शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी महिलांचा टॅँकरला घेराव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 12:00 IST

कापडणे येथे पाणीबाणी : ग्रा.पं. सदस्य मात्र सहलीवर 

लोकमत न्यूज नेटवर्ककापडणे : येथे तब्बल दीड महिन्यापासून  गावात पाणी सोडलेले नाही. म्हणून भर पावसाळ्यात गावात तीव्र पाणी टंचाई असून महिलांनी गावातील भवानी चौकात बुधवारी टॅँकर अडवून घेराव घातला. सध्या पाण्यासाठी महिलांना भटंकती करावी लागत आहेत. परंतू तरी देखील पाणी मिळत नसल्यामुळे ग्रामस्थ अक्षरश: मेटाकुटीला आले आहेत. येथील  पाणी पुरवठा योजना ताब्यात घेत नाही म्हणून सरपंच भटू पाटील यांना राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आले. नवीन सरपंच निवडीची तारीख अद्याप निश्चित झालेली नसताना देखील बरेच ग्रा.पं.सदस्य सहलीला गेले आहेत. इकडे मात्र गावातील महिला  पाण्यासाठी रस्त्यावर उतरल्या आहेत. बुधवारी शासकीय पाण्याचे टॅकर आले असता ते आपल्या भागामध्ये घेऊन जाण्यासाठी महिलांनी भवानी चौकात येऊन उत्स्फूर्त रास्तारोको आंदोलन करत पाण्याचे टॅकरला  घेराव घातला. आक्रमक होत टॅकरवर ताबा मिळवून त्यास त्यांच्या भागात नेले. यावेळी जबाबदारी झटकून सहलीस गेलेल्या ग्रा.पं.सदस्याविषयी प्रचंड रोष व्यक्त झाला.गावात ३०-४० दिवसापासून नळांना पाणीच आलेले नाही म्हणून कापडणेकरांवर पाणीबाणीचे संकट कोसळलेले असताना दुसरीकडे मात्र सत्ताधारी पदाधिकाºयांना त्याचे काही सोयरसुतक दिसत नाही. गावाला पाणीटंचाईची भयकंर परिस्थिती निर्माण झाली असताना ती सोडविणे सत्ताधाºयांकडून अपेक्षित असताना त्याबाबत उपाययोजना करायचे सोडून  सत्ताधारी आपल्या राजकारणात मस्त असल्याचे चित्र आहे.गावाला पाणी पुरवठा करणारे सर्वच स्त्रोत अटल्यामुळे पाण्याची भयंकर स्थिती निर्माण झाली आहे.  प्रशासनाकडून टॅकर सुरु करण्यात आले आहे. परंतू ३०-३५ हजार लोकसंख्येच्या गावाला तेवढे पाणी पुरत नाही. त्यामुळे  दिवसेंदिवस पाण्याची स्थिती गंभीर होत आहे. प्रशासनाकडून पाठविलेल्या टॅकरचे पाणी मिळावे म्हणून टॅकरसमोर रस्त्यावर झोपून पाण्यासाठी विनवणी करताना ग्रामस्थ दिसतात. बुधवारी  तर गावातील महिलांना भटकंती करुन देखील पाणी मिळत नसल्यामुळे त्यांनी सकाळ पासूनच येथील भवानी चौकात ठिय्या मांडला होता. पाण्याचा टॅकर आल्यानंतर महिलांनी रास्ता रोको करीत टॅकरला घेराव घातला.महिलांची सरशी अचानक उदभवलेल्या या स्थितीमुळे तणावाचे  वातावरण निर्माण झाले होते. पण शेवटी महिलांपुढे सर्वांनी नमते घेत टॅकर त्यांच्या भागात पाठविण्यात आले.एकीकडे महिला-भगिनी पाण्यासाठी रस्त्यावर उतरल्या  असताना गावाचा कारभार पूर्ण वाºयावर दिसून येत आहे. सरपंच भटू पाटील यांनी आपला पदाचा राजीनामा दिल्यानंतर या पदासाठी इच्छुक उमेदवार आवश्यक सदस्यांना सहलीला घेऊन गेले आहेत. 

टॅग्स :Dhuleधुळे