शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही सर्व आमदार अनिल गोटेंसोबत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 13:59 IST

अद्वय हिरे : धुळ्यात पत्रकार परिषद घेऊन मांडली भूमिका 

ठळक मुद्देस्थानिक नेतृत्वास डावलण्याची पक्षाची भूमिका चुकीची डॉ.सुभाष भामरे गट-तट निर्माण करत पक्षात फूट पाडत असल्याचा आरोपलोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज

लोकमत आॅनलाईनधुळे  : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील आमदार अनिल गोटे यांनी पक्षश्रेष्ठींबाबत जी भूमिका घेतली आहे, ती वर्षभरापूर्वी मी स्वत: अनुभवली. पक्षाचे हे धोरण चुकीचे असून अशा परिस्थितीत आम्ही सर्व आमदार गोटेंसोबत आहोत, अशी भूमिका पक्षनेते व नाशिक जिल्हा कृषी औद्योगिक संघाचे चेअरमन अद्वय हिरे यांनी येथे गुरूवारी पत्रकार परिषदेत मांडली. यावेळी त्यांनी धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार तथा केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांच्यावरही टीका केली. ते सरळ पक्षाचे तिकीट घेऊन आले त्यांचा अद्याप पक्ष प्रवेशच झालेला नाही, असे सांगून त्यांना मतदारसंघात त्यांचे स्वत:चे कार्यकर्ते हवे असून ते पक्षाच्या त्या-त्या विधानसभा मतदारसंघातील स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अडचणीत आणून स्वत:चा गट निर्माण करत असल्याचा  आरोपही त्यांनी केला. मोदी लाटेमुळे ते निवडून आल्याचे सांगतात. परंतु स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांचाही त्यांच्या विजयात मोठा वाटा आहे, हे त्यांनी विसरू नये. आता तर ते पराभूत होतील, असा पक्षाचाच सर्व्हे आहे. त्यामुळे आता डॉ.भामरे यांनी आत्मचिंंतन करावे. अन्यथा त्यांना येत्या निवडणुकीत पराभूत व्हावे लागू शकते, असे भाकितही त्यांनी वर्तवले.  धुळे मनपा निवडणूक प्रक्रियेतून  केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भामरे यांना बाहेर काढावे, असे आमची मागणी नाही. पण पक्ष उमेदवारांना तिकीट वाटप आमदार अनिल गोटे यांना विश्वासात घेतल्याशिवाय होऊ नये. कारण स्थानिक लोकप्रतिनिधीच्या ताकदीमुळेच त्या-त्या मतदारसंघात पक्षाचा झेंडा फडकतो आहे, हे पक्षाने लक्षात घेतले पाहिजे. धुळ्यात पक्षाच्या झेंड्याचा दांडा आमदार गोटे यांच्या हातात आहे. तोच काढण्याचा प्रयत्न झाला तर पक्षाचा झेंडा कुठे राहणार, असा प्रश्नही उपस्थित केला. यावेळी अद्वय हिरे यांच्यासोबत नाशिक कृउबाचे माजी सभापती काशिनाथ पवार, माजी जि.प. सदस्य दशरथ निकम, मालेगाव तालुका संघाचे माजी अध्यक्ष शांताराम लाठर व व्यंकटेश बॅँकेचे सभापती अशोक बच्छाव उपस्थित होते.  

 

टॅग्स :DhuleधुळेPoliticsराजकारण