याला बसविण्यात आले.
वरूळ
वरूळ येथील एच.आर. पटेल कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता आठवी ते इयत्ता बारावीच्या वर्गातील विद्यार्थिनींचे औक्षण करून व गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी प्राचार्य पी.आर. साळुंखे यांनी गुलाबपुष्प देऊन विद्यार्थिनींचे स्वागत केले. याप्रसंगी प्राचार्य डी.एन. माळी, एम.व्ही. पाटील, बी.एन. पाटील, एम.बी. पाटील, पी.आर. मोरे, एस.एस. पाटील, वाय.डी. पाटील, एस.एम. झटकर, एस.सी. शिंपी, एन.एस. म्हस्के, एस.एच. निकुंभे, राकेश मोरे, पी.टी. पवार आदींची उपस्थिती होती.
झेंडेअंजन
झेंडेअंजन येथील आर.सी. पटेल माध्यमिक विद्यालयात इयत्ता आठवी ते दहावीचे वर्ग मोठ्या उत्साहात सुरू करण्यात आले. मुख्याध्यापक एस.ए. कुरेशी, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चैत्राम गायकवाड, सदस्य मोतीलाल देशमुख, दिलीप गांगुर्डे, आनंदा राऊत यांनी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. सर्व विद्यार्थ्यांनी मास्कचा वापर केला होता. शाळेत दर्शनी भागात विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक सूचना असणारे फलक व पोस्टर्स लावण्यात आले आहेत. वर्गात एका बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे नावानिशी बैठकव्यवस्था करण्यात आली आहे. सूत्रसंचालन एन.बी. पाटील यांनी केले. याप्रसंगी के.बी. चौधरी, आर.व्ही. महाले, डी.यू. राजपूत, हेमकांत मगरे, डी.पी. मगरे, एन.बी. पाटील, नाना ढिवरे, राजेंद्र बागूल आणि सतीश तावडे उपस्थित होते.
विखरण
विखरण येथील साने गुरुजी तांत्रिक माध्यमिक व क्रांती वीरांगना लीलाताई उत्तमराव पाटील उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरु करण्यात आले. प्राचार्य एम.एम. सनेर यांच्या मार्गदर्शनानुसार पर्यवेक्षक व्ही.ए. पाटील यांच्या नियोजनाने विद्यार्थ्यांची तपासणी करून स्वागत केल्यानंतर वर्गांमध्ये प्रवेश देण्यात आला. विद्यार्थ्यांनी गेटमधून प्रवेश केल्यानंतर सॅनिटायझरची फवारणी करण्यात आली. त्यानंतर त्यांचे तापमान, पल्स व ऑक्सिजन पातळी तपासून त्याची नोंद घेण्यात आली. यावेळी पंचायत समिती शिक्षण विस्तार अधिकारी डी.पी. बुवा, केंद्रप्रमुख आर.पी. कोळी यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
होळनांथे
होळनांथे येथील आर.सी. पटेल माध्यमिक विद्यालयात इयत्ता आठवी ते दहावीचे वर्ग मोठ्या उत्साहात सुरू करण्यात आले. मुख्याध्यापक व्ही.पी. दीक्षित व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्यांनी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. थर्मल स्कॅनरचा वापर करून विद्यार्थ्यांच्या शरीराचे तापमान मोजण्यात आले, तसेच पल्स ऑक्सिमीटरच्या
साहाय्याने शरीरातील ऑक्सिजनची पातळी मोजण्यात आली.
सावळदे
सावळदे येथील आर.सी. पटेल माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक के.आर. जोशी व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनोज भिल यांनी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. याप्रसंगी शाळेतील शिक्षक व्ही.बी. गाढवे, एस.आर. बोरसे, ए.बी. निळे, एम.एल. जाधव, जी.डी. शिवदे, एस.एल. भील, पी.आर. माळी, एस.आर. जावरे, एस.एफ. शिरसाठ, बी.पी. रोकडे व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.