लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाची निविदा प्रक्रिया आॅगस्टमध्ये झाल्यास स्वागतच आहे़ परंतु आॅगस्टची नवीन फेकमफाक एक्सप्रेस ठरायला नको, असे म्हणत आमदार अनिल गोटे यांनी संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरेंवर टिका केली़ त्याचप्रमाणे जमिन संपादन प्रकरणात भाजपच्या नेत्यांचाही सहभाग असल्याचा गंभीर आरोप आमदार गोटे यांनी केला़आमदार अनिल गोटे यांनी शनिवारी विविध विषयांवर पत्रकार परिषद घेतली़ त्यावेळी ते म्हणाले की, रेल्वेमार्गाची प्रक्रिया राबविण्यासाठी कालावधी लागतो़ तांत्रिक मान्यता, प्रशासकीय मान्यता, निविदा, अटी शर्ती अशी मोठी प्रक्रिया असते़ परंतु आॅगस्टमध्ये जर हे सर्व पूर्ण होऊन काम सुरू होणार असेल तर स्वागतच आहे़ मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाचे श्रेय या रेल्वेमार्गासाठी ज्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले, त्यांचे असल्याचेही गोटे म्हणाले़ भाजपच्याच मंत्र्यांनी मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाबाबत गेल्या २० वर्षात काहीच कार्यवाही झाली नसल्याचे सांगून तत्कालिन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा अवमान केला आहे, असे आमदार गोटे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले़ त्याचप्रमाणे पांझराकाठच्या रस्त्यांलगत जलवाहिनीच्या कामाची कागदोपत्री प्रक्रिया सुरू असल्याने काम लांबले असून पावसामुळे डांबरीकरण थांबविले असल्याचे आमदारांनी स्पष्ट केले़ जेलरोडच्या संदर्भातील फाईल अर्थखात्याकडे असून ती महिनाभरात मार्गी लागेल़ शहरातील झोपडपट्टयांना सिटी सर्व्हे क्रमांक मिळावा, यासाठी पाठपुरावा करीत असल्याचेही आमदार गोटे म्हणाले़
मनमाड-इंदूर रेल्वेमार्ग आॅगस्टमध्ये मार्गी लागल्यास स्वागतच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 17:49 IST
आमदार अनिल गोटे यांची भुमिका, भूसंपादन प्रकरणात भाजप नेते सहभागी असल्याचा आरोप
मनमाड-इंदूर रेल्वेमार्ग आॅगस्टमध्ये मार्गी लागल्यास स्वागतच!
ठळक मुद्दे- भूसंपादन प्रकरणाची होणार एसआयटी चौकशी- पांझराकाठच्या रस्त्यांचे काम पाईपलाईनमुळे लांबले-झोपडपट्टयांना सिटी सर्व्हे नंबर मिळविण्यासाठी प्रयत्नशिल